पॉडकास्ट का तयार करावा ?

हे युग काहीतरी नवीन करण्याचे आहे. प्रत्येकाला स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे, प्रत्येयकालाच गर्दीपासून स्वत: ला वेगळे करावे अशी इच्छा आहे. पण कसे ? हा प्रश्न बर्‍याच लोकांना त्रास देतो. प्रत्येकाला काहीतरी करण्याची उत्कट इच्छा असते, परंतु असे काय करावे की आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि लवकरच आपल्याला त्यातून प्रसिद्धीही मिळेल ? आपल्या मनातही असे प्रश्न असल्यास आपल्याला आपले उत्तर या लेखात मिळू शकते.

पॉडकास्टिंग हा एक नवीन ट्रेंड आहे, जो जलद गतीने प्रसिद्ध होतो आहे. दररोज येथे नवीन श्रोते आणि कलाकार येत असतात. लोकांकडे मनोरंजांनासाठी वेगळ्या वेळेची कमतरता असते आणि म्हणूनच त्याच वेळी उर्वरित मनोरंजन आणि ज्ञान माध्यमांपेक्षा पॉडकास्ट ऐकणे अधिक अनुकूल आहे. लोकांना एका ठिकाणी लक्ष देऊन काहीतरी मनोरंजन अनुभवत राहणे सध्या आवडत नाही .लोकांचा इतर माध्यमातील रस सुद्धा आता कमी होतो आहे. अशा परिस्थितीत कुठल्यातरी अश्या माध्यमाचे आगमन, ज्यावर वेळ शिल्लक राहतो आहे, आणि ज्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही ,आणि मनोरंजन आणि ज्ञान देखील आपल्याला ज्यातून मिळू शकते, यापेक्षा चांगले काय असू शकते. पॉडकास्ट अगदी असेच माध्यम आहेत. अशा परिस्थितीत ह्या माध्यमाला लवकरच प्रसिद्धी मिळू शकेल याबद्दल कुठलीही शंकाच नाही.

आता जर आपण सुद्धा काहीतरी वेगळे करू इच्छित असाल आणि आपल्याकडे संसाधनांचा अभाव असेल आणि इतर कुठला वेळ काढण्यासाठी आपल्याला त्रास होत असेल तर आपण सुद्धा पॉडकास्ट बनवण्याचा विचार करू शकतात. आपण पॉडकास्ट का बनवावा याबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर , शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा.

1. पैशाचा स्त्रोत

Savings/ sources of money

पहिल्यांदा पॉडकास्ट का बनवावा हे सांगतांना मला सांगायला आवडेल की आपण सर्व, प्रत्येक गोष्ट काही ना काही तरी उद्देशानेच करत असतो किंवा अनेकदा आपण ती मनाला चांगली वाटते, आनंद देते यामुळे सुद्धा करत असतो. अश्या परिस्थितीत, आपल्याला फक्त आपल्या बोलण्याद्वारे पैसे मिळविण्याची संधी मिळाली तर ही एक चांगली संधी असू शकते. पॉडकास्ट आत्ता एक नवीन माध्यम असल्याने, चांगल्या कंटेंट ची यात मोठी मागणी आहे. आपल्याकडे एखाद्या विषयाबद्दल चांगले ज्ञान असल्यास, आपला फोन घ्या, कुकू एफएम ऐप इंस्टॉल करा आणि आपल्या स्वतःच्या पॉडकास्ट ला सुरुवात करा. लोकं जस जसा आपला कंटेंट पसंत करतिल तस तसं , कुकू एफएम आपल्या पॉडकास्ट मार्फत कमाई करण्यासाठी आपल्याला मदत करेल.

2. सर्जनशीलता आणि प्रतिभा यांचे व्यासपीठ

दुसरं म्हणजे पॉडकास्ट का बनवावा ? तर ,आपल्याला जर कथा सांगणे, किंवा भाषण देणे किंवा वाचन आवडत असल्यास – आपण आपल्या कौशल्यांना आणि सुप्त गुणांना व्यासपीठ देऊ शकतात. प्रत्येकाला आपले बोलणे आणि आपली कला लोकांपर्यंत पोहोचवणे आवडते, परंतु सामान्यत: आपल्या आजूबाजूचे लोक या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाहीत. परंतु या कौशल्यांसाठी तुम्हाला जर एक उत्तम व्यासपीठ आणि त्यासोबतच कीर्तीसुद्धा मिळत असेल तर आपण एकदा त्या व्यासपीठाचा वापर करून पाहण्यास काय हरकत आहे ?. यामुळे आपल्याला कळू शकेल की आपण नक्की पॉडकास्ट का बनवायला हवा.

3. ऑडिओ सामग्रीच्या क्षेत्रात अपार संभाव्यता आह

तिसरं म्हणजे पॉडकास्ट का बनवावा याचं कारण देतांना मला सांगायला आवडेल की, लोकांच्या व्यस्ततेमुळे त्यांना तासनतास बसून व्हिडिओ पाहण्यास, पुस्तक वाचण्यासाठी किंवा मोठमोठे लेख वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत ऑडिओ कंटेंटचे आगमन त्यांच्यासाठी एक वरदान आहे. येत्या काळात ऑडिओ कंटेंट ची मागणी झपाट्याने वाढणार आहे. का? तर तुम्हीच विचार करा की एखादी वेबसाइट तुम्ही उघडली की त्यानंतर तुम्हाला ती वाचायचा कंटाळा येतो की नाही ,म्हणूनच जर आशयावेळी तुमच्यासाठी तो कंटेंट ऑडिओ माध्यमात उपलब्ध झाला तर तुम्हाला इतका काही कटाळा येणार नाही , या क्षेत्रात ज्यांना रस आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

4. जाहिरात करू शकतात.

पॉडकास्ट का बनवावा याच अजून एक कारण म्हणजे आपल्याकडे एखादा ब्रँड किंवा कंपनी असल्यास, किंवा आपण जाहिरातींच्या क्षेत्रात असल्यास आपण पॉडकास्टवर आपले उत्पादन किंवा सेवा विकू शकतात किंवा त्याची जाहिरात करू शकतात. या व्यतिरिक्त, जर आपल्याला विपणन क्षेत्रात रस असेल तर आपल्यासाठी बर्‍याच शक्यता येथे उपलब्ध आहेत. एखाद्या दुसर्‍याच्या उत्पादनाचा रिव्यू आपल्या पॉडकास्ट मध्ये समाविष्ट करून किंवा त्यांची जाहिरात करुन आपण बरेच पैसे आणि कीर्ती मिळवू शकतो. जाहिरातींच्या क्षेत्रात कमाईची क्षमता नेहमीच जास्त असते.

5. मजेदार आणि सर्जनशील कार्य

आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात नवनवीन कल्पना सुचत असल्यास आणि त्या आपण प्रत्यक्षात आणू इच्छित असल्यास, पॉडकास्ट तयार करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. पॉडकास्ट बनवणे तुमच्या साठी खूप मजेदार ठरू शकते. आपल्याला यामध्ये बर्‍याच संसाधनांची देखील आवश्यकता नाही आणि आपण आपल्या स्वत:ची सर्जनशीलता देखील जपू शकतात. यासाठी कोणत्याही अतिरिक्त परिश्रमांची आवश्यकता देखील नसते.

या सर्व गोष्टींवरून तुम्हाला हे समजलेच असेल की तुम्ही पॉडकास्ट का बनवावा ? नक्कीच हे माध्यम खूप प्रसिद्ध होते आहे आणि या क्षेत्रात येणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून उशीर करू नका आणि आपल्यातील कलाकार आपल्यातून बाहेर काढा. कुकू एफएम ऐप आजच इंस्टॉल करा आणि पॉडकास्ट च्या जगात प्रवेश करण्यासाठी योग्य बना.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *