engage your audience

आपल्याला बर्‍याचदा काळजी असते की आपला पॉडकास्ट प्रेक्षकांना आवडणार का नाही? परंतु जर आपल्याला माहिती असेल की आपली सामग्री मुळातच चांगली आहे तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही .काळजी करू नका ! आम्ही तुम्हाला या लेखामध्ये हेच सांगणार आहोत की तुमच्या पॉडकास्टसाठी चा अधिक बेस्ट ऑडिबल एपिसोड कसा तयार करावा ? या लेखात आम्ही पॉडकास्ट चाएपिसोड अधिक बेस्ट ऑडिबल एपिसोड करण्याबद्दल काही टिप्स देऊ जेणेकरून आपण ज्यावेळी पॉडकास्ट वर बोलत असतात त्या प्रत्येक सेकंदाशी श्रोते आपल्या पॉडकास्ट बरोबर जोडलेले राहतील किंवा ज्यावेळी पॉडकास्ट प्ले होईल, तेव्हा श्रोते त्यांच्या खुर्चीशी घट्ट बसून तुमची वाट पाहत बसलेले असतील.

प्रथम, आपण काही विशेष अश्या प्लॉटस बद्दल बोलूया जे ठेवणे तुमच्या पॉडकास्ट मध्ये बेस्ट ऑडिबल एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्याकडे एखादा कंटेंट असू शकतो जो आपल्याला आवडत असेल आणि त्याचे कौतुक केले जाईल, परंतु त्यात काही रस नसेल किंवा आपण जशी केकच्या वर चेरी ठेवतो त्याप्रमाणे जर त्यावर काही टॉपिंग नसेल तर तुमचा पॉडकास्ट ऐकणार्‍याला बहुतेक मजा येणार नाही.

याच ठिकाणी हे मुद्दे प्रकाशात येतात जे तुमच्या पॉडकास्ट ची टेस्ट अधिक छान करतात.

तर आपल्या पॉडकास्टची चव वाढवण्यासाठीचे वेगवेगळे घटक आपण पाहूया.

वाचा

आपण सर्वजण या गोष्टीशी सहमत असू की जेव्हा आपण आज एखादी गोष्ट वाचतो तीच काही काळाने वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती कुठल्या तरी वेगळ्या अर्थाने आपल्याला समजते. अनेकदा ती काही काळा नंतर वाचली तरी त्यात नवीन नवीन गोष्टी टाकाव्याश्या वाटतात. हा आपल्या सर्वांचाच अनुभव असतो. आपण पॉडकास्ट मध्ये सुद्धा विनोद व्यवस्थित उतरविला आहे की नाही किंवा आपण ऐकणार्‍यांसाठी योग्य प्रकारे रहस्य तयार करण्यात यशस्वी झालो आहोत का नाही हे आपण वाचून चाचपडून पाहिले पाहिजे.

म्हणूनच, जरा खात्री करा की आपण आपली स्क्रिप्ट एकापेक्षा जास्त वेळा वाचली आहे जेणेकरून आपल्याला काही चुकले आहे की नाही हे माहित असेल किंवा आपल्या पॉडकास्ट मध्ये शक्य तितके बेस्ट ऑडिबल एपिसोड बनविण्यासाठी आपण काहीतरी बदल करू इच्छित असाल तर त्याप्रमाणे बदल करून घ्या.

तालीम करा

आपल्याला एकदा माहित झाले की, आपल्या पॉडकास्टच्या स्क्रिप्ट लेखनात कोणतीही त्रुटी नाही तेव्हा ते मोठ्याने वाचून जरा आधी तालिम करून घ्यायला हवी. आपण स्वतःची स्क्रिप्ट स्वत:च लिहित असाल तर आपल्या टीपा / स्क्रिप्ट एकदा डोक्यात बसवल्या की नंतर त्या बाजूला ठेवून ताज्या जोमाने आणि उत्साहाने रेकॉर्ड करायला सुरुवात करा आणि विश्वासाने नवीन प्रयोग करत रेकॉर्डिंग करा. ह्या मुळे तुमचा पॉडकास्ट अधिकाधिक खुलत जातो आणि अधिकाअधिक ऑडिबलबनतो.

पुन्हा एकदा खात्री करा

आता आपणास जरा तालिम केल्यानंतर जर असे वाटले की काही गोष्टी काढून टाकायला हव्यात किंवा आपल्या स्क्रिप्ट मधील काही वाक्ये सुधारायला हवीत तर आपण त्याप्रमाणे बदल करू शकतात किंवा आपल्या स्क्रिप्ट मध्ये आपण आणखी काही घटक जोडू शकता. या सर्व बाबीची पुन्हा एकदा खात्री करा आणि आपल्या पॉडकास्ट चं रेकॉर्डिंग सुरू करा.

ज्या ठिकाणी समस्या येते अश्या जागा ओळखा आणि त्या लिहून ठेवा 

आपणास जिथे असे वाटते की आपण विशेषत: एखाद्या ठिकाणी घोळ करीत आहात आणि आपल्याला हे माहित आहे की हा मुद्दा जर काढून टाकला तर आपल्या स्क्रिप्टशी न्याय होणार नाही, तर आपण ते वेगळ्या ठिकाणी लिहिलेले असल्याची खात्री करा किंवा लहान नोट्स बनवा जेणेकरुन आपण ते वाचता तेव्हा आपल्याला माहित असेल की ‘ मला हे वाक्य किवा शब्द आवर्जून सांगण्याची गरज आहे. ‘

आपण जसे वाचणार आहात तसे लिहा

या घटकामध्ये आपण आपली स्क्रिप्ट चिन्हांकित करणे महत्वाचे आहे, मग भलेही ते हायलाईटर किंवा पेनाने अधोरेखित करणे असो, ते वेगळ्या फॉन्टमध्ये किंवा भिन्न रंगाने लिहिले जाऊ शकते. आपल्याला जसे आवडते तसे लिहा. फक्त आपल्याला खात्री करणे आवश्यक आहे की आपण कोठे जोर देणे गरजेचे आहे आणि आपल्यास कुठे विराम देणे आवश्यक आहे. हे सर्व रेकॉर्डिंग करतांना आणि स्क्रिप्ट लिहितांना स्वाभाविक वाटेल याची खात्री करुन घ्या. शेवटी एका पॉडकास्टमध्ये आपण आपल्या श्रोत्यांना काय ऐकवत आहात हेच आपल्यासाठी महत्वाच ठरतं. म्हणूनच स्क्रिप्टवर सर्व चिन्हांकन चांगल्या प्रकारे करून ठेवा .थोड्याफार सरावाने हे सहज विकसित केले जाऊ शकते जे आपल्याला दीर्घकाळ मदत करेल.

आवाज

आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की पॉडकास्ट केवळ आपल्यासाठीच नाही तर इतर लोकांसाठी देखील आहे, म्हणूनच आपली स्क्रिप्ट हळू हळू वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या श्रोत्यांना ते समजेल , आपल्या पॉडकास्टचे बेस्ट ऑडिबल एपिसोड अधिक आनंददायक बनविण्यासाठी श्रोत्यांचा योग्य मूड सेट करेल.

रेकॉर्ड करतांना

podcast production

पॉडकास्ट निर्माते ‘फक्त एक टेक घेतला आणि झालं’ या वृत्तीचे असू शकत नाहीत. म्हणून आपण आपल्या पॉडकास्ट च्या एपिसोड चे काही एपिसोड करून रेकॉर्ड केल्यास हे सुनिश्चित करु शकतात की आपला पॉडकास्ट उत्कृष्ट रेकॉर्ड होतो आहे का नाही . कारण पॉडकास्ट मध्ये बेस्ट ऑडिबल एपिसोड करण्याच्या मागे तुमचा संपूर्ण हेतु हाच असतो की पॉडकास्ट आनंददायक आणि मनोरंजक व्हावा. तुमच्या पॉडकास्ट मध्ये बेस्ट ऑडिबल एपिसोड रेकॉर्ड करणे एक लांब प्रक्रिया ठरू शकते. परंतु आपला पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यासाठीचा उद्देश्य लक्षात ठेवा आणि पुन्हा जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की यापेक्षा तुमचा पॉडकास्ट चांगला होऊ शकत नाही तेव्हा पर्यन्त प्रयत्न थांबवू नका.

ह्या काही टिप्स होत्या तुमच्यासाठी, की ज्याने आपण आपल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकता आणि त्यांना आपल्या कंटेंट च्या प्रेमात पाडू शकतात, जेणेकरून आपण आपला पॉडकास्ट जेव्हाकेव्हा पोस्ट करत जाल तेव्हा तेव्हा तुमचे श्रोते तुम्हाला ऐकण्यासाठी परत परत येत राहतील.

लक्षात ठेवा, हे घटक महत्वाचे आहेत आणि हे परिपूर्ण करण्यासाठी आपण ह्या गोष्टी आपल्या पॉडकास्ट मध्ये उतरवल्या पाहिजेत आणि शेवटी एक उत्कृष्ट पॉडकास्ट तयार होण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

यावर, KUKU FM आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड संगीत आणि साऊंड एफ्फेक्ट्स त्यांच्या अ‍ॅप मध्ये ऑफर करते जे आपण जोडू आपल्या पॉडकास्टमध्ये जोडू शकतात आणि आपल्या पॉडकास्ट ला एक नवीन स्तरावर नेऊ शकतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *