पॉडकास्ट साठी स्पॉन्सरशिप कशी मिळवावी ?

आम्हाला खात्री आहे की आपल्याला आपल्या एखाद्या आवडीस कमाईत बदलण्याची इच्छा बरयचदा होत असेल. यासाठी तुम्हाला मिळणार्‍या प्रत्येक संधीचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. स्पॉन्सरशिप नेमकं तेच करते, जिथे आपण आपल्या पॉडकास्टमधुन आपल्याला स्पॉन्सरशिप देणार्‍या कंपनीची उत्पादने किंवा सेवा आपल्या प्रेक्षकांना वापरण्यास किंवा घेण्यास सांगतो. हे आपल्या पॉडकास्टच्या कंटेंटमधून आपल्याला कमाई करण्यात मदत करते. पण सोबतच हे पण लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही ज्या कंपनीच्या सेवा किंवा उत्पादनं विकतात त्याला तुम्ही अप्रत्यक्षपणे समर्थनही देत असतात. हाच या गोष्टीचा अवघड भाग आहे. यामुळे आपल्याकडे येणारी कुठलीही स्पॉन्सरशिप आपण निवडू शकत नाही. तसेच आपल्यासाठी कुठली स्पॉन्सरशिप चांगली ठरते आणि आपण कोणत्या स्पॉन्सरशिप सोडून द्यायला हव्यात यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

ह्या लेखात स्पॉन्सरशिपद्वारे आपल्या पॉडकास्टवर कमाई करण्याच्या सर्व संबंधित बाबींबद्दल आपण चर्चा करणार आहोत.

पॉडकास्टिंगची ताकद

प्रायोजक आपल्यापर्यंत पोहोचतात कारण त्यांना दिसते की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये यशस्वी आहात आणि आपल्याकडे आपला काही विशिष्ट असा श्रोतृवर्ग तयार आहे. म्हणून आपल्या कंटेंटला साजेश्या अश्या प्रायोजकांची नेमणूक करणे आणि आपले श्रोते आपल्या शब्दावर विश्वास ठेवणार आहे हे लक्षात ठेवणे, त्यांना कुठलेही उत्पादन किंवा सेवा वापरण्यास सांगण्या आधी गरजेचे आहे. आपण आपली स्पॉन्सरशिप योग्य प्रकारे निवडत आहात याची खात्री करुन घ्या कारण ती आपली प्रतिमा चित्रित करीत असते आणि आपले श्रोते आपल्या शब्दावर, आपण सुचवलेल्या वस्तु व सेवा वापरणार असतात.

स्पॉन्सरशिपच्या पध्दती

आपण स्पॉन्सरशिप मुख्यतः दोन मार्गांद्वारे करू शकतात. हे पूर्णपणे आपण आणि आपल्या प्रायोजकांवर अवलंबून आहे की आपण या दोन मार्ग किंवा पद्धतीनमधील नक्की कुठला मार्ग निवडतात.

आपल्या पॉडकास्ट मध्ये समर्पित विभाग

स्पॉन्सरशिप मिळविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या पॉडकास्ट दरम्यान आपल्या स्पॉन्सर ची जाहिरात करणे. एखादा विभाग आपण स्पॉन्सरशिपसाठी आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये राखीव ठेऊ शकतात की ज्यामध्ये उत्पादन किंवा सेवेविषयी विस्तृतरित्या पार्श्वभूमी दिली जाणार आहे आणि आपल्याला ते कसे आवडते आणि आपण स्वत: ती वस्तु व सेवा कोठे मिळवू शकता याची माहिती आपण देऊ शकतात.

हस्तक्षेप करण्यार्‍या जाहिराती, जसे की रेडिओ ही एक अशी पद्धत आहे जिथे पॉडकास्ट मध्ये आपल्या श्रोत्यांना उत्पादनाची सेवेची आधीपासूनच रेकॉर्ड केलेली जाहिरात ऐकवली जाते. एकदा बोलण्याच्या साखळी मध्ये अचानक ब्रेक घेऊन ट्रॅक प्ले झाला की पुन्हा रेग्युलर संभाषण चालू होते.

तुमच्या श्रोत्यांना असेदेखील वाटू शकते की कदाचित तुम्ही जी जाहिरात एकवत आहात ती बनावट आहे. ही खूप पारंपरिक पद्धत असल्याने आणि तुम्ही स्वत: त्या वस्तु आणि सेवा वापरता की नाही हे न सांगितल्यामुळे देखील आपले श्रोते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. सहसा ज्या जाहिराती या माध्यमातून तुम्ही देतात ​ त्यावर आपले श्रोते बर्‍याचदा विश्वास ठेवत नाहीत.

प्रायोजकांचा समावेशस्पॉन्सरशिप

पॉडकास्ट मधील जाहिरातींचे स्थान आपल्याला किती पैसे मिळतात यरून आपण निश्चित करु शकतात. उदाहरणार्थ, जर आपली जाहिरात शेवटी दिली गेली असेल तर आपण कमी पैसे स्वीकारले जाऊ शकतात परंतु जर ते आपल्या कथेच्या दरम्यान जाहिरात असेल तर जेथे आपले श्रोते सर्वात अधिक गुंतलेले असतील आणि अश्या ठिकाणी जाहिरात करण्यासाठी रेट जास्त असेल.

देय (पेमेंट)

हा घटक पॉडकास्ट निर्माता आणि स्पॉन्सर यांच्यामधील कराराच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. देय काय घ्यायचे याची एक निश्चित रक्कम आणि पद्धती नाही. उदाहरणार्थ, हे निर्मात्यावर अवलंबून असते की त्याला त्याचा ऐकलेल्यांच्या संख्येवर शुल्क आकारायचे आहे किंवा तुम्ही दिलेल्या लिंक आणि प्ले बटन वरील क्लिकच्या संख्येवर शुल्क आकारायचे आहे. याबद्दल जाणण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या श्रोत्यांनी तुम्ही संगीतलेले उत्पादन किंवा सेवा वापरण्यासाठी किती लोकांनी संपर्क साधला यावरून तुम्हाला मिळणारे पैसे ठरू शकतात.

आपणास जेव्हा पर्यन्त अपेक्षित पैसे देण्यास तयार असलेले स्पॉन्सर मिळत नाहीत तोपर्यंत आपण थांबू शकतात आणि आपल्या कंटेंटच्या हिशोबाने आकारायची किंमत ठरवू शकता.

स्पॉन्सरशिप मधील त्रुटि

आपल्या सर्वांना माहित आहे की आपण करत असलेल्या प्रत्येक क्रियेची कुठलीतरी कमकुवत बाजू असते. तेव्हा हे पाहणे योग्य होईल की स्पॉन्सरशिप च्या कुठल्या कमकुवत बाजू आहेत ?

स्पॉन्सरशीप मध्ये पैशाचा सहभाग आहे आणि आपण प्रायोजकांशी करार केला आहे तेव्हा आपण त्यांच्यानुसार काम करणे बंधनकारक आहे. असे काही वेळा होऊ शकते की जेव्हा आपणास आपला कंटेंट आपल्या स्पॉन्सरच्या गरजेनुसार ठेवावा लागू शकतो आणि बर्‍याचदा आपल्या स्पॉन्सरच्या गरजेनुसार आपल्याला आपल्या कंटेंट मध्ये बदल करावा लागू शकतो.

आपले श्रोते कदाचित आपल्या पॉडकास्ट द्वारे जर जाहिरातींचे अतिक्रमण झाले तर निराश होऊ शकतात. अगदी ऐकण्यामध्ये एकाग्र झालेल्या श्रोत्यांना अचानक कर्कश जाहिरात ऐकवणे त्यांना बर्‍याचदा न आवडणारे असू शकते.

याव्यतिरिक्त, आपल्या पॉडकास्टवर जर खूप जाहिराती दिसल्यात तर आपले काम रसहीन होऊ शकते आणि ऐकणार्‍यालाही ते कंटाळवाणे वाटते.

आपल्या आणि आपल्या स्पॉन्सर दरम्यान माध्यम

प्रायोजकांशी संपर्क साधण्याचे अनेक मार्ग आहेत, कदाचित सुरूवातीस, आपल्याला संभाव्य प्रायोजकांना मेल पाठवावे लागू शकतात आणि स्पोन्सरशिप मिळविण्यासाठी त्यांना विनवणी करू शकतात.

तसेच आपण आपला एक श्रोतृवर्ग तयार केल्यास ,प्रायोजक आपल्या पॉडकास्ट च्या अस्तित्वाची दखल घेऊन जाहिरात करण्यासाठी आपल्यापर्यन्त पोहोचतील. आपला ई-मेल आय डी आपल्या पॉडकास्ट च्या अकाऊंट मध्ये नक्की द्या जेणेकरून आपल्यापर्यंत आपले स्पॉन्सर पोहोचू इच्छित असल्यास त्यांना आपल्याला संपर्क करणे सोपे जाईल.

स्पॉन्सरशिप बद्दल आपल्याला माहित असल्या पाहिजे अश्या काही गोष्टींचा हा सारांश आहे, म्हणूनच या गोष्टींवर लक्ष ठेवा आणि आम्ही आपणास आपल्या पॉडकास्ट करियर साठी आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *