KUKU FM चे पॉडकास्टिंग फिचर

बर्‍याचदा तुम्हाला प्रश्न पडत असेल की आम्हाला पॉडकास्ट वैगरे काय असत हे तर माहिती झाल, आम्हाला पॉडकास्ट तयार करण्याची इच्छा सुद्धा आहे. पण आम्हाला महागडे संसाधन परवडणारे नाहीत. मग आम्ही पॉडकास्ट कसा तयार करावा ? टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या आवाजाची जादू अगदी घरबसल्या पूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकतात. तसेच तुम्हाला घरी अगदी सोप्या पद्धतीने रेकॉर्डिंग तुमच्या मोबाइल द्वारे करता येईल.                                पॉडकास्टिंग फिचर

हे सर्व शक्य आहे KUKU FM ह्या आमच्या अॅप द्वारे. आज आपण याच विषयी थोडी चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला कुकु एफएम च प्रतेक फीचर कसं वापरायच हे अगदी खोलात जाऊन शिकवणार आहे. KUKU FM वर तुम्हाला अनेक प्रकारचे पॉडकास्ट ऐकायला तर मिळतातच पण सोबतच तुम्हाला तुमचा स्वत: चा पॉडकास्ट अगदी प्रोफेशनल पद्धतीने रेकॉर्ड करण्याचे स्वातंत्र्य KUKU FM चे पॉडकास्टिंग फिचर देतात. ह्यावर तुम्हाला तुमचा पॉडकास्ट तर रेकॉर्ड करता येतोच पण सोबतच तुम्हाला त्या पॉडकास्ट च एडिटिंग म्हणजेच संकलनही करता येतं. त्याला वेगवेगळे साऊंड एफ्फेक्ट्स देता येतात. आपण आता हेच सर्व अगदी विस्तृत रित्या बघणार आहोत.

1. सर्वप्रथम Google प्ले स्टोर वर जाऊन KUKU FM डाऊनलोड करा.

2. नंतर KUKU FM वर लॉग इन करा. तुम्ही लॉग इन साठी मेल आय डी , g-मेल, फोन नंबर किंवा फेसबूक अकाऊंट वापरू शकतात. आपल्या सोयीनुसार ऑप्शन वर क्लिक करा आणि आपला पासवर्ड टाकून लॉग इन करा. तुम्हाला आता रेकॉर्डिंग साठी आधी तुमच्या मेल आणि मोबाइल नंबर ने तुमची एक प्रोफाइल तयार करावी लागेल. तुमचा फोटो , प्रोफाइल च नाव टाकून प्रोफाइल तयार करा. यामुळे तुम्ही एकाच वेळेला अनेक पॉडकास्ट तयार करू शकतात.

आता तुम्हाला तुमचं स्वत: च पॉडकास्ट विश्व खुलं झालेलं दिसेल. यानंतर आपण आता यातील प्रत्येक पॉडकास्टिंग फिचरची माहिती करून घेऊ. याची विभागणी आपण करून घेऊ या.

podcasting features

A. IN APP RECORDER-

KUKU FM तुम्हाला ऐप मधेच उत्तम प्रकारची रेकॉर्डिंग फॅसिलिटी उपलब्ध करून देते. या ऐप रेकॉर्डर चा वापर केल्यानंतर तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज अजून उत्तम करण्यासाठी अॅप मध्येच मिक्सर आणि एडिटर ची फॅसिलिटी सुद्धा आहे. आता आपण याच्या वेगवेगळ्या बाबींची माहिती करून घेऊ.KUKU FM मध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमचं प्रोफाइल तयार कराव लागेल. त्यासाठी

1. KUKU FM वर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर उजव्या हाताच्या खालच्या बाजूस अकाऊंट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

2.आता तुमच्या समोर असलेल्या स्क्रीन वर डाव्या हाताच्या वरच्या बाजूस क्रिएट न्यू ( create new ) नावाचे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा . आता तुम्हाला what do you want to create ? म्हणजे तुम्हाला काय बनवायचे आहे , म्हणजेच news , story इत्यादि ऑप्शन मिळतील.

3. तुमच्या पॉडकास्ट ला साजेसा असा ऑप्शन निवडा.

4. यानंतर तुम्हाला पॉडकास्ट च नाव , प्रोफाइल फोटो, त्या योग्य प्राथमिक श्रेणी निवडा. नंतर तुमच्या पोडकास्ट च वर्णन थोडक्यात लिहा यात तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना काय काय ऐकवणार आहात याची माहिती देऊ शकतात.

5. आता तुमच्या पॉडकास्ट ची प्रोफाइल तयार झाली आहे. ही प्रोफाइल कुकु एफएम वर लोकांना दिसणार आहे.

b. रेकॉर्ड करण्यासाठी

1. आता तुम्ही नवीन कंटेंट जोडा वर क्लिक करून तुमचा पहिला पॉडकास्ट रेकॉर्ड करू शकतात॰

2. ‘नवीन कंटेंट जोडा’ वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पिवळ्या रंगात अपलोड आणि लाल रंगात रेकॉर्ड ऑप्शन दिसतील.

3. पिवळ्या बटणावर दाबून तुम्ही पहिले रेकॉर्ड असलेला ऑडिओ अपलोड करू शकतो.

4. रेकॉर्ड या लाल बटणावर क्लिक करून अॅप वर रेकॉर्डिंग करू शकतात.

B. IN APP SOUND MIXER AND EDITOR

1. तुम्ही रेकॉर्ड बटणावर क्लिक केलेत आणि ऑडिओ रेकॉर्ड करून झाल्यानंतर आता तुम्ही वेगवेगळे एडिटिंग फिचर वापरू शकतात.

2. या दोन्ही बटनांच्या वरच्या बाजूस तीन बटन दिसतील.

a. ट्रिम– याचा वापर करून तुम्ही जो भाग तुम्हाला ऑडिओ मध्ये ठेवायचा आहे तो निवडू शकतात आणि बाकी काढून टाकू शकतात. हे झाल्या नंतर प्ले बटणावर दाबून तुम्ही ट्रिम केलेला भाग ऐकू शकतात आणि नंतर तो सेव करण्यासाठी तुम्हाला ‘पूर्ण झाले’ या बटणावर क्लिक कराव लागेल.

b. इफेक्ट्स– या बटणावर क्लिक करून तुम्ही वेगवेगळे पार्श्व संगीत जोडू शकतात. तुम्हाला फनी, हॉरर (भीतीदायक), लव(प्रेम) या प्रकारात त्या त्या भावनेला दर्शवणारे पार्श्वसंगीत तुमच्या पॉडकास्ट साठी मिळेल. हे तुम्ही अॅड वर क्लिक करून तुमच्या पॉडकास्ट मध्ये टाकू शकतात.

c. नियंत्रणे – यामध्ये तुम्ही तुमचा आवाज जरा सॉफ्ट करू शकतात तसेच कमी जास्त करू शकतात.  पॉडकास्टिंग फिचर पॉडकास्टिंग फिचर पॉडकास्टिंग फिचर

3.आता प्रकाशित या बटणावर क्लिक करण्यास विसरू नका. याशिवाय तुमचा पॉडकास्ट प्रकाशित होणार नाही.

C. ANALYTICS

1. पॉडकास्ट रेकॉर्ड झाल्यानंतर तो किती लोकांनी ऐकला हे त्या पॉडकास्ट च्या प्रोफाइल वर सहज दिसते. लोक तुमच्या पॉडकास्ट वर आपल्या कमेन्ट देऊ शकतात आणि तुम्ही सहज त्या पाहू शकतात.

2.कुकु एफएम च्या तुमच्या अकाऊंट वर तुम्ही सर्व ऑडिओ तुम्ही प्रकाशित केलेले ‘प्रकाशित ऑडिओ’ या बटणावर क्लिक करून पाहू शकतात.

3. तसेच तुमची पूर्ण कामगिरी तुम्ही ‘कामगिरी दर्शवा’ या बटणावर दाबून बघू शकतात. यात तुम्हाला तुमचा पॉडकास्ट किती लोकांनी ऐकला तसेच किती लोक तुमचे रेग्युलर प्रेक्षक आहेत, तसेच नवीन फॉलोवर किती आहेत हे ग्राफसह बघता येते.

D.CUSTOMER REACH

1. तुमच्या पॉडकास्ट ची लिंक तुम्ही शेअर करू शकतात आणि सोबतच पॉडकास्ट प्रोफाइल एडिट आणि डिलीट पण करू शकतात.

2. तुमच्या प्रोफाइल ची लिंक तुम्ही कुठेही तुमच्या मर्जिने शेअर करू शकतात.

3. तसेच इतर फिचर जसे भाषा बदलणे आणि रात्री मोड असे अनेक फीचर तुम्हाला मिळतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *