उत्तम पॉडकास्ट होस्ट बनण्यासाठीच्या 6 टिप्स

पॉडकास्टिंग च क्षेत्र दिसेंदिवस पसरतच चाललं आहे. अनेको अनेक नवनवीन पॉडकास्ट आणि पॉडकास्ट होस्ट बाजारात येतं आहेत. सर्वच क्षेत्रात असते तशी याही क्षेत्रात स्पर्धा आहेच. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्पर्धा जरी कठीण असली तरी कोणी न कोणी तरी ती जिंकतो आहेच. मग जिंकणारे लोक अश्या कुठल्या गोष्टी करतात की ज्यामुळे ते यशस्वी म्हणवले जातात ? या गोष्टीचा विचार केला तर तर आपलीही यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते. किमान आपण या गोष्टी जाणून आपल पॉडकास्ट तरी थोडा चांगला करू शकतो. आज आपण अश्याच काही बाबी बघणार आहोत ज्या यशस्वी पॉडकास्ट होस्ट अमलात आणतात.

1. तुमच्या पॉडकास्टचा विषय

लक्षात ठेवा तुमच्या पॉडकास्ट च विषय तुमच्या साठी सर्व काही आहे. तुम्ही तुमच्या पॉडकास्ट साठी कुठलाही विषय निवडतांना लोकांचा ट्रेंड आणि इंट्रेस्ट पाहून निवडायला हवा. सोबतच लोकांना त्या विषयात कंटेंटची किती गरज आहे हे पण पाहायला हवं. उदाहरणार्थ, भारत हा क्रिकेट वर प्रेम करणारा देश आहे. आश्यावेळी जर तुम्ही फूटबॉलशी संबंधित एखादा पॉडकास्ट दिलात तर तुमचा पॉडकास्ट अपेक्षे पेक्षा कमी चालेल. यामुळे जर तुम्हाला एक उत्तम पॉडकास्ट होस्ट व्हायचं असेल तर लोकांची आवड पाहून तुम्ही तुमचा विषय निवडायला हवा. सोबतच तुमच्या विषययाशी संबंधित अगदी विस्तृत माहिती करून घेणे तुम्हाला आवश्यक आहे. लोकांना जर तुम्ही तुमच्या विषयाशी संबंधीत काही नेहमी पेक्षा वेगळ्या गोष्टी सांगितल्यात तर लोकांना तुमचा पॉडकास्ट जास्त आवडेल. सोबतच ते तुम्हाला एक उत्तम पॉडकास्ट होस्ट म्हणून नक्कीच पसंत करतील

2. बोलणं

दूसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं बोलण. तुमचं बोलणं हे तुमची एक ठराविक प्रतिकृती ऐकणार्‍याच्या मनात निर्माण करत असते. बोलण्यात कधीही तुम्ही निराश टोन ठेवू शकत नाही. तुम्ही कायम तुमचं बोलण उल्हसित वाटणार असं ठेवलं पाहिजे. सोबतच तुमचं बोलणं स्पष्ट आणि मुद्यांना धरून असलं पाहिजे. तुमच्या श्रोत्यांची संभाषण साधा पण उगाचच आघळपाघळ बोलण पण टाळा. यासाठी तुम्ही महत्वाचे मुद्दे समोर ठेवा. अगदी तुम्हाला पॉडकास्ट होस्ट म्हणून ज्या पद्धतीने तुमचा पॉडकास्ट पुढे न्यायचा आहे त्याच क्रमाने मुद्दे लिहा. पॉडकास्ट च्या सुरुवातिला उल्हासित आवाजात तुमच्या श्रोत्यांच स्वागत करा. सोबतच बोलतांना वेगावर नियंत्रण ठेवा.अगदी कृत्रीमरीत्या बोलणं टाळा. त्यापेक्षा सहज संभाषण करा. जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे तुमच्या आवाजत चढ उतार आणा. ज्या जोमाने तुम्ही पॉडकास्ट ची सुरुवात करतात त्याच जोमाने तुमच्या पॉडकास्ट चा शेवट करा. एक उत्तम पॉडकास्ट होस्ट होण्यामध्ये बोलणं सत्तर टक्के गरजेचं ठरतं.

3. सराव करा

सरावच सर्व काही आहे. कुठलीही गोष्ट सराव करत करत सोपी होते पॉडकास्ट बनवतांना ही हीच गोष्ट लागू होते. प्रत्येक पॉडकास्ट सादर करण्याआधी त्या पॉडकास्ट च्या कंटेंट चा थोडा सराव केला पाहिजे. तुमच्या बोलण्यावर बोलता बोलता तुम्हाला हळहळू प्रगती करता येईल. फक्त गरजेचं आहे की तुम्ही थोडा सय्यम ठेऊन प्रयत्न करत राहिले पाहिजे. तुमच्या स्वत: च्या आवाजाच रेकॉर्ड करून ऐका. इतर जे लोक तुम्हाला त्यावर मार्गदर्शन करू शकतात असं तुम्हाला वाटतं त्यांना ते ऐकावा. ज्यामुळे तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मधील प्रेसेंटेशन अधिक चांगले करू शकतात. प्रयत्न करतच तुम्ही एक उत्तम पॉडकास्ट होस्ट होऊ शकतात.

4. भाषा आणि कंटेंट समजण्यास सोपा ठेवा

तुमचे प्रेक्षक जसे आहेत तशीच तुम्हाला तुमच्या पॉडकास्ट ची भाषा ठेवावी लागेल. तुम्ही जर आगदी शुद्ध भाषा वापरायचा प्रयत्न केलात तर तुमचा पॉडकास्ट रटाळवाणा वाटू शकतो. मध्ये मध्ये काही हिन्दी इंग्रजी शब्द टाकले तरी हरकत नाही. तुमची भाषा ही दररोजच्या संभाषणातली असली तर लोकांना त्याच दडपण वाटणार नाही. लोक तुमच्या पॉडकास्ट मध्ये अधिक जास्त समरस होतील. खूप अधिक जास्त माहिती पण देऊ नका. तुम्ही पॉडकास्ट मधून जी माहिती देतात ती देतांना तुमचा उद्देश्य ती सोपी करून देण्याचा हवा. महितीला जास्त किचकट करू नका. काही सांगतांना नकारात्मक दृष्टीकोण ठेवणं टाळा.

5. आभार माना

ही वाटतांना छोटीशी वाटणारी गोष्ट आहे. पण तुमच्या श्रोत्यांवर याचा खूप परिणाम होत असतो. तुम्ही तुमच्या श्रोत्यांचे आभार मानल्याशिवाय पॉडकास्ट चा शेवट करू शकत नाहीत. तुमच्या केवळ आभार मानण्यामूळे श्रोत्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या विषयी आदर बाळगता. त्यांना तुमच्या बद्दल आपुलकी वाटते. यामुळे ते तुमचा पॉडकास्ट पुन्हा एकण्याची शक्यता वाढते. याउलट जर तुम्ही आभार मानले नाहीत तर ते अत्यंत उद्धट वाटतं. तुम्ही जर लोकांचा , तुमच्या श्रोत्यांचा आदर कराल तरच लोक तुमचा आदर करतील.

6. फीडबॅक घ्या

फीडबैक लें

तुमच्यासाठी तूमच्या पॉडकास्ट चा फीडबॅक घेणे खूप खूप महत्वाचे ठरते. हे तुमच्या पॉडकास्ट विषयी लोकांना काय वाटते हे तुम्हाला कळवते. तुम्ही याच्याद्वारे तुमच्या पॉडकास्ट मध्ये सुधारणा घडवून आणू शकतात. तुम्हाला मिळणारे चांगले फीडबॅक तुम्हाला अजून चांगला कंटेंट बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात. तसेच जर फीडबॅक वाईट असेल तर तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये गरजेप्रमाणे बदल करू शकतात. फीडबॅक द्यायला सांगितल्याने प्रेक्षकांना कळत की तुम्ही त्यांच्या मताचा आदर करतात. फीडबॅक तुम्ही अनेक मार्गांनी घेऊ शकतात. जसे की तुमच्या पॉडकास्ट च्या खाली येणार्‍या कमेंट्स. सोबतच तुम्ही जर सोशल मीडिया वर तुमच्या पॉडकास्ट ला प्रमोट करत असाल तर तिथूनही तुम्हाला फीडबॅक मिळवणे सोपे होईल॰


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *