How to create a cover for your podcastआपल्याला माहिती आहे का, की एखाद्या ऑडिओवर डोळ्यांना छान वाटणारी लघुप्रतिमा (thumbnail) असली तर ,आपल्या पॉडकास्ट वर 30% अधिक लोक क्लिक करत असतात?

आपल्या पोडकास्ट विषयी अधिक जाणून घेण्यास श्रोत्यांना आकर्शित करणारा लघुप्रतिमा हा पहिला घटक असतो. म्हणूनच, आपल्या व्यासपीठावर प्रेक्षकांसाठी आपण एक चांगली लघुप्रतिमा तयार करणे आवश्यक आहे जेणेकरुन हे पॉडकास्ट काय असणार आहे हे त्यांना पहिल्या दृष्टीक्षेपातच माहिती होते, येवढेच नाही तर त्याऐवजी लघुप्रतिमा त्यांचे लक्ष वेधून घेते आणि त्यांना तुमचा पॉडकास्ट ऐकण्यासाठी इछुक बनवते आणि त्यावर क्लिक करण्यास भाग पाडते. एक चांगला फोटो इतरांच्या तुलनेत आपल्या पॉडकास्टमध्ये फरक करण्यात मदत करू शकतो.

तर, या लेखामध्ये आपल्याला आपल्या पॉडकास्ट साठी लघुप्रतिमा तयार करणे का आवश्यक आहे ?आणि ती कशी तयार करावी आणि सोबतच ही सर्जनशील प्रतिमा वापरुन आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोच कशी वाढवायची हे आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया की आपल्या पॉडकास्ट साठी एक उत्तम लघुप्रतिमा (thubnail) कसा तयार करावा.

या ट्यूटोरियलसाठी आपण आपला ट्रेडमार्क डिझाइन करण्यासाठी कॅनव्हा हे ऐप वापरणार आहोत. यासाठी इतरही ऐप्स किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की picsart.com. पण आपण कॅनव्हा हे वापरण्यास सोपं असल्याने हेच वापरणार आहोत.

चरण 1- कॅनव्हा या ऐप वर साइन इन करा आणि ‘डिझाईन तयार करा’ (create new design)वर क्लिक करा

चरण 2- योग्य परिमाण (dimensions) निवडा .जर आपल्या प्रेक्षकांना आपल्या छायाचित्रातील अर्धाच भाग दिसत असेल तर ते छायाचित्र त्यांचा लक्षात येणार नाही म्हणून परिमाण (dimensions) योग्य प्रकारे सेट करा.

टिप- अ) आपल्याकडे पूर्व-विद्यमान टेम्पलेट(templates) निवडण्याचा किंवा आपले परिमाण(dimensions)आपल्या सोयीनुसार बदलण्याचा पर्याय आहे !

टीप:- कुकू एफएमवर आपण 720 x 720 चे परिमाण निवडणे योग्य ठरते.

चरण 3 – आता आपण बॅकग्राऊंड तयार करण्याकडे जात आहोत आपण परिमाण (dimensions) निवडल्यानंतर आपण लघुप्रतिमे वर काम करण्यास तयार आहोत. आता आपण हे तयार करण्याचे 3 मार्ग बघणार आहोत.

एकतर आपण,

a) विनामूल्य चित्रे: वापरू शकतो –

अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत जे विनामूल्य चित्र प्रदान करतात. कायदेशीर समस्या टाळण्यासाठी आपल्या प्रतिमा कॉपीराइट नसलेल्या आहेत याची खात्री करा.अनेक वेबसाइट वर तुम्हाला कॉपीराइट नसलेल्या आणि असला तरी सर्वांना वापरण्यासाठी खुल्या अश्या प्रतिमा मिळू शकतात.

ब) विविध रंग आणि त्यांचे स्वभाव-

पार्श्वभूमीसाठी परिपूर्ण रंग मिळविण्यासाठी एफ्फेक्ट्स / ग्रेडियंटचे संयोजन वापरा. लक्षात ठेवा कथेचा मूड मनात ठेवायाला हवा . जर आपले पॉडकास्ट प्रेमाबद्दल असेल तर लाल आणि गुलाबीसारखे रंग अधिक अर्थपूर्ण होतील परंतु जर आपण एखाद्या शोकाविषयी बोलत असाल तर राखाडी, निळा रंग अधिक योग्य असेल. म्हणून व्यक्त केलेले रंग आणि त्यांचा मूड जाणून घ्या आणि त्यांचा योग्य ताळमेळ बसवा.

क) किंवा आपण स्वतःची चित्रे अपलोड करू शकता ! हे सर्व आपल्या सर्जनशील मनावर अवलंबून आहे !

टिप- आपण विशिष्ट थीम निवडल्यास हे आपले कार्य सोपे करेल, उदाहरणार्थ विशिष्ट रंगांचा संगम किवा एखाद्या रंगाची गडद किवा फिकी छटा , जेणेकरून ते सुंदर वाटेल.

चरण 4- आपल्याला आता आपल्या कलाकृतीमध्ये विविध घटक जसे की उदाहरणे, चिन्हे, फोटो इ. समाविष्ट करण्याची वेळ आली आहे; परंतु आपण थोडेसे तपशीलाकडे लक्ष दिले पाहिजे ,आणि आपल्या पॉडकास्ट च्या विषयानुसार ह्या संपूर्ण घटकांवर लक्ष दिलं पाहिजे. तसेच ते डोळ्यास आनंददायक आहे की नाही याची खात्री केली पाहिजे . कॅनव्हा ऐप आपली उत्कृष्ट कलाकृती तयार करण्यासाठी आपण निवडू शकता. हे एक उत्तम कलाकृती तयार करण्यासाठी आपल्याला मदत करते.

टिप- स्वच्छ आणि मोहक प्रतिमा ठेवल्याने डोळे तुमच्या कलाकृतीकडे आकर्षित होतात. आपल्या कलाकृतीवर बर्‍याच घटकांची रसमिसळ करू नका स्वच्छ आणि नीटनेटकी कलाकृती तयार करा.

याव्यतिरिक्त, आपण आपल्या लघुप्रतिमेसाठी ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि प्रकाशयोजना यासह आपल्या कलाकृतीला उत्तम करण्याचा प्रयत्न केल्यास हे नक्कीच चांगले दिसेल. तरीही पुन्हा, पॉडकास्टची थीम दाखवली जात असल्याचे सुनिश्चित करा.

चरण 5- योग्य फॉन्ट निवडा.

आपल्या कलाकृतीमधील हा सर्वात महत्वाचा भाग आहे अस मला वाटतं. आपण यावर विशेष लक्ष द्यायला हवे. आपल्या कलाकृतीचे आकर्षणाचे केंद्र म्हणून काम करणारी ही एक महत्वाची गोष्ट आहे. फॉन्टचा पूर्णपणे व्यवस्थित विचार करणे आवश्यक आहे. फाँट वाचनीय असावा आणि गोंधळलेला दिसू नये आणि आपण आपला फॉन्ट कशासाठी वापरतो? आपला पॉडकास्ट ,अर्थातच पॉडकास्टचे नाव! आणि शेक्सस्स्पियर ने जरी म्हटलेलं असलं की नावात काय आहे तरी आपल्याला माहीत असतं की आपली पहिली ओळख ही नावानेच होत असते !

टिप- अ) फॉन्ट वाचनीय असावा

ब) तो छोटा आणि सोपा असावा.

c) यात आपल्या कंटेंट चा सारांश असणे आवश्यक आहे.

बरं, आपण एक वैशिष्ट्यपूर्ण पॉडकास्ट आर्टवर्क बनवण्यासाठी आपणास पाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व छोट्या आणि सोप्या चरणांची पूर्तता आता केलेली आहे आणि पुन्हा आता काय काय बादल घडवून आणायचे हे सर्व आपल्या सर्जनशीलतेवर अवलंबून असते.

Kuku fm मध्ये आमचा विश्वास आहे की आपला कंटेंट आपल्या स्वतःचा आणि स्वत:च्या आवडीच्या सर्व गोष्टींचा विस्तार असातो. आपण जर थंबनेलमध्ये थोडा प्रयत्न केलात , पोस्टिंगच एक शेड्यूल ठरवलत आणि उत्तम प्रकारचा कंटेंट दिलात की जो लोकांना आवडेल आणि खेळवून ठेवेल तर पॉडकास्टिंग च्या जगात आपल्याला मोठी उंची गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

तर आपण कशाची वाट पाहत आहात? आपल्या सर्जनशील मनाला स्विच ऑन करा, स्वत: ची एक जागा शोधा आणि पॉडकास्ट तयार करण्यास प्रारंभ करा! आणि नेहमी लक्षात ठेवा कुकु एफएम आपल्याला प्रगति पथापर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी प्रत्येक मार्गाने एक सहकारी म्हणून नेहमीच आपल्या बरोबर असेल!


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *