वॉइस इम्प्रूव कसा करावा ?वॉइस इम्प्रूव कसा करावा ?

बरेच लोकं मला विचारतात, आम्हाला पॉडकास्ट तर रेकॉर्ड करायचा आहे पण आम्हाला वॉइस म्हणजेच आमचा आवाज काही बरोबर वाटत नाही? इतरांचा पॉडकास्ट ऐकतांना जशी मजा येते तशी आमचा स्वत: चा आवाज रेकॉर्ड करून जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा ती आम्हाला येत नाही ? आज मी या लेखात तुम्हाला हेच सांगणार आहे की नक्की तुम्ही काय काय खबरदारी घेऊ शकतात ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचा वॉइस इम्प्रूव करू शकतात ? रेकॉर्ड केलेला वॉइस इम्प्रूव करण्यासाठी बरेच लोकं वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरतात पण त्यासाठीही आधी जरा बोलतांनाच तुमचा वॉइस इम्प्रूव करणे गरजेचे आहे. आपण वॉइस इम्प्रूव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी हे बघणे गरजेचे आहे. आपण काही ठळक मुद्दे पाहणार आहत जे तुम्हाला तुमचा वॉइस इम्प्रूव कण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला तुमच्या आवाजाचा न्यूनगंड वाटणार नाही.

1.पहिल्यांदा, मानसिकता बदला

सर्वात पहिल्यांदा तुमचा आवाज चांगला नाही आणि तुमच्या आवाजात पॉडकास्ट चांगला वाटत नाही ही मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकाच्या आवाजाची काहीतरी विशेषता असते. अनेक असे वक्ते आणि अभिनेते तसेच गायक सांगता येतील की ते त्यांच्या आवाज विशेष चौकटीच्या बाहेरचा होता .इतरांपेक्षा तो वेगळा होता म्हणून त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवता आलं.सर्वांनाच माहिती आहे की अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजामुळे पहिल्यांदा रीजेक्ट करण्यात आलं होतं पण नंतर तोच आवाज लोकांनी खूप पसंत केला. तुम्ही वॉइस इम्प्रूव करू शकतात. तुम्हाला तुमचा आवाज बदलण्याची किंवा लाजण्याची काही गरज नाही. उत्स्फूर्त पणे जर तुम्ही बोलत असाल तर ऐकणार्‍याला ते आवडणारच आहे.

2. दुसरं म्हणजे, आवाजात चढ उतार ठेवा 

तुमच्या आवाजाचा प्रकार गरजेचा नाही तर तुम्ही मुळात कसे बोलता हे गरजेचं आहे. वॉइस इम्प्रूव करण्यासाठी एक सलग लईत न बोलता थोडा आवाजात चढ उतार आणनं गरजेचं आहे. जर तुम्ही एका लईत बोलत राहिलात तर तुम्हाला खरच सांगतो, ऐकणार्‍याला झोप येऊ शकते. त्यामुळे एकसारख न बोलता मध्ये मध्ये आवाज जरा उंच करणं , कधी अगदी हळू बोलणं किंवा आवाज एकदम लांबवण गरजेचं आहे. तुमचे शाळेचे दिवस आठवा किंवा पार्लीमेंट मधील बजेट आठवा ते तुम्ही कधी मनोरंजनासाठी ऐकतात का ? पण त्याउलट तुम्ही अनेक चित्रपट किंवा वक्तृत्व अत्यंत मजा घेऊन ऐकतात.

3. तिसरं म्हणजे, ठराविक ठिकाणी थांबण

तुम्ही बोलायला लागलात की ठराविक ठिकाणी थांबण सुद्धा गरजेचं आहे. बोलण्यात छोटे छोटे थांबे घेत जाणं तुमचं बोलण प्रभावी बनवतं. अनेक उत्सुकता आणि आश्चर्याच्या ठिकाणी आवाज अचानक जाण तुमच्या आवाजाला इंटरेस्टिंग बनवते. हे ऐकणार्‍याला सुद्धा प्रभावित करते. याचा अजून एक उपयोग म्हणजे दोन तीन सेकंदानसाठीची शांतत तुम्हाला बोलण्यापासून थोडी विश्रांति देते आणि पुढील पॉडकास्ट रेकॉर्ड करतांना आवाज सुधारण्याची एक ऊर्जा देते. पण सोबतच हे थांबे कुठे घ्यायचे आणि किती वेळ घ्यायचे हे जरा लक्षात घेणे गरजेचे आहे.

4. चौथा मुद्दा वेग सांभाळा

वॉइस इम्प्रूव करण्यासाठी तुमच्या बोलण्याचा वेग खूपच महत्वाची भूमिका बजावत असतो. तुम्ही अगदीच फटाफट बोलू शकत नाही. तसेच तुम्ही खूप हळुही बोलू शकत नाही . जर तुम्ही खूपच फटाफट बोललात तर तुमच बोलण इतरांना कळणार नाही आणि सोबतच ते रटाळ पण वाटू शकते. तसेच जर तुम्ही खूपच कमी वेगाने बोललात तर लोकं समजण्याचा प्रयत्न न करता, तुमचा पॉडकास्ट बंद करून निघून जातील. हळूहळू बोलणे खूपच कंटाळवाणे वाटू शकते. म्हणून लोकांना समजेल आणि त्यांना बोर पण वाटणार नाही यापद्धतीने बोला. मुख्य म्हणजे तुम्ही तुमचं बोलण जितकं प्राकृतीक करायचा प्रयत्न कराल तितके तुम्हाला तुमच्या आवाजात कमी परिश्रम करावे लागतील.

5. पाचवी गोष्ट ,संवाद साधा

तुम्ही ज्या वेळेला बोलत असतात तेव्हा संवाद सधायाचा प्रयत्न करा. पूर्ण स्क्रिप्ट आधी पाठ करून घेतली आणि नंतर बोलून टाकलीत असं करू नका. अगदी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी जश्या गप्पा मारतात त्याप्रमाणे बोललात तर ऐकणार्‍यांना ते जास्त चांगलं वाटेल. यामुळे तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये अडखळणार सुद्धा नाही. तुम्ही जर काही विसरलात किंवा तुम्हाला काही बोलतांना नवीन गोष्टी आठवल्यात तर त्या तुम्ही सांगू शकतात. याने आवाज सुधारेलच आणि रेकॉर्डिंग सुद्धा उत्तम रित्या होईल.

6. सहावी गोष्ट ,सराव करा

Pratice/अभ्यास/सहावी गोष्ट ,सराव करा

सराव करण्याने तुम्ही नक्कीच तुमचा वॉइस इम्प्रूव करू शकतात. आपण ज्या विषयांवर किंवा मुद्यांवर बोलतात त्यावर मूळ रेकॉर्डिंग करण्याच्या आधी थोडं बोलून बघा. बोलण्याचा सराव करत रहा. हळूहळू तुम्हाला तुमचा आवाज कश्याप्रकारे बोलल्याने चांगला काढता येतो हे कळायला लागेल. जे तुम्ही बोलता ते रेकॉर्ड करा आणि ऐका. जिथे कुठे थांबायचे आहे आणि जे काही बदल करायचे आहे ते तुम्ही ऐकत ऐकत आणि परत परत बोलून सुधरवू शकतात. 90% लोकांना पब्लिक स्पिकिंग जमत नाही कारण ते बोलण्याचा सराव करत नाहीत. बोलण्याचा सराव केल्याने हळूहळू तुम्हाला तुमच्यावर आत्मविश्वास वाटू लागेल.

7.अखेरीस, तुमचा आवाज एक वाद्य आहे

हो थोडं ऐकतांना वेगळ वाटू शकत पण हे खरं आहे की तुमचा आवाज एक म्हणजे एक वाद्य आहे आणि तुमचे निघणारे बोल हे एका रिदम ( rhydum ) मध्ये पडले पाहजेत. ह्या हिशोबाने तुमचा आवाज सांभाळून छेडा. प्रत्येक आवाजाच्या चढउतारावर आणि वेगावर तुम्हाला हळूहळू काम कराव लागेल.तुम्ही तुमचा आवाज सुधरून नक्कीच पॉडकास्ट मध्ये पारंगत होवू शकतात.

तसेच तुमचा पॉडकास्ट मध्ये आवाज कसा असावा हे कळण्यसाठी तुम्ही काही वेगवेगळे पॉडकास्ट ऐकणे पण महत्वाचे आहे. असे अनेक पॉडकास्ट तुम्हाला KUKU FM या ऐप वर सहज ऐकता येतील.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *