ही गोष्ट आहे माधव- सावरीच्या प्रेमाची...त्यांच्या नात्यातील चढ-उतारांची...एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रवासाची...ऐका, अंतरीच्या प्रेमाची गोष्ट "प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे तडजोड, प्रेम म्हणजे एकमेकांची साथ. प्रेम वरवरचे नसावे तर ते मनापासून केलेले अर्थात अंतरीचे प्रेम असावे. माधव सावरीवर अगदी असेच प्रेम करत असतो. तिचा भूतकाळ माहित असूनही तिच्याशी लग्न करायला तयार असतो. लव्ह आणि रिलेशनशीप मधील ओलावा जपायला तयार असतो. पण सावरी या नात्यासाठी तयार असते का? समीर सोबतचा भूतकाळ विसरणं तिला शक्य असते? माधवचं लव्ह प्रपोजल ती स्विकारेल का? ऐका सावरी - माधवच्या या अनोख्या नात्याची, एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रवासाची गोष्ट – अंतरीचे प्रेम. ही गोष्ट लिहीली आहे लेखिका प्राजक्त सुनील कर्जतकर यांनी. Author: Prajakta Sunil Karjatkar Voice over artist: RJ Poonam "







