होम स्टुडिओ कसा तयार कराल?

Podcast तर तुम्ही आता सुरू केलत पण तुम्हाला असा वाटतं का की तुमचा आवाज असा फारसा काही उत्तम वाटत नाही ? आवाज इतर प्रॉफेश्नल podcasters प्रमाणे वाटत नाही ? चिंता करू नका आपण ह्या लेखात हेच समजून घेणार आहोत जी नक्की घरच्या घरी होम स्टुडिओ बनवून रेकॉर्डिंग कसं करावं. तसं जर तुम्ही KUKU FM चं रेकॉर्डिंग टूल वापरत असाल तर तुमचा आवाज आपोआपच उत्तम प्रकारे रेकॉर्ड होतो. पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल की आपलं रेकॉर्डिंग अजून उत्तम व्हाव तर आपण घरच्या घरी अजून काय करू शकतो ते आता बघणार आहोत.

KUKU FM चं रेकॉर्डिंग टूल इतकं पर्फेक्ट आहे की कुठलाच बींनकामचा आवाज रेकॉर्ड होतच नाही. समझा तुमचा फॅन चालू आहे रूम मध्ये तर त्या पातळीवरचा आवाज रेकॉर्ड होत नाही. होम स्टुडिओ तयार करून रेकॉर्डिंग साठी महागडे साधनंच पाहिजे असं काहीच नाही, तुम्ही फक्त याच्यावर जरी रेकॉर्डिंग केलं तरी ते उत्तम होतं आणि येवढचं नाही तर ह्या ऐपवर नंतर सर्व प्रकारचे एडिटिंग करणं पण सोपं होत.

आपण रेकोर्डिंग करतानाच्या काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत.

ध्वनिउपचार(sound treatment).) आणि ध्वनीप्रतिबंधन (sound proofing)

या होम स्टुडिओ सेट उप करून रेकॉर्डिंग करतांनाच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. साऊंड प्रूफिंग म्हणजे काय तर एका बंद ठिकाणी होम स्टुडिओ सेट करून रेकॉर्डिंग करणे आणि बाहेरील आवाजाला प्रतिबंध करणे. तर साऊंड ट्रीटमेंट म्हणजे आतल्या आत जिथे तुम्ही तुमचा होम स्टुडिओ सेट करून रेकॉर्डिंग करत आहात तिथेच,काहीशी अशी सोय करणे की तुमचं आवाज उत्तम प्रकारे रेकॉर्ड केला जाऊ शकेल. आवाज रेकॉर्ड करतांना या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत.हे कसं करावा हे आपण पुढे करूया

A)ध्वनिउपचार (sound treatment)

a)आवाज दुमदुमणे आणि योग्य खोली निवड आपल्या घरात काही खोल्या आणि काही भाग असा असतो की तीथे आवाज जरा घुमतो तर काही भागात, आवाज रेकॉर्ड करतांना घुमत नाही. जस तुम्ही छोट्या खोलीत जिथे खूप सामान आहे त्या ठिकाणी आवाज घुमत नाही , तर जी खोली रिकामी आहे तिथे आवाज पसरतो. आवाजाचं रिफ्लेक्शन ज्या ठिकाणी खडबडीत भिंती असतात तिथे जास्त होतं तर ज्या ठिकाणी भिंती सपाट असतात त्या ठिकाणी आवाज रिफ्लेक्ट कमी होतो. एका योग्य खोलीची निवड करणं तुमचा होम स्टुडिओ तयार करून रेकॉर्डिंग करण्यासाठी गरजेच असतं.।

b)खोली निवडल्यानंतर……( तात्पुरता सेट अप ) फक्त एक खोली निवडून घेतली आणि तुमचा मोबाइल आणि हेडफोन घेऊन तुम्ही पॉडकास्ट सुरू केलं असं न करता काही जर तात्पुरता सेट अप केला तर तुमची साऊंड क्वालिटी तुम्ही चांगली करू शकतात.

काय करायचं, जिथे तुम्ही रेकॉर्ड करत आहत त्या ठिकाणी तुमच्या मोबाइल किवा माइक च्या मागे टॉवेल किंवा परदा टाकून एक बंद जागा करा ज्याने आवाज परावर्तीत होऊन माइक किवा मोबाइल मध्ये व्यवस्थित रेकॉर्ड होईल. जर रूममध्ये थोडापण एको असेल तर तो तुमच्या ऑडिओ मध्ये बिलकुल येणार नाही. तुम्हाला जर अगदी सहज कुठलाही खर्च न करता , स्टुडिओ मध्ये न जाता , माइक आणि प्रॉफेश्नल टूल न वापरता आपला होम स्टुडिओ सेट करून रेकॉर्डिंग करायचं असेल तर तुम्हाला kuku fm हे एक बेस्ट app आहे ह्या एप्पवर जर थोडा जवळ धरून रेकॉर्डिंग केलं तरी ती एकदम स्टुडिओत बसून केल्यासारखी वाटते. बेस्ट रिजल्ट साठी तुमच्या जर तोंडाच्या लेवलला मोबाइल ठेवलात आणि मोबाइल च्या मागे एखादा जुना बॉक्स ज्याचा पुठ्ठा सपाट आणि गुळगुळीत असा दोन साइडने म्हणजे माइक च्या मागच्या बाजूस एक आणि उजव्या किवा डाव्या बाजूस एक असा असेल तर अवजा उत्तम रेकॉर्ड होईल. जर थोडा खर्च तुम्ही करू शकत असाल तर एक चांगला माइक असलेला हेडफोन घेतला तर मग तर भारीच काम झालं ना भाऊ!

B) ध्वनिप्रतिबंधन (soundproofing)

(soundproofing)

तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही तुमच्या घरामध्ये तात्पुरता सेट अप करून घेतला आणि झालं तर तसं नाहीये तुम्ही आत कितीही चांगलं रेकॉर्डिंग केलत पण जर बाहेरच्या आवाजाला प्रतिबंध केलाच नाहीत तर तुमचा पॉडकास्ट उत्तम होणार नाही॰ काही बाबी आहेत की ज्या तुम्ही योग्य रित्या बघितल्या पाहिजे. खालील गोष्टींवर जरा लक्षं देणं गरजेचं आहे.

  • तुम्ही ज्या ठिकाणी रेकॉर्ड करत आहात ती खोली दुसर्‍या घराशी जर जोडलेली असेल तर तिकडचे आवाज, जसे बोलण्याचा, काही ठोकण्याचा, टी.व्ही. चा आवाज इकडे येऊ शकतो अशी खोली बहुतेक न निवडलेलीच बरी.
  • खोलीत जर एखादी खिडकी असेल तर आणि बाहेर ट्राफिक चा आवाज असेल तर आशयावेळी रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो अश्या ठिकाणी बसण टाळायला हवं.
  • खोलीत काही अशी वस्तु नको जिचा अगदी खूपच आवाज येत असेल , जसे की कूलर, आवाज करणारा फॅन इत्यादि.
  • तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असतील तर त्यांना काहीवेळ बाहेर ठेवलेलं बरं! कुत्र्याच भुंकण किंवा पक्ष्यांची चिवचिवट तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये अडथळा आणू शकते.
  • रेकॉर्डिंग करतांना पानांचा आवाज बर्‍याचदा होतो तो नंतर रेकॉर्डिंग एडिट करतांना काढता येतो पण बर्‍याच लोकांना ते शक्य नसतं, यासाठी जर पानं सुट्या प्लॅस्टिकच्या फोल्डर मध्ये घालून वापरलीत तर त्याचा आवाज येत नाही.
  • तसाच जर घरात भांड्यांचा व लहान मुलांच्या रडण्याचा काही आवाज होत असेल तर त्या वेळी रेकॉर्डिंग न केलेल बरं.

ह्या होत्या काही टिप्स ज्या तुम्हाला घरच्याघरी रेकॉर्ड करतांना लक्ष्यात घायला हव्यात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *