लाइफस्टाईल सोपी करण्यात पॉडकास्टची भूमिका

आपण पॉडकास्टचे नाव ऐकले असेलच , आपण वेगवेगळे पॉडकास्ट देखील ऐकले असतील . पॉडकास्ट ऐकून तुम्हाला कधी काही प्रश्न पडले आहे का ? आपण कधी मनात विचार केला आहे का की पॉडकास्ट बनवण्याचा आपला हेतू काय असतो ? एखादी व्यक्ति पॉडकास्ट का तयार करते ? पॉडकास्ट तयार करण्याचे काय फायदे आहेत ? तुम्हालाही हे प्रश्न पडलेले असल्यास शेवटपर्यंत हा लेख जरूर वाचा. या लेखात तुम्ही पॉडकास्टमधून आपल्या दैनंदिन आयुष्यात मदत कशी मिळवू शकतात हे आम्ही सांगू.

आजकाल आपले आयुष्य खूपच व्यस्त आहे. आपले उर्वरित काम करताना आपण बर्‍याच महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपला छंद , आपले मनोरंजन , आपल्या कला इत्यादींसाठी वेळ देणे आपल्यासाठी जवळजवळ अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत पॉडकास्ट असे माध्यम आहे की जे आपल्या लाइफस्टाईल नुसार आपले मनोरंजन करते॰ सोबतच घरी बसून आपल्या छंदांची पूर्तता करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ देखील देते॰ आपल्या छंदाच्या बरोबरीनेच आपली कमाई होईल असे माध्यम पॉडकास्ट आपल्याला मिळऊन देते. आपण पॉडकास्ट ऐकून स्वतःचे मनोरंजन करू शकतात. पॉडकास्टची मदत देखील रोजच्या लाइफस्टाईल च्या वेगवेगळ्या बाबींमध्ये घेऊ शकता. कसे ? चला ते आता जाणून घेऊयात ?

1. वेळ / पैसा वाचवणे       

आजकाल इंग्रजीत एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, “टाइम इज मनी”, म्हणजेच ‘वेळ म्हणजे पैसा’. आजच्या काळातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ होय. आपले आयुष्य इतके व्यस्त झाले आहे की आपल्या स्वतःकडे मनोरंजनासाठी वेळ नसतो. आपण आपली सर्व कामे सोडून YouTube, टीव्ही किंवा इंटरनेटच्या समोर बसू शकत नाही. यासाठी, आपण पॉडकास्टची मदत घेऊ शकतो. आपली कोणतीही कामे करताना आपण पॉडकास्ट ऐकू शकतो. पॉडकास्टकडे जास्त लक्ष द्यावे लागत नाही. टीव्ही, नेटफ्लिक्स, इंटरनेट इत्यादी उर्वरित मनोरंजन माध्यमावर येणार्‍या खर्चाच्या तुलनेत पॉडकास्ट ऐकण्याचा खर्च खूपच कमी आहे. अगदी नाही च्या बरोबर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . म्हणजेच, आपण पॉडकास्टच्या मदतीने पैसे आणि वेळ दोन्ही वाचवू शकता.

२. कमी खर्चात अधिक ज्ञान

पॉडकास्टचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यावर कोर्स देखील करू शकतात. आपण नवीन भाषा शिकू शकता, नवीन विषय ऐकू शकता किंवा त्यावर बरिच माहितीपूर्ण सामग्री शोधू शकता. जास्त फी न देता आपण आपले दैनिक वेळापत्रक न बदलता काहीतरी नवीन शिकू शकता. आपले ज्ञान वर्धित करण्यासाठी आपण पॉडकास्टची मदत घेऊ शकता. बाहेर काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्हाला भारी शुल्क भरावे लागेल. पॉडकास्टमध्ये आपण तुलनेने कमी किंमतीवर बर्‍याच नवीन गोष्टी शिकू शकता.

3. दुर्मिळ स्त्रोतांमध्येही कमाई

आपण पॉडकास्टची मदत घेऊन देखील पैसे कमवू शकता. पॉडकास्ट तयार करण्यासाठी जास्त खर्च किंवा कोणत्याही विशेष सेटअपची आवश्यकता नाही. आपण फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोनसह पॉडकास्ट तयार करू शकता. आपण पॉडकास्टवर चांगली सामग्री दिली तर आपण लवकरच यामधून पैसे मिळवण्यास सक्षम व्हाल. घरी पॉडकास्ट कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. पॉडकास्ट आपल्याला रोजच्या लाइफस्टाईल मध्ये घरच्या घरून पैसे कमविण्याची देखील संधि देतो.

4. पुस्तके ‘ऐकु’ शकतात

audiobooks/किताबें 'सुनें'/

आपण कधी पुस्तके ऐकू शकू असा कोणी विचार केला होता का ? बर्‍याच लोकांना पुस्तके वाचायची असतात. वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे ते बर्‍याचदा आपल्या लाइफस्टाईल मध्ये वाचन करू शकत नाहीत. परंतु पॉडकास्टच्या मदतीने त्यांचे कोणतेही दुसरे काम करीत असताना ते त्यासोबतच अनेक पुस्तकं त्यासोबतच ऐकू शकतात. हे आपला वेळ देखील वाचवेल आणि आपण आपल्या आवडीचे अनेक पुस्तक आपले काम करता करता ऐकू शकता.

5. सर्जनशील होण्याची संधि               

आपल्या व्यस्ततेमुळे आपल्याला इतर कोणत्याही छंदास वेळ देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. परंतु पॉडकास्टच्या मदतीने आपण जरी जास्त मोकळा वेळ नसेल तरी आपला छंद जोपासू शकतात. दिवसाचा थोडा वेळ काढून, आपण आपल्या आवडीच्या विषयावर पॉडकास्ट रेकॉर्ड करू शकता. पॉडकास्टची मदत घेऊन आपण आपल्या लाइफस्टाईल मध्ये सर्जनशीलतेला खरे पंख देऊ शकता.

अशा प्रकारे आपण पॉडकास्ट आपल्याला आपल्या लाइफस्टाईल मध्ये मदत करू शकते. या व्यतिरिक्त, जर पॉडकास्ट मधून तुम्हाला मदत घेऊन आपली लाइफस्टाईल अधिक सुधारीत करायची असेल तर चांगले पॉडकास्ट ऐकणे आवश्यक आहे. यासाठी एक चांगले व्यासपीठावर असणे आवश्यक आहे. कुकू एफएम एक उत्तम आणि वापरकर्त्यांना अनुकूल असे पॉडकास्ट अॅप आहे. आपण त्यावर बरेच चांगले पॉडकास्ट ऐकू शकतात. एकदा नक्की भेट द्या !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *