how to start a podcast

पण काही श्रीमंत लोकांसारखे त्यांच्याकडे महागडे संसाधनं नसतात. अश्या लोकांना निराश होण्याची काहीच गरज नाही. यासाठी विशेष काही सेट-अप ची पण गरज नाही. बस तुमचा स्मार्ट्फोन आणि इंटरनेट यांच्या मदतीनं तुम्ही तुमची कला जगात पोहोचऊ शकतात॰

जर तुम्ही पॉडकास्टची सुरुवात करत असाल किवा रेडियोचे शौकीन असाल तर पॉडकास्ट च नाव तुम्ही ऐकलच असेल. सर्वांना नक्की माहिती आहे का पॉडकास्ट म्हणजे काय ते ? कधी तुम्ही विचार केलात का की पॉडकास्टची सुरुवात कशी केली जाऊ शकतं ? आणि हो पॉडकास्टची सुरुवात करून तुंम्हाला पैसे पण कमावता येतात ते ? तर चला जाणून घेऊया की पॉडकास्ट काय आहे आणि तुम्ही तुमच्या स्वत:च्या पॉडकास्टची सुरुवात कशी करू शकतात ?

आजच्या काळात तुमच्या बोलण्याची, आवाजाची पण एक किम्मत आहे आणि मजेदार गोष्ट ही आहे की ही किम्मत रेडिओपुरताच सिमित नाही. भारतात अगदी थोड्याच काळाआधी एक मस्त प्लॅटफॉर्म समोर आलेला आहे. हा भारतात तेजीने त्याचे पाय पसरतो आहे. हा प्लॅटफॉर्म म्हणजे पॉडकास्ट. येवढच नव्हे, तर पॉडकास्टची सुरुवात करणे तुम्हाला प्रसिद्धी आणि पैसा पण मिळाउन देऊ शकतो. बर्‍याच लोकांना आपले अनुभव, विचार, गोष्टी अनेक लोकांना सांगणं खूप आवडत. ही एक अशी कला आहे जिला खासकरून काही कौतुक मिळत नाही. जर तुमच्यातपण अशी काही कला आहे , तर याचा योग्य उपयोग व्हायला हवा. पॉडकास्ट अश्या लोकांसाठी उत्तम संधी आहे. पॉडकास्टची सुरुवात करण्यासाठी पाहिजे एक स्मार्टफोन आणि इंटरनेट. आता तयार आहात तुम्ही एक उत्तम पॉडकास्टची सुरुवात करण्यासाठी. चला तर मग पाहूया की पॉडकास्टची सुरुवात कशी करावी

पॉडकास्टची सुरुवात करण्यासाठी काय काय हवं ?

1.स्मार्ट्फोन

2.रेकॉर्डिंग माइक / इयरफोन

3.इंटरनेट

4.पॉडकास्ट साठीचा प्लॅटफॉर्म

5.पॉडकास्ट चा विषय

पॉडकास्ट सुरू करण्यासाठीच्या पायर्‍या;-

1) ऐप इंस्टॉल करा

पॉडकास्ट बनवण्यसाठी सर्वात पहिले आपल्या मोबाइल वर ऐप इंस्टॉल करा.गूगल प्ले स्टोर किवा अॅपल स्टोर वर तुम्हाला खूप ऐप्स मिळून जातील. KUKU FM पॉडकास्ट साठी एक उत्तम ऐप आहे. हे ऐप फ्री आहेत.

2)प्रोफाइल बनवा

ऐप इंस्टॉल केल्यानंतर आपले प्रोफाइल तयार करा.एकडेच तुमच्या पॉडकास्ट चं नाव आणि फोटो टाका.

3)विषय निवडा

पण तुम्ही नक्की लोकांना की ऐकवणार आहात ? याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर खूप छान पण जर माहीत नाही तर एकदा व्यवस्थित विचार करा.

4) पॉडकास्ट च रेकॉर्डिंग सुरू करा

पॉडकास्टची सुरुवात

आता तुम्ही तुमचं पॉडकास्ट तयार करण्यासथी पूर्ण तयार आहात. तुम्हाला फक्त तुमचं विषय डोक्यात ठेऊन सुरू करायचं आहे. ऐप वर असलेल्या रेकॉर्डिंग किवा प्लस बटन वर क्लिक करून आणि इयरफोन आणि माइक लाऊन बोलयाला सुरुवात करा॰ लक्ष ठेवा की आवाजाचा कुठला बाहेरील अडथळा रेकॉर्डिंग खराब करणार नाही.

5)आवाजाची एडिटिंग करा

ह्यासाठी तुम्हाला एडिट बटनचा वापर करावा लागेल. हयानंतर तुमच्याकडे संगीत किवा कुठल्यातरी गाण्यांचे ऑप्शन्स येतील. तुमच्या अवडीनुसार रेर्कोर्डिंग एडिट करा. आता तुमचं पॉडकास्ट सुरू होंयसाठी तयार आहे.

6) पब्लिश करा

अश्याप्रकारे तुमचं पॉडकास्ट तुम्ही सुरू करू शकतात. एक उत्तम पॉडकास्ट बनवण्यासाठी ह्या स्टेप्स चा वापर करा. लक्षं ठेवा की तुमचं कोंटेंट एका ठराविक वेळेत पूर्ण होईल आणि अपलोड केलं जाईल. जेणेकरून लोकं तुमच्याशी जोडलेली राहतील आणि तुम्हाला त्यांना ऐकावसं वाटत राहील. वेळेत जर कोंटेंट तुम्ही वेळेत दिला नाही किवा त्याची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही तुमचे अमूल्य श्रोते गमाऊ शकतात. पण जर तेच तुम्ही वेळेत कोंटेंट दिलात तर पोडकास्ट तुमच्या प्रसिद्धीचं माध्यम पण बनु शकतं. आता तुम्हाला कळलं आहे की पॉडकास्ट नक्की कसा बनवावा. पॉडकास्ट चे नक्की फायदे काय असतात. मग वाट कसली पाहात आहात , लागा की कामाला !

मित्रांनो, पोडकास्ट हे भारतात आत्ता आत्ता आलं आहे. अनेकदा अनेकवेळा आपल्याला लक्षात येतं की ही नवीन गोष्ट आपण जर सुरुवातीपासून केली असती तर आज आपण कुठल्याकुठे राहिलो असतो.

पोडकास्ट ऑलरेडी विदेशात अनेक लोकांच पूर्णवेळ कमाईचं साधन आहे. भारतातही होणार आहे. म्हणूनच जर तुमच्या आवाजात जादू असेल तर ही जादू लोकांना दाखवायला वेळ लाऊ नका !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *