पॉडकास्ट बनवतांना ह्या गोष्टी टाळा !

आज पर्यन्त आपण अनेक विषय हाताळलेत. हे सर्व विषय तुम्ही पॉडकास्ट बनवतांना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या संबंधी होत्या. आज आपण वेगळ्याच गोष्टींना हात घालणार आहोत. ह्या गोष्टी तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना आपसूकच टाळतच असाल पण काही चूक तुमच्या हातून होऊ नये म्हणून एकदा या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.

असं म्हणतात की कला ही समाजाचे चित्र उभे करत असते. पण सोबतच कला समाजाचे प्रबोधनही करत असते. समजाचे मार्गदर्शन करत असते. यामुळे काही नैतिक मूल्ये पाळणे हे कलाकारांचे कर्तव्य आहे. केवळ प्रसिद्धी आणि पैश्यांच्या मागे लागून आपल्या पॉडकास्ट मध्ये काहीही कंटेंट देणे योग्य नाही. पॉडकास्ट ऐकणारी जनता खूपच सुज्ञ असते. अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना टाळायला पाहिजे.

KUKU FM अश्या कुठल्याही कंटेंट चे समर्थन करत नाही की जे समाजाला घातक आहेत. सोबतच अनेक पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म जर तुम्ही खालील गोष्टींचं समर्थन करणरा कंटेंट देत असाल तर तुमचं समर्थन करत नाही. तुम्ही जर असा कंटेंट देत असाल तर तुमचा पॉडकास्ट काढून टाकणे किंवा कारागृहात टाकण्यापर्यंतची कारवाई तुमच्यावर होऊ शकते.

आता आपण विस्तृतरित्या पाहुयात की असे कोणते मुद्दे आहेत की जे तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना तुमच्या कंटेंट मधून टाळले पाहिजेत.

1. अश्लील तसेच पोर्नोग्राफिक कंटेंट

ह्याप्रकारचा कंटेंट KUKU FM वर तरी मुळीच खपवून घेतला जात नाही. लहान मुलानविषयक पोर्नोग्राफिक कंटेंट देणं हा तर कायदेशीर गुन्हाच आहे. KUKU FM वर तुम्ही कुठलेही अश्लील साहित्य टाकू शकत नाहीत. अनेक पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म अश्या कंटेंट ल थारा देत नाहीत. पण याशिवाय हे आपले नैतिक कर्तव्य सुद्धा आहे की तुम्ही अश्या प्रकारचा कंटेंट पोस्ट करू नये. असे प्रकार आढल्यास तुमचा पॉडकास्ट काढून टाकला जाऊ शकतो.

2. घातक कंटेंट 

घातक सामग्री

तुम्ही समाजासाठी तसेच विशेषकरून लहान मुलांसाठी घातक असणारा कंटेंट तुमच्या पॉडकास्ट मधून टाळला पाहिजे. उधहरणार्थ जर विशेष करून तुमचा पॉडकास्ट जर लहान मुलांना गोष्टी सांगणारा असेल तर त्यांच्या वयाला साजेश्या गोष्टींचाच समावेश करणे. कुठलाही क्रूर किंवा भिबत्स वाटणारा कंटेंट न देणं. तसेच तुम्ही जर वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ नसाल तर तुम्ही घातक किंवा आरोग्यविषयक टिप्पण्या करू शकत नाही. असा कंटेंट टाळायला हवा की जो जीवित हानी घडवून आणेल.

3. द्वेष पसरवणारा कंटेंट 

तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना कुठल्याही धर्मा विरोधी गोष्टी बोलू शकत नाही. धर्माधर्मात तिढा निर्माण करतील अश्या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना त्यामध्ये करू शकत नाहीत. सोबतच जाती , वंश , वर्ण , भाषा किंवा समाज यांच्या भावनांना ठेस पोहोचवणारा कंटेंट किंवा यांच्यात भेद निर्माण करणारा कंटेंट तुम्हाला देता येत नाही. अनेक लोकं सोशल मीडिया वर अश्या प्रकारचा कंटेंट देत असतील. पण पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर हे खपवून घेतलं जाणार नाही. तुमच्यावर ह्यामुळे नक्कीच कयदेशीर कारवाई होऊ शकते.

4. हिंसक किंवा किळसवाणा कंटेंट 

तुम्ही अत्यंत क्रूर आणि हिंसक असणारा कंटेंट देऊ शकत नाहीत. एकादा पॉडकास्ट बनवतांना त्याच्या कंटेंट मध्ये एखाद्या खुनाचं एकदम क्रूर वर्णन करणं अश्या आशयातला कंटेंट तुम्ही देऊ शकत नाहीत. सोबतच जर तुम्ही तुमच्या थंबनेल मध्ये अश्या काही चित्रांचा समावेश करत असाल तर ते पण निषिद्ध आहे. असा कंटेंट ऐकणार्‍याचे आणि बघणार्‍याचे मन विचलित करतो. तुम्ही जर असा कंटेंट देत असाल तर तुमच्या पॉडकास्ट वर आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते. सोबतच तुम्ही अश्लील स्वरुपातील साहित्य किंवा कंटेंट देऊ शकत नाहीत.

5. त्रासदायक किंवा छळवादी कंटेंट

हे प्रकार बहुतेक कमेन्ट सेक्शन मध्ये जास्त पहिले जातात. अनेक अश्या प्रकारच्या कमेन्ट येतात की त्या तुम्हाला त्रासदायक ठरतात. अश्या कमेन्ट ची तक्रार तुम्ही आवर्जून तुमच्या पॉडकास्ट होस्ट कडे करायला हवी. सोबतच जर तुमच्या श्रोत्यांचा डाटा तुम्ही जर मिळवला असेल तर त्याचा वापर करून कुणाची छळवणूक कारण किंवा फ्रौड करण हा गुन्हा आहे. तुमच्या श्रोत्यांचा डाटा चुकूनही लिक व्हायला नको. तुमचे श्रोते तुमच्यावर विश्वास ठेवतात तर तुम्हीही त्यांच्या विश्वासाला जपलं पाहिजे.

6. स्पॅम, दिशाभूल करणारा कंटेंट आणि घोटाळे

तुमच्या पॉडकास्ट चा टाइटल आणि कंटेंट मध्ये तफावत करू नका. म्हणजे काही असे उदाहरणं जसे की, ‘हे ऐकलं तर तुमचा पैसा एक महिन्यात डबल’ असे टाइटल देऊ नका. त्याचप्रमाणे असे थंबनेल वापरू नका जी बघणार्‍यांची दिशाभूल घडवून आणेल. तसेच जर कोणी घोटाळे करण्यासाठी पॉडकास्ट चा वापर करायचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

7. धमक्या देणे

तुमच्या पॉडकास्ट वरुन लोकांना तुम्ही किंवा इतर कोणीही धमकया देऊ शकत नाही. तुम्ही हिंसक रित्या तुमच्या श्रोत्यांशी संभाषण करू शकत नाही. तसेच कमेन्ट मध्ये धमक्या देणे सुद्धा खपवून घेतलं जात नाही. एखयादयाच्या वैयक्तिक गोष्टी माहिती करून घेऊन त्याचा शारीरिक किंवा मानसिक छळ करणे, धमकावणे किंवा गोपनीयतेवर आक्रमण करणे हा अक्षम्य अपराधच आहे. लोकांची व्ययक्तिक माहिती उघड करणे आणि इतरांना हिंसक कृत्य करण्यास किंवा अटींच्या वापराचे उल्लंघन करण्यासाठी उद्युक्त करणे या गोष्टी गंभीरपणे घेतल्या जातात.

या केवळ काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना टाळायल हव्यात. अश्याच अजून काही गोष्टी आपण ह्या लेखाच्या दुसर्‍या भागात बघणार आहोत.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *