सर्वोत्तम खरेदी तुमच्या होम स्टुडिओसाठीसर्वोत्तम खरेदी तुमच्या होम स्टुडिओसाठी

आम्ही ही गोष्ट अगदी वारंवार चांगल्या प्रकारे सांगितली आहे की पॉडकास्टिंग आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये करता येते. ही एक कंटाळवाणी प्रक्रिया नाही आणि ज्याला उत्साह आणि आत्मविश्वास आहे तो या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. शिवाय, अगदी कमीतकमी उपकरणांसह निर्माता होऊ शकतो. याउलट काही निर्माते त्यांची सामग्री अधिक चांगली करण्या साठी नेहमीच प्रयत्न करत असतात. ते अश्या उपकरणांच्या आणि साधनांच्या शोधत ते नेहमी असतात की जे त्यांच्या यशाला अधिकाधिक उंचीवर पोहोचण्यात मदत करतील. हा लेख आपल्याला त्याचसाठी मदत करेल. घरगुती स्टुडिओसाठी आपण करू शकता अशा वेगवेगळ्या खरेदीची आपण चर्चा करू आणि तुमच्या पॉडकास्टला तुम्हाला अधिक चांगले कसे करता येईल याविषयी चर्चा करूया.      खरेदी खरेदी खरेदी

खाली दिलेले सर्व पर्याय किंवा उपकरणे असे आहेत की जे आपला कंटेंट अधिक चांगला करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात

कॉम्पुटर

हे असे माध्यम आहे की ज्यास कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. ही आपल्या होम स्टुडिओसाठी एक महत्त्वपूर्ण खरेदी आहे. हे उपकरण पॉडकास्टिंगच्या विविध पैलूंसाठी वापरले जाऊ शकते. जसे की निर्यात / आयात, सामग्री संपादित करणे इत्यादि . असे अनेक पर्याय आहेत जे आपण कॉम्पुटर खरेदीसाठी निवडू शकता. अनेक बाबी जसे की तुमचं बजेट, कॉम्पुटरचा वापर इत्यादी घटकांवर आधारित आपण कॉम्पुटर खरेदीचा निर्णय घेऊ शकता.

मायक्रोफोन

हे एक चांगले उदाहरण आहे, ज्यामुळे आपल्या कंटेंटची गुणवत्ता बदलू शकते. विविध प्रकारच्या पर्यायी खरेदीमधून कुठला मायक्रोफोन घ्यायचा हे निवडले जाऊ शकते. जो आपल्याला उत्कृष्ट गुणवत्ता देईल व आपण वापरत असलेल्या उपकरणानुसार अनुरूप असेल असा माइक्रोफोन निवडलेला बरा. आम्ही या वस्तुस्थितीवर भर देत आलेलो की पॉडकास्टिंग आपल्या इयरफोनमध्ये असलेल्या इनबिल्ट माइक सारख्या किमान खरेदीसह करता येते. परंतु जर आपण माइक्रोफोन देखील खरेदी केलात तर आपल्या पॉडकास्ट साठी हा एक अतिरिक्त फायदा ठरू शकतो.

Pop filter/ पॉप फिल्टर

पॉप फिल्टर

याचा मुख्य उद्देश्य म्हणजे, ध्वनी आपल्या मायक्रोफोनवर पोहोचण्यापूर्वी हवेच्या शक्तीशाली तरंगांना आत्मसात करणे. म्हणूनच, जेव्हा आपल्या शब्दांच्या गुणवत्तेचा आपण विचार करतो तेव्हा ही खरेदी आपल्या स्टुडिओचा महत्त्वपूर्ण भाग असू शकते.

माइक स्टँड

ही खरेदी मुख्यतः आपली सर्व इतर उपकरणे एकत्ररित्या व्यवस्थित ठेवण्यासाठी आहे. शिवाय, हे उपकरण आपल्याला आपला सेटअप अजून व्यवस्थित करण्यास मदत करू शकते. यामुळे आपण पॉडकास्ट मध्ये येणारे अनेक दोष टाळू शकतात. तसेच तुम्ही एका जागी बसून आरामात रेकॉर्डिंग करू शकता.

हेडफोन्स

हेडफोन त्यांचे मुख्य काम तर करतातच पण सोबतच ते इतर हेतू पण साध्य करतात. अनेक इतर अनेक कामांत आपल्याला उपयुक्त ठरतात. जसे की पॉडकास्ट संपादित करताना, रेकॉर्डिंग करत असतांना आपल्या ऑडिओमधील कोणताही गडबड किंवा कोणताही गरजेचा नसलेला ध्वनी शोधण्यात ते आपल्याला मदत करू शकतात. यासाठी साधे हेडफोन सुद्धा खूपच उपयोगी ठरतात.

ऑडिओ इंटरफेस

हे उपकरण वापरणे सहसा पॉडकास्टरच्या पसंतीवर अवलंबून असतात. एक ऑडिओ इंटरफेस हा ब्रिज म्हणून काम करतो जो मायक्रोफोनच्या ऑडिओ सिग्नलला डिजिटल स्वरूपामध्ये रूपांतरित करतो जेणेकरून आपण त्यांना आपल्या संगणकावर प्लेबॅक, मिश्रण आणि अपलोडसाठी “पाठवू” शकता.

मिक्सर

ऑडिओ इंटरफेस प्रमाणेच, मिक्सर आपल्याला ध्वनी पातळी, इनपुट, आउटपुट आणि बर्‍याच अश्या काही गोष्टींवर अधिकाअधिक नियंत्रण देऊन आपला ऑडिओ सुधारण्यास मदत करते.

केबल्स

याव्यतिरिक्त, जर आपण वेगवेगळ्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर एक असे माध्यम सुद्धा असणे आवश्यक आहे ज्याद्वारे इतर सर्व उपकरणे चांगले आउटपुट प्राप्त करण्यासाठी व्यवस्थित एकमेकांशी कनेक्ट केलेले असतील. हीच गरज चांगल्या केबल्स पूर्ण करतात आणि तुमचा पॉडकास्ट उत्तमोत्तम करण्यासाठी मदत करतात.

डिजिटल ऑडिओ रेकॉर्डर

आपण आपल्या घरातील स्टुडिओमध्येच आपली सामग्री नेहमी रेकॉर्ड करणार आहात असे गृहित धरणे थोडे अतार्किक आहे. किमान इंटरव्ह्यु पॉडकास्ट रेकॉर्ड करतांना तरी तुम्हाला तो तुमच्या स्टुडिओ मध्येच रेकॉर्ड करणे बर्‍याचदा अशक्य असते. कारण प्रत्येकच व्यक्ति तुमच्या स्टुडिओत येऊन रेकॉर्ड करू शकत नाही. अश्या वेळी तुम्हाला डिजिटल रेकॉर्डरचा उपयोग होतो.

साऊंडप्रूफिंग मटेरियल

इको किंवा बाह्य ध्वनी यामुळे पॉडकास्ट रेकॉर्ड करतांना उद्भवणार्‍या अडचणी आपण समजून घेणे आवश्यक आहे. तसे हे काही आपल्याला नवीन नाही. असे अनावश्यक आवाज टाळण्या साठीच ही सामग्री मदत करते. ऑडिओची चांगली गुणवत्ता निर्माण करण्यासाठी हे ध्वनी लहरींचे परावर्तन शोषून घेते. हे आपण आपल्या रेकॉर्डिंग रूम च्या भिंतींना वापरू शकतात.

मेमरी कार्ड्स

लॅपटॉपच्या कामात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी ह्याची मदत घेता येईल. मोठमोठया फाईल्स यामध्य हलवल्या जाऊ शकता. यामुळे लॅपटॉप ची मेमरी न वापरली जाता हार्डडिस्क किंवा मेमरी कार्ड मधील मेमरीचा वापर करता येतो. हे लॅपटॉपचे वर्किंग स्मूथ ठेवेल. शिवाय, जेव्हा सामग्री वैयक्तिकरित्या साठवावी असे वाटत असेल तेव्हा त्यासाठी मेमरी कार्ड वापरले जाऊ शकते. तसेच तुम्ही तुमचा कंटेंट अधिक व्यवस्थित रित्या साठवून ठेऊ शकतात.

पॉडकास्ट होस्ट

आपण तसे अनेक पॉडकास्ट होस्ट निवडू शकतात. परंतु माझ्या मते सर्वात उत्तम यामध्ये कुकु एफएम च आहे. आपण राहता त्या देशात अनेक विविध भाषा बोल्या जातात. त्यामधील कंटेंट आपल्याला कुकु एफएम मध्ये सुसंगत रित्या उपलब्ध होत असतो. यावर , याचा इंटरफेस खूपच यूजर फ्रेंडली आहे. आपण नवीन जरी या ऐप वर आल्यास आपल्याला नॅव्हिगेट करण्यात काहीच अडचण येणार नाही.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *