सोशल मीडिया से पॉडकास्ट प्रमोशन कैसे करें ?

तुम्ही तुमचा पॉडकास्ट तयार केल्यावर पॉडकास्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचण सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही पॉडकास्ट तयार केल्यावर अनेक लोकांनी तो ऐकायला हवा. तुम्ही तुमचा पॉडकास्ट याच साठी बनवत असतात की तो अनेको अनेक लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आपण आधी सुद्धा थोडं याविषयी बोललं होतो. पण आज आपण एक अत्यंत सोपं पण तरीही प्रभावी असणार्‍या माध्यमाबद्दल बोलणार आहोत. आपण रोजचं सोशल मीडिया वापरत असतो पण तरीही आपल्याला त्यामधील बर्‍याच गोष्टी माहीती नसतात. बरेच मोठ्या जनरेशन ची लोकं याचा वापर मोनोरंजनाचे माध्यम म्हणूनच करत असतात. सोशल मीडिया चे फायदे आणि त्याचा प्रभावी वापर त्यांना क्वचितच माहिती असतो . म्हणूनच मी इथे आज प्रत्येक सोशल मीडिया चे माध्यम जसे की फेसबूक (facebook), ट्वीटर (twitter), इनस्टाग्राम (instagram) असे सर्व माध्यम वापरुन तुमचा पॉडकास्ट अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवायाचा याच्या काही टिप्स देणार आहेत. ह्या टिप्स चा वापर करून तुम्ही तुमचा पॉडकास्ट अधिका अधिक लोकप्रिय करू शकतात.

social media

1. फेसबूक (facebook)

हा सोशल मीडिया फॉरमॅट सोपा आणि तुम्हाला बरेच फीचर उपलब्ध करून देणारा असा आहे.

a. पेज क्रिएट करा-

तुम्ही तुमच्या पॉडकास्ट साठी एक पेज तयार करा. त्यामध्ये प्रत्येक कॉम्पोनेंट ची दखल घ्या. तुमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल नक्की द्या. तुम्ही अनेक पेज रिलटेड फीचर वापरू शकतात.जसे की तुम्ही तुमच्या पेज चा परफॉरमन्स पाहू शकतात. तुम्ही तुमच्या पॉडकास्ट चा इवेंट करू शकतात. तसेच एक ग्रुप तयार करून लोकांशी कनेक्ट होऊ शकतात.

b. न्यू एपिसोड न्यू पोस्ट-

आपल्या प्रत्येक नव्या एपिसोड बद्दल तुम्ही फेसबूक ला अगदी क्रिएटिव पद्धतीने पोस्ट केली पाहिजे. यामध्ये तुमच्या पॉडकास्ट च्या फॉरमॅट नुसार तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट करा. जसे की जर तुमचा गोष्टींचा पॉडकास्ट असेल तर थोडा भाग सांगा आणि नंतर उर्वरित भागासाठी त्यांना तुमच्या पॉडकास्ट ला भेट द्याला लावा.प्रत्येक वेळी काहीतरी मजेदार चित्र ,फोटो, किंवा किमान तुमच्या पॉडकास्ट ची thumbnail तरी द्या. फक्त शब्द वाचण्यापेक्षा चित्र कोणाचही लक्ष लवकर वेधतात. सोबत तुमच्या पॉडकास्ट ची लिंक द्यायला विसरू नका.

c. फेसबूक स्टोरी-

दररोज न चुकता काही न काही स्टोरी टाकत रहा. ज्यादिवशी पोस्ट टाकाल ती स्टोरी मध्ये हायलाइट कराच पण इतर दिवशीही काहीतरी स्टोरी टाकत रहा. जसे की काही विचार किंवा जोक किंवा तुमचे पर्सनल फोटो सुद्धा. हे तुम्हाला लोकांशी जुडन्यास मदत करतात आणि सोबतच तुमची एक पॉजिटिव इमेज तयार करतात.

d. फेसबूक लाइव –

तुम्ही एखाद दूसरा पॉडकास्ट लाइव होस्ट करू शकतात. यामुळे तुमचा पॉडकास्ट थोडा वेगळा आणि हटके होईल. तसेच तुम्हाला लोकांचे विचार कमेन्ट मार्फत लिव जाणून घेता येतील.

2. इन्स्टाग्राम (instagram)

हे सोशल मीडिया माध्यम तुम्हाला तुमच्या पॉडकास्टची जाहिरात अधिक सार्जनशील पद्धतीने करण्यास मदत करते.

a. इमेज –

तुमच्या पॉडकास्ट च्या विषयाशी मिळता जुळता एखादा फोटो किंवा एखादी इमेज तुम्ही एडिट करून टाकू शकतात. याखाली तुमच्या पॉडकास्ट च्या पब्लिश ची डेट तसेच तुमच्या पॉडकास्ट च्या भागाची माहिती टाकू शकतात.तसेच तुमच्या पॉडकास्ट ची लिंक द्यायला विसरू नका.

b. विडियो-

इन्स्टाग्राम तुम्हाला शॉर्ट विडियो अप्लाय करण्याची परवानगी देते. यामध्ये तुम्ही तुमच्या पॉडकास्ट ची थंबनेल टाकून तुमच्या पॉडकास्ट चा शॉर्ट ऑडिओ जसे की एखादा ट्रेलर असतो त्याप्रमाणे तयार करू शकतात. तसेच काही विदेओमध्ये तुमच्या पॉडकास्ट च्या एपिसोड ची तारीख आणि त्याच्या कंटेंट बद्दल सांगू शकतात.

c. इन्स्टा स्टोरी ( insta story ) –

जशी तुम्ही फेसबूक स्टोरी टाकतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या इवेंट साठी तुम्ही इनस्टा स्टोरी टाकू शकतात.

d. शावूट आऊट ( shout out ) –

हा एक स्टोरी टाकण्याचाच प्रकार पण यामध्ये तुम्ही स्वत: विषयी न बोलता दुसर्‍यांना प्रमोट करतात. तुम्हाला जे चांगले रिव्यू येतात त्या रिव्यू ला स्टोरी सेक्शन मध्ये हायलाइट करा. सोबतच ज्याने कमेन्ट किंवा तुम्हाला पर्सनल मेसेज केला आहे त्याला टॅग करायला विसरू नका. या छोट्याश्या गोष्टीमुळे लोकं तुमच्याशी वेयक्तिकरित्या जोडले जातील.

e. हयाशटॅग (#hashtag) –

तुमच्या इंस्टा आणि फेसबूक पेज च्या पोस्टमध्ये योग्य hashtag द्यायला विसरू नका. तुमच्या एपिसोडच्या टॉपिक नुसार hashtag द्या. ज्यामुळे ते जास्त ट्रेंड होईल. एका पोस्ट साठी त्यासंबधित जितके hashtag असतील तितके द्या.

f. इन्स्टा लाइव ( insta live )-

कधी कधी तुमच्या चाहत्यांबरोबर लाइव जा. त्यांच्या बरोबर गप्पा मारा. त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्या. हे तुमची अटॅचमेंट वाढवण्यास मदत करेल.

3. ब्लॉग किंवा वेबसाइट (blog or website)

हा जरा कठीण वाटणारा सोशल मीडिया पर्याय असू शकतो पण हा तितकाच प्रभावी सोशल मीडिया पर्याय आहे. ह्याचे वेगवेगळे फायदे आहेत. महत्वाचे म्हणजे तुम्हाला एकाच कंटेंट च्या मदतीने दोन ठिकाणांवरून कमाई करता येते. जे तुम्ही पॉडकास्ट मध्ये सांगतात त्याबरोबरच तुम्ही ते रिटन फॉरमॅट मध्ये देऊ शकतात. अफीलिएट इन्कम तयार करू शकतात. यामध्ये आपण वेबसाइट आणि ब्लॉग वेगवेगळे पाहू.

a. ब्लॉग-

ब्लॉग तुम्ही wordpress आणि google blogger या दोन वेबसाइट चा वापर करून तयार करू शकतात. ब्लॉग पब्लिश करण तसं फ्री आहे पण डोमेन नेम साठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात. डोमेन नेम मुळे लोकांना तुम्हाला शोधणे सोपे जाते. पण फ्री ब्लॉग मध्ये कंटेंट देऊनही तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

b. वेबसाइट-

वेबसाइट जरा ब्लॉगपेक्षा किचकट आहे. पण wordpress वर तुम्हाला वेबसाइट होस्ट करण जरा सोपं आहे. यावर तुम्हाला कोडिंग कराव लागत नाही. थोड गूगल केलत तर तुम्हाला फ्री मध्ये वेबसाइट होस्ट करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *