पॉडकास्ट बनवतांना ह्या गोष्टी टाळा !

आपण मागच्या भागात अनेक गोष्टी पाहिल्या की ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना टाळायला हव्यात. आपण आजच्या भागात पण अश्याच काही गोष्टींची चर्चा करणार आहोत ज्या तुमचा पॉडकास्ट बनवतांना तुम्हाला घातक ठरू शकतात. या गोष्टी बर्‍याचदा तुमच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ आणू शकतात. बर्‍याचदा तुमच्या प्रेक्षकांना ह्या गोष्टी आवडत नसतात. पॉडकास्ट शी किंवा कुठल्याही कलेशी संबंधित काही कायदे असतात. अश्या कायद्यांचे उल्लघनही कळत नकळत तुमच्या कडून होत असते. या गोष्टींची पॉडकास्ट बनवतांना माहीती करून घेतली की तुमचा पॉडकास्ट बनवतांना सगळ्या दृष्टीने परिपूर्ण बनेल. सोबतच तुम्हाला पुढे काही त्रासही होणार नाही. तुम्ही आणि तुमचा पॉडकास्ट लोकांना अधिक पसंत पडेल. चला तर मग अधिक वेळ न करता अधिक अश्या काही गोष्टी पाहुयात की ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना टाळायला हव्यात.

1. कॉपीराइट 

इतरांच्या कंटेंटच्या कॉपीराइटचा आदर करा. केवळ आपण तयार केलेला कंटेंट किंवा आपण वापरण्यास अधिकृत आहात तोच कंटेंट आपला पॉडकास्ट बनवतांना आपल्या पॉडकास्ट वर अपलोड करा. याचा अर्थ असा की आपण बनविलेलेच ऑडिओच फक्त आपण आपल्या पॉडकास्ट वर अपलोड करू शकतात. आपल्या ऑडिओमध्ये एखाद्या दुसर्‍याच्या मालकीचा कॉपीराइट असलेला कंटेंट वापरू नका. जर दुसर्‍याच्या मालकीचा कंटेंट, जसे की संगीत ट्रॅक, इतरांच्या कॉपीराइट प्रोग्रामचे काही ऑडिओज किंवा अन्य वापरकर्त्यांद्वारे बनविलेले ऑडिओज वापरू नका. जर तुम्ही या गोष्टीचा भंग केलात तर कॉपीराइट अॅक्ट खाली तुमच्यावर कारवाई होऊ शकते. जर तुम्हाला तो कंटेंट वापरण गरजेचच वाटत असेल तर त्याच्या मालकाकडून तशी लेखी परवानगी घ्या.

2. प्रायवसी

ज्याप्रमाणे तुम्ही इतरांचा कंटेंट वापरू शकत नाहीत त्याचप्रमाणे तुमचाही कंटेंट कोणी तुमच्या परवानगी शिवाय वापरू शकत नाही. तुम्ही सुद्धा अश्या गोष्टी न टाळता तुमच्या पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म ला त्याबाबत तक्रार करायला हवी. हे एक हेल्दि कॉम्पिटिशन जपण्यासाठी गरजेचे आहे. जर तुम्ही तुमची प्रायवसी जपली नाहीत तर एकूणच पॉडकास्ट विश्वात कॉपीराइट चा भंग जास्त प्रमाणात व्हायला लागेल. यामुळे एक पॉडकास्टर चं नैतिक कर्तव्य म्हणून तरी तुम्ही हे केलं पाहिजे. सोबतच जर तुम्ही पॉडकास्ट ची प्रायवसी जपली नाहीत तर हे तुमच्या पॉडकास्ट च्या लोकप्रियतेला देखील बाधा ठरणार आहे.

3. तोतयागिरी

तुम्ही कोणीतरी वेगळेच व्यक्ति आहात असे भासवून खोट्या पद्धतीने लोकांना पॉडकास्ट ऐकवण्यासाठी आकृष्ट करणे ह्याला तोतयागिरी असे म्हटले जाते. तुम्ही जे नाहीत ते कधीही लोकांना सांगून पोडकास्ट प्रसिद्ध करायचा प्रयत्न करू नका. याची दखल तुमचे पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म अत्यंत गंभीर पणे घेतात. अश्या गोष्टींमुळे फ्रौड आणि अनेक इतर गुन्हे घडू शकतात. केवळ प्रसिद्धी साठी तुम्ही ज्या विषयातले तज्ञ नाहीत त्याच्या विषयी तुमच्या पॉडकास्ट मध्ये संभाषण साधू नका. अश्या खोटेपणामुळे तुमचा पॉडकास्ट खूपच कमी दिवस चालेल आणि लवकरच बंद पडेल . पण त्याचवेळी खरेपणाने चालवलेला पॉडकास्ट खूपच दीर्घ काळ चालू शकतो.

4. अश्लिल भाषेचा प्रयोग

पॉडकास्ट बनवतांना अश्लिल भाषेचा प्रयोग टाळा. अर्वाच्य शिव्या वैगरे अनेक पॉडकास्टिंग होस्ट प्लॅटफॉर्म धकवून घेत नाही. फक्त तरुणांना किंवा टीन एज मधल्या मुलांना किंवा कोणालाही अश्लिल भाषा आणि शिव्या वापरुन पॉडकास्ट ऐकण्यास आकर्षित करणे हे बरोबर नाही. विचार करा तुम्ही समाजाला काय सर्जनशील देत आहात. तुम्ही फक्त पॉडकास्ट बनवत नसतात तर आपल्या काळेतून समाजाला एक दिशा सुद्धा देत असतात. म्हणून अश्या गोष्टी टाळायला हव्यात. फक्त पैश्यांच्या हव्यास्या पोटी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही समाजात असा कंटेंट पसरवणार का ? आश्यारीतीने बहुतेक तुम्ही कायद्याचे गुन्हेगार नसालही बहुतेक पण तुम्ही समजाचे गुन्हेगार नक्कीच ठरालं.

5. खोटेपणा

falsehood/भ्रामक कॉन्टेंट/खोटेपणा

पॉडकास्ट च्या कुठल्याही बाबतीत खोटे पणा करू नका. खोटी फॅन फॉलोइंग तयार करणे टाळा. काही लोकं चक्क पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्मच्या सिस्टमशीच खेळ करायला बघतात. सिस्टम मध्ये छेड छाड करून खोट्या पद्धतीने फॉलोवर आणि लिसनर ची संख्या वाढवणे हा गुन्हा सायबर क्राइम मध्ये येतो. तसे सामान्यत: असं होऊ शकत नाही पण हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तसेच खोटी स्पॉन्सरशीप दाखऊ नका. अनेक लोक स्वत:च स्टेटस वाढवण्यासाठी आपल्याला अमुक अमुक या मोठ्या ब्रॅंड कडून स्पोन्सरशीप मिळाली आहे असे सांगतात. पण हे कायदेशीर करवाईला आमंत्रण देणारे आहे. तसेच तुमच्या श्रोत्यांना घातक असणार्‍या ब्रॅंड किंवा वस्तूंची जाहिरात करणं टाळा. तुम्हाला ज्या प्रॉडक्ट वर खरोखर विश्वास आहे त्याचविषयी लोकांना सांगा. हेच तुमच्या साठी आणि तुमच्या पॉडकास्ट साठी उत्तम असेल.

6. टर्म्स आणि सर्विसेस चे उल्लघन

प्रत्येक पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म चे त्यांचे त्यांचे काही नियम असतात. तुम्हाला बहुतेक प्लॅटफॉर्म ते तुमचा पॉडकास्ट होस्ट करण्याच्या आधी शो करत असतात. त्याच्या विरुद्ध काम करू नका. तुमच्या पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म च्या नियम आणि अटी वाचून घ्या आणि त्यानुसारच तूमच्या पॉडकास्ट मधला कंटेंट ठेवा.

7. इनअॅक्टिव अकाऊंट पॉलिसी

बरेच लोकं एकापेक्षा अधिक पॉडकास्ट एकाच वेळी होस्ट करतात. बर्‍याचदा त्यांचे अकाऊंट वर्षभरासाठी कुठलीहि क्रिया न होता तसेच पडून राहतात. असे अकाऊंट बंद करण्याचे हक्क तुमच्या पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म ला असतात. म्हणून जर तुम्हाला पॉडकास्ट चालू ठेवायचा असेल तर किमान त्याला विजिट तरी करत रहा. त्याच्यावर काही दिवसांच्या अंतराने एखादा ऑडिओ पोस्ट करत रहा.

ह्या होत्या काही गोष्टी ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनतांना टाळायला हव्यात. याने तुमचा पॉडकास्ट तर चांगला होईलच पण सोबतच तुम्ही समाजाला शुद्ध आणि सर्जनशील असं काही देता आहात याचा तुम्हाला अभिमान वाटेल !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *