Why should I listen to Podcasts

बरचदा लोकं मला विचारतात की आम्ही इतर इतकी मनोरंजनाची साधने असतांना आम्ही मुळात पॉडकास्टच का ऐकावा ? आम्ही पॉडकास्ट का सुरू करावा ? असा मुळात पॉडकास्ट का खास आहे ? तर आज आपण विचार करणार आहोत याच गोष्टीवर की तुम्ही नक्की पॉडकास्ट का व कश्यासाठी ऐकायला हवा ? पॉडकास्ट का इतर साधनांपेक्षा फायद्याच ठरतो ? अश्या अनेक गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत ज्या आपल्याला पटवून देतील की पॉडकास्ट का खास आहे.

1. फक्त मनोरंजनाचे साधन नव्हे ! –

सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला हवं की पॉडकास्ट का ऐकावा तर हा फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणून मर्यादित नाही. पॉडकास्ट मध्ये मनोरंजन हा एक भाग असला तरी बरेच लोकं पॉडकास्ट वरून अनेक नवनवीन गोष्टी शिकत असतात. अनेक कोर्सेस हे पोडकास्ट च्या माध्यमात उपलब्ध असतात. तुम्ही अनेक पुस्तकं पॉडकास्ट मध्ये ऐकू शकतात जे तुमच्या ज्ञानात भर पाडतात. त्यामुळे जर कोणी असं समजत असेल की पॉडकास्ट हे फक्त तुमच्या मनोरंजनाचं माध्यम आहे तर तसं नाही, पॉडकास्ट मध्ये तुम्ही तुमचं ज्ञान सुद्धा खूप वाढवू शकतात.

2. कामात काम होणे –कामात काम होणे

पॉडकास्ट का ऐकावा याच दुसरं कारण म्हणजे हा ऐकण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी अगदी त्याजवळ बसून आणि लक्ष देऊन ऐकण्याची गरज नाही. तुम्ही काही इतर कामं करत असाल तरी त्या कामांसोबतही तुम्हाला पॉडकास्ट ऐकता येतो. अनेकदा प्रवास करतांना किंवा व्यायाम करतांना किंवा चालतांना तुम्हाला पॉडकास्ट ऐकत नवीन नवीन गोष्टी कळतात. ह्या उलट इतर माध्यम त्यांच्या वेळे नुसार मनोरंजन करत असल्यामुळे तुम्हाला काही दुसरे काम करता येत नाही आणि पूर्ण वेळ मनोरंजांनासाठी किंवा एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी लागतो.

3. अधिक उपयुक्त जीवन शैली –

आधीच सांगितल्याप्रमाणे पॉडकास्ट तुमची जीवनशैली अधिका अधिक उपयुक्त आणि उत्तम बनवण्यासाठी मदत करते. पॉडकास्टच्या माध्यमात अनेक पुस्तकं उपलब्ध आहात ते तुम्ही इतर कामं करत ऐकू शकतात. अनेक कोर्स उपलब्ध असतात जे तुम्ही तुमच्या लांबच्या प्रवासात ऐकत तुमचा वेळ सत्कारणी लावू शकतात. आपल्या घरातील कामे करतांना आपण अनेकदा बोर होत असतो अश्या वेळी जर त्यांना पॉडकास्ट च्या माध्यमातून अनेक गोष्टी ऐकता आल्यात तर त्यांना सुद्धा कामात जरा आनंद मिळू शकतो. हयाप्रकारे पॉडकास्ट मुळे तुमची जीवनशैली अधिक उपयुक्त आणि आनंदी बनु शकते.

4. निशुल्क-

बरेच पॉडकास्ट आजच्या घडीला निशुल्क उपलब्ध आहेत.जर तुम्हाला टीव्ही किवा वेबसेरीस पहायच्या असतील तर तुम्हाला त्यासाठी सबस्क्रिपशन फी द्यावी लागते. याउलट जर पॉडकास्ट ऐकायचा असेल तर बहुतेक पोडकास्ट फुकट आहेत.अनेक उत्तमोउत्तम गोष्टी ,टॉक शो, इत्यादि तुम्हाला उपलब्ध होतात.

5. तुमच्या वेळेनुसर ऐकण्याची सुविधा –

बरेचशे पॉडकास्ट होस्ट करणारे ऐप तुम्हाला पॉडकास्ट डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.kuku fm वर तुम्हाला सर्वच पॉडकास्ट डाऊनलोड करून ठेवता येतात आणि नंतर जरी इंटरनेट कनेक्शन नसेल तरी ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही ऐकू शकतात. डाउन लोड करण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध असते. यामुळे एकदा डाऊनलोड केल्यावर तुम्हाला पॉडकास्ट नक्की कुठल्या वेळेवर ऐकायचा आहे याचे बंधन नसते. तुम्ही कुठेही आणि केव्हाही तुमचा पॉडकास्ट तुमच्या वेळेनुसर ऐकू शकतात आणि तुमच्या संग्रहात ठेऊ शकतात. याउलट अनेक माध्यमं अशी आहेत की तुम्हाला त्यांच्या वेळेनुसारच पाहवी लागतात आणि शक्यतोर ते संग्रहीत पण करून ठेवता येत नाही. म्हणून पॉडकास्ट ऐकण इतर माध्यमांपेक्षा वेगळं ठरत.

6. पॅसिव इन्कम (passive income) –

पॉडकास्ट तयार करून तुम्हाला तुमचं एक पॅसिव इन्कम मिळवण्याची संधि मिळते. पॅसिव इन्कम म्हणजे तुमच्या मुख्य कमाई पेक्षा इतर माध्यमातून येणारी कमाई. जर तुमच्यामध्ये पॉडकास्ट तयार करण्याची आवड आणि हुनर दोन्हीही असतील तर तुम्ही थोड्या मेहनतीने आणि थोड्या काळाने तुमचे एक पॅसिव इन्कम तयार करू शकतात. प्रत्येकालाच दुसरे काहीतरी उत्पानांचे मार्ग शोधावे लागतात आश्यावेळी पॉडकास्ट हे एक पॅसिवे इन्कम करण्यासाठी उत्तम माध्यम ठरतं. तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल की तुमच्या पॉडकास्ट चे आर्थिकीकरण कसे करावे तर KUKU FM वर उपलब्ध असलेल Rich Dad Poor Dad हे ओडिओ स्वरुपातील पुस्तक अवश्य एकदा ऐका.

7. सोप-

पॉडकास्ट वापरण्यासाठी आणि तयार करण्यासाठी अत्यंत सोपं मध्यम आहे. पॉडकास्ट ऐकण्यासाठी तर कुठले पैसे अजिबात लागतच नाहीत परंतु पॉडकास्ट तयार करण्यासाठी पण जास्त काही पैसे किंवा श्रम लागत नाहीत. तुम्ही kuku fm वर तुमचं पॉडकास्ट फक्त तुमच्या मोबाइल च्या मदतीने बनवू शकतात. तसेच अनेक लोकांपर्यंत तो पॉडकास्ट एकदम सहज पणे kuku fm च्या माध्यमातून पोहोचवू शकतात. पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यासाठी एक चांगल्या आयडिया शिवाय जास्त काही संसाधन लागत नाहीत.

8. विरंगुळा आणि मनोरंजन-

आणि लास्ट बट नोट द लिस्ट म्हणतात तसं पॉडकास्ट हे एक उत्तम मनोरंजनाचे साधन आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींपासून ते टॉक शो पर्यंत सर्व प्रकारचे मनोरंजन आणि माहिती उपलब्ध करून देते. इथे अनेक प्रकारच्या मनोरंजनची जसे की ऑडिओ बुक्स , गोष्टी , टॉक शो यांची अक्षरशः लाट आहे. तुम्हाला अनेक उत्तम कलाकार, लेखक सर्वच KUKU FM च्या मार्फत ऐकायला मिळतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकतील.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *