गोव्यामधील 'डोना पॉला' या प्रसिद्ध ठिकाणी घडणारी ही कथा आहे. ही गोष्ट आहे रियाची - तिच्यातल्या सूडभावनेची. उच्चभ्रू - सुसंस्कृत समाजात वावरताना स्वतःचा तोल ढळू न देता, खूप हुशारीने रिया नैतिक - अनैतिकतेचे आणि खरे - खोटेपणाचे खेळ खेळत असते. अतिशय योजनाबद्ध रितीने आणि अत्यंत सावधपणे ती आपले सावज हेरत असते. बापरे... नक्की काय सुरु असतं रियाच्या डोक्यात? सूडाची भावना का असते तिच्या मनात? ऐकूया रियाच्या संघर्षाची, तिच्या रोमहर्षक आयुष्याची कथा- पे बॅक डोना पॉला.








