वाईट रिव्यू आणि कमेंट्स चा सामना कसा करावा?

पॉडकास्टिंग करता करता तुम्हाला येत असलेल्या अनेक चांगल्या रिव्यू आणि कमेंट्स बरोबरच , प्रत्येकच क्षेत्रासारखे काही अपरिहार्य असे, काहीतरी नकारात्मक / वाईट रिव्यू आणि कमेंट्सकिंवा अभिप्राय सुद्धा तुम्हाला तुमच्या पॉडकास्ट बद्दल येत असतात. शिवाय, ही रिव्यू आणि कमेंट्सकशी स्वीकारायची आणि कोणत्या मार्गाने त्यांचा सकारात्मक उपयोग करायचा हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.

का?

ह्याला अनेक कारणं आहेत की ज्यामुळे एखादी व्यक्ति तुम्हाला अनेक प्रकारचे रिव्यू आणि कमेंट्स देऊ शकतात. असे अनेक मार्ग आहेत की ज्या प्रकारे एखादी व्यक्ति बरोबर किंवा चुकीचे रिव्यू आणि कमेंट्स टाकू शकते, परंतु आपण त्यांना दोन विस्तृत श्रेणींमध्ये वर्गीकृत करू शकतो,

1.रचनात्मक टिप्पणी करणे

2.काहीही तर्क व रचनावाद नसतांना उदासीनरित्या रिव्यू आणि कमेंट्स करणे

तर, लेखात आपण वाईट रिव्यू आणि कमेंट्संना कसे हाताळावे आणि त्याबद्दल अस्वस्थ न होता त्यात बरेच काही बदल आपण कसे करू शकतो यावर आपण निरनिराळ्या मार्गांनी चर्चा करूयात.

प्रतिसाद द्या

आपण रिव्यू आणि कमेंट्सच्या स्वरूपावर अवलंबून असलेल्या प्रकारांनी याबद्दल विचार करू शकता. जर एखादी टिप्पणी वैयक्तिक असेल तर ती आपल्या पॉडकास्ट च्या कंटेंट च्या पलीकडे जात असेल आणि फक्त आपल्या व्यक्तीगत आयुष्य छेडण्यासाठी लिहिलेली असेल तर , हे आपणावर अवलंबून आहे की अश्या टिप्पण्यांच काय करायचं ? नेहमीच अश्या टिप्पणी नोंदवा (report करा) किंवा त्या काढून (रीमूव करून ) टाका.

परंतु त्या टिप्पण्या जर कंटेंटबद्दल असतील तर आपण नेहमीच सभ्य पद्धतीने त्या टिप्पण्यांस प्रत्युत्तर द्या ज्यामुळे आपण इतरांना आपण किती सभ्य आणि प्रत्येक गोष्ट सकारातमकरीत्या घेणारे आहात हे दिसून येते. तसेच आपले व्यक्तिमत्व व आपल्या पॉडकास्ट चे व्यक्तिमत्व यामुळे सकारात्मक व तुमच्या श्रोत्यांचा आदर करणारे असे तयार होते. कुठल्याही परिस्थितीत आपल्या रागाला डोके वर काढू देऊ नका आणि उत्तरांमद्धे उद्धट होऊ नका.

दुर्लक्ष करा

अनेक टिप्पण्या ह्या केवळ तुम्हाला डीमोटिव्हेट करण्यासाठी दिल्या जातात. निरनिराळ्या प्रकारच्या टिप्पण्या ह्या केवळ तुम्हाला भडकवण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी असतात. एक तर आपण या टिप्पण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करू शकता आणि त्याकडे लक्ष न देता तुमचा पॉडकास्ट अधिक उत्तम करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तर जिथे कुठे तुम्हाला गरज भासेल तिथे तुम्ही अश्या टिप्पण्या सामायिक करू शकतात की ज्या तुमच्या खेळाडू वृत्तीच दर्शन घडवतील.

जाणून घ्या

अनेक लोकं आपल्याला सकरत्मक सूचना देखील करत असतात. अश्या लोकांशी अधिक संवाद वाढवा. त्यांच्या कडून तुमच्या पॉडकास्ट विषयी अधिक काही मतं जाणून घ्या. त्यांनी सुचवलेले बदल जर योग्य वाटत असतील तर त्याबद्दल त्यांना आश्वस्त करा. त्यांना किमान धन्यवाद तरी म्हणा.

सत्य

आपल्याला माहित असलेल्या गोष्टींच लोकं उगाचच परत परत संगत राहतात. बरचदा त्यांना यामधून आपण स्वत: किती ज्ञानी आहोत हे सांगायच असतं. आपण राहातो त्या जगाची हीच रीत आहे. तर, हे सुनिश्चित करा की अशी लोकं आपल्या कार्यात उगाचच अडथळा तर आणत नाही आणि आपण आपले चांगले प्रेक्षक जपा आणि त्यांच्याबरोबर आपला पॉडकास्ट पुढे नेत रहा जे शेवटी नकारात्मक गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरेल.

रिव्यू आणि कमेंट्ससाठी विचारा

चांगले किंवा वाईट असो, आपल्या पॉडकास्टसाठी रिव्यू आणि कमेंट्स देण्याची शिफारस नेहमी करा, जेणेकरून आपला कंटेंट उत्तमरित्या कार्यरत आहे की नाही हे आपणास समजू शकते किंवा पॉडकास्ट च्या ज्या क्षेत्रामध्ये गरज आहे त्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्यासाठी बदल करू शकता. तुम्ही तुमच्या पॉडकास्ट साठी रिव्यू आणि कमेंट्स कसे घेऊ शकतात व त्यानुसार बदल कसे करू शकतात हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सामान्यता पहा

जर आपल्याला एकाच कारणास्तव बरीच रिव्यू आणि कमेंट्स प्राप्त होत असतील तर आपल्याला त्यामागे काही कारण असू शकते ही वस्तुस्थिती ओळखणे आवश्यक आहे, तर आपण त्याकडे लक्ष देतो आहे की नाही याची खात्री करुन घ्या आणि संधी मिळेल तेव्हा त्या चुका दुरुस्त करा.

असे अनेक मार्ग आहेत जे रिव्यू आणि कमेंट्स बद्दल निराश न होता आपण अवलंबू शकतो आणि आपला पॉडकास्ट अधिक चांगला बनवू शकतो.

शेवटी आपण भावनाप्रधान मानव आहोत, म्हणजे एखाद्या क्षणी जर आपल्याला वाईट रिव्यू आणि कमेंट्स मिळाले तर त्या कश्या प्रकारे हाताळाव्या हे आपल्याला नीट समजू शकेते. आपण फक्त ह्या सर्व गोष्टी अश्याच सोडून देऊ शकत नाहीत.आपण नक्कीच याबाबतीत काहीतरी उपाय करू शकतो.

स्तुती योग्य सुधार

ही एक सामान्य प्रवृत्ती आहे की आपण नकारात्मकतेवर सकारात्मकतेपेक्षा अधिक लक्ष केंद्रित करतो यामुळे आपल्याला अधिक त्रास होतो , हे सुनिश्चित करा की आपल्या पॉडकास्ट मध्ये स्तुति करण्यायोग्य अनेकोअनेक गोष्टी असतील.लोकांनी आपसूकच इतका चांगलं बोलावं की नकारात्मक प्रतिक्रिया त्या मागे दाबल्या जाव्यात.

आपले लक्ष काय आहे ते लक्षात ठेवा

आपले लक्ष काय आहे ते लक्षात ठेवा

आपण आपले पॉडकास्ट आपल्याकडे असलेल्या मोठ्या संख्येतील टारगटेड ऑडियन्स च्या आधारावर सुरू केलेले असते या तथ्यासह आपण स्वतः तयार करत असलेला कंटेंट आपल्या ह्या प्रेक्षकांना आवडणे आवश्यक आहे आणि ज्यांना हे आवडत नाही अश्या अल्प श्रोत्या साठी तुमच्या पॉडकास्ट मुळे काही फरक पडत नाही. हे लक्षात घ्या की आपला कंटेंट आपल्या श्रोत्यांच्या मताच्या आणि आवडीच्या विरोधी तर होत नाही ना ? आपण प्रत्येकाचे समाधान करू शकत नाही, पण आपल्या मुख्य व सकारात्मक प्रेक्षकांनी सुचवलेला मार्ग तुम्ही नक्कीच निवडू शकतात.

शेवटी लक्षात ठेवा असे अनेक मार्ग आहेत की ज्याने आपण नकारात्मकतेला तोंड देऊ शकता आणि आपल्यासाठी निरोगी असे आयुष्य मिळवू शकतात . तुम्हाला जो मार्ग उचित वाटतो तो निवडा आणि कोणत्या प्रकारे आपला फायदा होऊ शकेल याचा सुद्धा विचार मनात ठेवा.

कधीही हार मानू नका, कारण प्रत्येकच गोष्टीत तुम्ही अगदी प्रत्येकच वेळेला 100% देऊ शकत नाही, आपण स्वत: साठी आणि आपल्याला आनंद मिळवा म्हणून कंटेंट तयार करत असतो.

आपण जे करीत आहात त्यात ते मजा घेऊन करा आणि मला खात्री आहे की आपण आपल्या पॉडकास्ट साठी श्रोत्यांची गर्दी नक्कीच आकर्षित कराल !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *