पॉडकास्ट साठी मदत कशी घ्यावी

जर तुम्हाला तुमचा पॉडकास्ट अधिक उत्तम लेवल चा बनवायचा असेल तर तुम्हाला अनेक लोकांची पॉडकास्ट साठी मदत घेतली पाहिजे. फक्त लोकच नवे तर अनेक माध्यमांचीही मदत तुम्हाला अनेक वेळेला घ्यावी लागेल ज्यामुळे तुम्ही तुमचा पॉडकास्ट उत्कृष्ट बनवू शकता. आपल्या क्षमता मर्यादित आहेत अश्यावेळी जर तुम्हाला काही इतर साधनांची मदत घ्यावी लागली तर त्यात गैर काहीच नाही. बर्‍याचदा तुम्हाला काय यूनिक कंटेंट द्यायचा हे कळत नाही. बर्‍याचदा तुम्हाला नवीन कल्पना सुचत नाही अश्यावेळी तुम्ही तुमच्या पॉडकास्ट साठी मदत घेऊ शकता. पॉडकास्ट साठी मदत घेण्याचे आणखी काही फायदे आहेत ते आता पाहूया.

पॉडकास्टिंग साठी मदत घेण्याचे फायदे-

वेळेची बचत –

कुणाचीतरी तुमच्या पॉडकास्ट साठी मदत घेणे तुमचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचवू शकते. तुम्ही काही प्रत्येकच गोष्टीत तज्ञ असू शकत नाही. सोबतच तुम्ही काही प्रत्येक गोष्टीवर विस्तृत रित्या माहिती संपादन करू शकत नाही. यासाठी तुम्हाला त्या विषयातील तज्ञांची मदत मिळाली तर तुम्ही तुमचा खूप वेळ वाचवू शकतात.

पैश्यांची बचत

Savings/ sources of money/पैश्यांची बचत

तुम्ही पॉडकास्ट साठी मदत घेऊन तुमच्या पैश्यांची बचत मोठ्या प्रमाणात करू शकता. तुम्हाला जर पॉडकास्ट बनवण्याविषयक योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही खूपसा पैसा वाचवू शकतात. अनेक लोकं म्हणतात की पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यासाठी महागड्या साधनांची गरज पडते. पण हे खरे नाही तुम्ही अगदी कमी खर्चात देखील तुमचा पॉडकास्ट बनवू शकतात. KUKU FM च्या रेकॉर्डिंग फीचर वर तर तुम्हाला अगदी प्रॉफेश्नल क्वालिटी रेकॉर्डिंग निशुल्क मिळतं.

उत्तम काम

तुमचा पॉडकास्ट उत्तम क्वालिटी चा व्हावा असं तुम्हाला प्रत्येकाला वाटत असतं. ह्यासाठीच तुम्हाला पॉडकास्ट संबंधित वेगवेगळ्या गोष्टीच अनेकांची मदत घ्यावी लागते. एक से भले दो असे म्हणतात ते खरंच आहे.

पॉडकास्टिंग संबंधित मदत मिळवण्याचे विविध मार्ग

1. पॉडकास्ट ऐकणे

पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी तुम्ही पॉडकास्ट तर ऐकतच असता. पण पॉडकास्ट सुरू केल्यावर पण पॉडकास्ट ऐकणे गरजेचे आहे. तुम्हाला पॉडकास्ट आणि पॉडकास्टशी स्ंबंधित अनेक पॉडकास्ट मिळतील. त्यवरून तुम्ही पॉडकास्ट च्या विविध बाबींवर मार्गदर्शन घेऊ शकता. सोबतच जे पॉडकास्ट होस्ट यशस्वी असतात ते कश्या पद्धतीने त्यांचे प्रेझेंटेशन देतात, हे बघायला पाहिजे. ते जसे बोलतात सोबतच ज्याप्रमाणे तीनच्या पॉडकास्ट चं मार्केटिंग करतात त्या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजे. याने तुमचं पॉडकास्ट आधिकाधिक उत्तम करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.

2. पॉडकास्ट विषयक पुस्तकं वाचणे

बर्‍याच जणांना हा मुद्दा थोडा कंटाळवाणा वाटू शकतो. पण पॉडकास्ट च्या विषयक पुस्तकं वाचण्याला पर्याय नाही. तुम्हाला पॉडकास्ट शी संबंधित वेगवेगळ्या बाबीची माहिती एका ठिकाणी संक्षिप्त स्वरुपात जर हवी असेल तर तुम्ही पुस्तके वाचायला हवीत. तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती, पुस्तकं वाचून होऊ शकते. अनेक पुस्तकं तुंम्हाला इंटरनेट वर फ्री मिळून जातील.

3. पॉडकास्ट विषयक ब्लॉग आणि वेबसाइट

हे अत्यंत उत्तम माध्यम आहे. सोबतच आजच्या घडीला प्रसिद्ध सुद्धा आहे. पण बहुतेक सर्वच ब्लॉग आणि वेबसाइट इंग्लिश मध्येच आहेत. पण घाबरायचे कारण नाही. येथे kuku fm ब्लॉग वर पहिल्यांदाच ह्या विषयावर तुमच्या भाषेत तुम्हाला पॉडकास्ट बनवण्याच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये सखोल माहिती मी देतो आहे. इतर इंग्रजीतले ब्लॉग पण नक्की वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला गरजेच्या सर्व पैलुंची माहिती ब्लॉग्स आणि वेबसाइट मधून मिळू शकते.

4. कोणाचीतरी तुमच्या पॉडकास्ट साठी मदत घेणे

तुमच्या पॉडकास्ट मध्ये उतमोत्तम लोकांची मदत घेणे बर्‍याचदा गरजेचे ठरते. तुम्ही प्रत्येकच विषयावर संशोधन करू शकत नाही. तसेच अनेक लोकांचे अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे असतात.लोकांचे अनुभव तुमच्या पॉडकास्ट मध्ये आणून तुम्ही पॉडकास्ट उत्तम बनवू शकता. अधिकाधिक उत्तम लोकांना तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये बोलावलं पाहिजे. गरजेचं नाही की ते खूपच प्रसिद्ध असतील. तुम्ही एखाद्या हातगाडी चालवण्यार्‍याचे जरी अनुभव विचारलेत तरी तुम्हाला त्यातून बर्‍याचदा काही मजेशीर गोष्टी कळू शकतात. सोबतच जर तुम्हाला तुमच्या पॉडकास्ट साठी मदत जर तांत्रिक दृष्ट्या लागत असेल तरी ती तुम्ही घेतली पाहिजे.

5. पोडकास्टविषयक कोर्स करणे

जर तुम्हाला अत्यंत व्यवस्थित रीत्या पॉडकास्ट विषयक मार्गदर्शन घायचे असेल तर तुम्ही अनेक कोर्स करू शकता. सोबतच अनेक अकादमीज तूम्हाला तो कोर्स केल्याबद्दल सर्टिफिकेशन देतात. अनेक प्लॅटफॉर्म जसे की udemy तुम्हाला अनेक प्रकारे पॉडकास्ट साठी मदत करू शकतात. त्यासोबतच तुम्ही शिकण्यासाठी यूट्यूब चा वापर करू शकता. कोर्स करतांना तुम्हाला अधीक माहीत नसलेल्या गोष्टी एकाच ठिकाणी माहिती होतील. तुम्ही सर्व गोष्टींची काळजी तुमचा पॉडकास्ट बनवतांना घेऊ शकतात. अनेक पेड कोर्सेस बरोबरच खूपसारे फ्री कोर्सेस पण उपलब्ध आहेत.

6. पॉडकास्ट होस्ट

लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्ही तुमचा पॉडकास्ट एक उत्तम ठिकाणी होस्ट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पॉडकास्ट तर तयार करता. पण सोबतच तो पॉडकास्ट उत्तम प्लॅटफॉर्म वर होस्ट करता का नाही हे पण महत्वाच ठरते. पॉडकास्ट होस्ट करणारा प्लॅटफॉर्म असा हवा की ज्याला खूपच मोठा श्रोतृवृंद आहे. सोबतच त्या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला तुमचा पॉडकास्ट किती लोकांनी ऐकला , किती लोकांनी डाऊनलोड केला हे पण कळलं पाहिजे. सोबतच त्या प्लॅटफॉर्मचा इंटरफेस तुमच्या साठी आणि तुमच्या श्रोत्यांसाठी वापरण्यास सोपा हवा. KUKU FM हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पुरवतो.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *