पॉडकास्ट मॉनेटाइज कसा करावा ?

आजचं हे टॉपिक खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पॉडकास्ट बनवायला आवडत हे ठीक आहे पण पुढे जाऊन तुम्हाला हा प्रश्न नक्की पडू शकतो की आपण पॉडकास्ट पब्लिश करतो त्याचा आपल्याला काही उपयोग आहे की नाही? तुमचं पॉडकास्ट जर उत्तम कंटेंट देत असेल तर तुम्हाला तुमच्या आवाजाला प्रसिद्धी तर मिळणारच आहे, पण विचार करा की जर याच बरोबर तुम्हाला तुमचा पॉडकास्ट मॉनेटाइज करून पैसा पण मिळू लागला तर किती छान होईल ! काही लोकांनी भारतात यूट्यूब, फेसबूक, इत्यादि जेव्हा आले होते तेव्हापण त्यांना फक्त एक मनोरंजनाचे ऐप समजलं गेलं होतं पण काही दिवसातच अनेक लोक त्याच्यातून कमाई करायला लागले. तसच येत्या दिवसात पॉडकास्ट चं पण तुम्हाला बघायला मिळू शकतं. मग प्रश्न असा आहे की तुम्ही लोकांना फक्त कमाई करतांना बघणार आहात की स्वत: ह्याची सुरुवात करणार आहात ? ह्या लेखामध्ये आपण हेच बघणार आहोत की कश्याप्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमांतून पॉडकास्टच मॉनेटाइजेशन करून पैसा कमाऊ शकतो.

सोबतच हे पण लक्षात ठेवायला हवं की पॉडकास्ट प्रसिद्ध करणं काही दिवसात शक्य नाही त्याला काही महिन्यांचा संयम गरजेचा आहे. तसचं सतत चांगला कंटेंट देणं आणि सातत्याने देत राहणं पण गरजेचं आहे. तुम्हाला नक्की किती लोक ऐकतात ह्यावरून ठरतं की तुम्ही पॉडकास्टच मॉनेटाइजेशन करून नक्की किती पैसा कामवणार आहात. तुम्हाला ऐकणारे लोक जितके जास्त तितका तुम्हाला पॉडकास्ट मॉनेटाइज करून पैसा कमावण्याचा वाव अधिक.

पॉडकास्टच मॉनेटाइजेशन सुरू करण्याआधी……

पॉडकास्टच मॉनेटाइजेशन सुरू करण्याआधी या गोष्टी बरोबर आहेत का नाही ते नक्की तपासून घ्या,

1.पॉडकास्टचा कंटेंट

2.सादरीकरण

3.लोकसंपर्क

पॉडकास्टच मॉनेटाइजेशन

1.कंटेंट-

पॉडकास्ट चं आर्थिकीकरण करण्याच्या आधी स्वत: ला विचारा की तुमचं कंटेंट असं आहे का की तो तुम्ही निरंतर देत राहू शकतात. कारण पॉडकास्ट हा एकदा बनवला आणि तो मॉनेटाइज करून पैसा फक्त एकाच पॉडकास्ट वर येत राहील असं होत नसतं. पॉडकास्ट मध्ये चांगला कंटेंट व्यवस्थित देत राहणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्ही तुमच्या पॉडकास्टच मॉनेटाइजेशन करून पैसे कामावण्यासाठी सक्षम हौ शकतात आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुम्ही चांगले लोक जमवतात आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडऊन आणू शकतात.

2.सादरीकरण-

तुमचं सादरीकरण कुठल्या पातळीवरचं आहे याचं स्वतः निरीक्षण करा. त्याचप्रमाणे तुम्हाला मिळणार्‍या श्रोत्यांच्या आकडेवारी नुसार व लोकांच्या येणार्‍या प्रतिक्रीयांवरून सुद्धा तुम्हाला तुमचं सादरीकरण बदलण्यासाठी मदत मिळू शकते. सोपी गोष्ट आहे, जर तुमच्या मध्ये तुमच्या श्रोत्यांना खिळवुन ठेवण्याची कला आहे तर तुमचा पॉडकास्ट मॉनेटाइज करून पैसे कमावण्याची शक्यतापण आधिक आहे.

3.जनसंपर्क वाढवणे-

पॉडकास्ट तयार केल्यावर जनसंपर्क वाढवणे गरजेचे आहे. हे तुमचा श्रोतृवर्ग वाढवण्यास मदतनीस ठरणार आहे. पॉडकास्ट तुम्ही कितीही चांगला तयार केलात पण लोकांना तुम्ही पॉडकास्ट तयार केलात हे कळलंच नाही तर काय उपयोग? म्हणून सोशल मीडियावर चांगला जनसंपर्क ठेवणं आणि तुमच्या पॉडकास्ट ची जाहिरात करत राहणं कधीही चांगल.

पॉडकास्टच मॉनेटाइजेशन करून पैसे कामावण्याचे विविध मार्ग….

1. अभ्यासक्रम तयार करणे –

पॉडकास्ट वर तुम्ही पूर्णच्या पूर्ण कोर्स तयार करू शकतात. बर्‍याच लोकांना आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक नव्या गोष्टी शिकायच्या राहून जातात असं बर्‍याचदा वाटत असतं, बर्‍याचदा त्यांना वेळ नसतो, आश्यावेळी जर त्यांना काही नवीन गोष्टी जर ऐकता ऐकता शिकता आल्या तर ते त्यांना वरदानच ठरेल. एक जॉब करतांना सतत काही नवीन स्किल्स शिकावे लागतात. काळ झपाट्याने बदलत असतो पण आपल्याकडे बदलण्यासाठी वेळ मात्र कमी असतो, आश्यायावेळी एका कामात अनेक कामं करणं भाग असतं. आशयावेळी जर प्रवास करतांना किंवा वॉक घेतांना जर तुम्ही पॉडकास्ट वरुन काही शिकू शकत असाल तर ते फायद्याच्या होतं. अगदी कोर्स जरी असला तरी एकदमच मोठा पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यापेक्षा पंधरा मिंटांचा एक पॉडकास्ट देणं चांगलं ठरेल. तुम्ही एखादी भाषा, किवा बिझनेस कम्युनिकेशन तसचं कायदे विषयक ज्ञान इत्यादि देऊ शकतात.

2. प्रायोजकता (sponsorship)-

प्रयोजकता हे कुठल्याही पॉडकास्ट साठी आणि तुमचा पॉडकास्ट मॉनेटाइज करण्याचे उत्तम माध्यम आहे. पण त्याचबरोबर हे जरा वेळ मागणारं आहे. कंपनीच ध्येय एक असतं की त्यांच्या नियोजीत ग्राहकांपर्यंत त्यांचे उत्पादनं पोहोचवत राहणं. म्हणून बर्‍याच कंपन्या किवा जाहिरातदार तुमचा पॉडकास्ट किती लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि जी लोक तो ऐकता आहेत किंवा जो तुमच्या पॉडकास्ट चा विषय आहे तो त्यांच्या उत्पादन किवा सेवांच्या अनुरुप आहे का हे बघून तुम्हाला प्रायोजकता देत असतात.पण अनेक लोक तुम्हाला कमी श्रोते असले तरी प्रयोजकता देऊ शकतात. तुमच्या पॉडकास्ट च्या माहिती प्रयोजकांना देऊन तुम्ही प्रयोजक मिळवू शकतात आणि तुमच्या पॉडकास्टच मॉनेटाइजेशन करू शकतात.

3. वस्तु विकणे-

काय ? हो तुम्ही बरोबरच वाचलं तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तूंची महिती तुमच्या पॉडकास्ट मधून देऊ शकतात. यासाठी तुम्ही कोणत्या वस्तु नक्की विकू शकतात आणि त्यासाठी कुठल्या कल्पना वापरू शकतात हे तुमच्यावर आहे. तुम्ही एखाद्या पुस्तकाचा सारांश देऊ शकतात आणि ते विकत घेण्यासाठी तुमच्या श्रोत्यांना सांगू शकतात. तसचं एखाद्या हेड्फोन ची माहिती देऊ शकतात. कुठल्याही अश्या वस्तु विकणार्‍या कंपन्यांना तुम्ही सेवा देऊन उत्तम कमाई करू शकतात.

4. सेवा विकणे-

तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा पॉडकास्ट च्या माध्यमातून विकू शकतात. तुम्ही विमा कंपन्यांशी करार करून त्यांचे प्लान लोकांना विकू शकतात. तुम्ही गुंतवणुकी विषयक पॉडकास्ट तयार करत असाल तर गुंतवणूकीशी सलग्न कंपन्यांची जाहिरात करू शकतात. तसचं आरोग्य विषयक जर तुमचा पॉडकास्ट सेल तर एखाद्या ऐप किवा वेबसाइट च्या सेवेची जाहिरात करून पैसे कमावु शकतात.

5. संलग्न विक्री (AFFILIATE SALE)-

हा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला पॉडकास्ट मधून पैसे कमविण्यासाठी. तुम्ही वेगवेगळ्या विषयावरची पॉडकास्ट तयार करतात, त्यानुसार तुम्ही अनेक त्या संबंधित गोष्टींची विक्री करू शकतात, जसे की एखाद्या पुस्तकाचा सारांश तुम्ही रेकॉर्ड केलात की त्याची लिंक जिथून लोकं ते पुस्तक ऑनलाइन विकत घेऊ शकतात ती द्यायची आणि त्यासाठी त्या विक्री करणार्‍या वेबसाइट कडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. अश्या अनेक गोष्टी तुम्ही विकू शकतात.

KUKU FM वर तुम्हाला तुमच्या सादरीकरण व इतर गोष्टींच्या पूर्तीनुसार तुमच्या पॉडकास्ट चं

आर्थिकीकरण करण्याची संधी मिळते. जर तुम्ही KUKU FM kalakar पेज च्या किमान बाबी पूर्णा करत आसालं तर तुम्हाला तुमचं पॉडकास्ट आर्थिक कमाई साठी वापरता येतं. kuku fm तुमच्या गरजेच्या ब्रॅंड शी तुमची सलगी घडऊन आणते, तसेच तुमचा पॉडकास्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदतही करते.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *