टारगटेड ऑडियन्स ओळखा

आपल्याकडे चांगला कंटेंट आणि कथा सांगण्याचे उत्तम कौशल्य असल्यास, पॉडकास्ट तयार करून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचु शकतात. आपल्यासाठी आपल्या टारगटेड ऑडियन्सशी असलेले नाते सर्वात महत्वाचे आहे. आपण आपल्या टारगटेड ऑडियन्स साठी आपला कंटेंट तयार करता, आपण आपल्यासारख्याच विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणता किंवा जे लोक आपल्याकडील एखाद्या गोष्टीविषयी किंवा आपल्याकडे असलेले अन्य ज्ञान जाणून घेण्याची इच्छा बाळगणारे असतात अश्या सर्व लोकांना आपण आपल्या पॉडकास्ट च्या माध्यमातून मदत करत असतात. एखादी सुंदर आणि रुचकर रेसिपी कशी बनवायची किंवा आपणाकडील एखाद्या गोष्टीचे ज्ञान इतरांना कसे द्यावे हा आपला पॉडकास्ट बनवण्यामागील हेतु असू शकतो. तुमच्याकडे प्रत्येक विषयासाठी नेहमीच काही ठराविक टारगटेड ऑडियन्स असतात.

टारगटेड ऑडियन्स असणे महत्वाचे का आहे?

वरील सर्व बाबींमध्ये आपल्याला कदाचित लक्षात आलं असेल की , पॉडकास्टच्या प्रवासामध्ये आपले टारगटेड ऑडियन्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. स्वत: चा एक मोठा टारगटेड ऑडियन्स बनवताना काही प्रयत्न करावे लागतात कारण ते आपले काही असे साथीदार आहेत जे आपल्याबरोबर कायम टिकायला हवेत आणि आपण ज्या उंचीवर जाण्याची इच्छा बाळगता, त्या स्तरावर नेण्यास ते आपल्याला मदत करणार आहेत.

तर, या लेखात, आम्ही आपल्याला आपल्या टारगटेड ऑडियन्सना जाणून घेण्याच्या वेगवेगळ्या पैलूंसह परिचित करणार आहोत, आणि तुमच्या टारगटेड ऑडियन्सच्या इच्छेची पूर्तता कशी करावी याबद्दलही थोडं सांगू ,जे आपल्याला आणि आपल्या पॉडकास्टला शेवटी फायद्याचं ठरेल.

आपल्या टारगटेड ऑडियन्सबद्दल आपण काय गृहित धरू शकतो?

हे टारगटेड ऑडियन्स आपल्याला जितके कठीण वाटतात तितकेच ते एका सोप्या वाक्यात समजले जाऊ शकतात. ‘’त्यांना पाहिजे फक्त एक चांगला आणि त्यांच्या आवडीशी संबंधित असलेला कंटेंट पाहिजे !बसं!.’’

शिवाय, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून आपण आपल्या टारगटेड ऑडियन्सच्या या गरजेला कसा न्याय देतात यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहे. आपल्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रेक्षकांना अर्थपूर्ण कंटेंट देणं आणि आपल्या बोलण्याने गुंतवून ठेवण आवश्यक आहे, कारण आपण जे काही तयार करता ते आपल्या कोणत्या टारगटेड ऑडियन्सना आकर्षित करेल व ते जिथून कुठून आले आहेत तिथून त्यांना तुमच्या पॉडकास्ट शी किती समरसता वाटेल आणि तुमच्या पॉडकास्टच्याबद्दल अधिक ऐकण्याची इच्छा त्यांना होईल का नाही, आपण ज्याबद्दल बोलता त्याबद्दल त्यांना अधिक जाणून घ्यायचे आहे का नाही आणि आपण एखाद्या विषया बद्दल ज्या पद्धतीने बोलता त्याबद्दल त्यांचे कौतुक तुम्हाला मिळतं का नाही हा खरच अभ्यासकरण्याजोगा विषय आहे. यामुळे तुम्हाला तुमचा पॉडकास्ट अधिक उत्तम करण्यासाठी वाव मिळेल. म्हणूनच अधिकाधिक मनोरंजक मार्गाने त्यांना पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करा.

कंटेंटवर आधारित टारगटेड ऑडियन्सना लक्ष्य करणे.

मला वाटतं की आपल्याला आपल्या टारगटेड ऑडियन्सच्या इतक्या गरजा पूर्ण करयाच्या आहेत हे पाहून आपल्याला नक्कीच भीती वाटली असेल; म्हणून येथे आम्ही आपल्याला मदत करणार आहोत. लोकांना काय हवे आहे ते समजून घेणे आणि त्या ज्ञानावर आधारित आपला कंटेंट तयार करणे गरजेचे असते.

उदाहरणार्थ, आपण वेगवेगळे व्यासपीठ(websites) आणि फोरम्स वापरू शकता आणि सध्याचे जे चर्चेचे विषय आहेत त्यांची माहिती घेऊ शकतात आणि टारगटेड ऑडियन्स सध्या काय ऐकण्यास पसंती देतात हे निर्धारित करु शकतात.

उदाहरणादेखल , अशी कल्पना करा की आपण शेफ आहात आणि आपल्याकडे बर्‍याच पाककृती आहेत ज्याची सुरुवात नक्की कुठून करावी हे आपल्याला नक्की माहित नाही.

म्हणून आपला विषय सोपे जेवणाचे पदार्थ कसे शिजवावे , फ्यूजन मील्स इत्यादी विभागांमध्ये विभाजित करा.

आता आपल्या प्रवर्गांच्या आधारे विचार करा की यासाठी योग्य टारगटेड ऑडियन्स कोण असतील. “शिजवण्यासाठी सुलभ असलेल्या” ह्या विभागात आपण कार्यरत व्यावसायिक, गृहिणी इत्यादींना लक्ष्य करू शकता.तसेच फ्यूजन मील्स साठी तुम्ही जे विद्यार्थी शेफ होऊ पाहत आहे त्यांना टार्गेट करू शकतात.

तर आश्याप्रकारे आपला विषय काही विभागांमध्ये विभागून , आपला कंटेंट योग्य प्रेक्षकांकडे पोहोचवा.

अभिप्राय-

अभिप्राय

आपण या क्षेत्रात आल्यानंतर आपण निश्चितच काही विश्वासार्ह टारगटेड ऑडियन्सना एकत्र केले असेल, म्हणून त्यांना तुमच्या पॉडकास्ट विषयी विचारा! अभिप्राय प्राप्त करणे आणि तुमच्या टारगटेड ऑडियन्सना नक्की काय ऐकायच आहे हे जाणून घेणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि हे आपल्याला आपला पॉडकास्ट उत्तम करण्यास नक्कीच मदत करेल. आपण हे विविध प्रकारे करू शकता, जसे की

टिप्पण्या(comments) –

बरेच प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना टिप्पण्या देण्यास आणि संवाद साधण्यास अनुमती देतात. कुकु एफएम वर दररोज सरासरी 650 पेक्षा जास्त टिप्पण्या जोडल्या जातात. अभिप्रायाची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्या टिप्पण्यांचा नंबर 1 साधन म्हणून विचार करा

सोशल मीडिया-

आजच्या युगात हे आश्चर्य मुळीच वाटत नाही की , योग्य माध्यमांचा वापर केल्यास सोशल मीडिया हे एक मौल्यवान साधन ठरू शकते जे तुमचं पॉडकास्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास आणि पॉडकास्ट मध्ये योग्य तो बदल करण्यास सहायक ठरू शकते.

आपले पॉडकास्ट-

आपल्या पॉडकास्टमध्येच अभिप्राय विचारा. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचे अभिप्राय तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी वापरकर्त्यांना तुमचा ईमेल आयडी द्या.

आपल्या टारगटेड ऑडियन्सची संख्या कमी होवू देऊ नका

तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही अगदी प्रत्येक तपशीलाकडे लक्ष देऊ शकत नाही आणि सर्वांच्याच विशिष्ट इछांची पूर्तता करू शकत नाहीत. आपण आपला प्रामाणिक ‘स्व’ जोपासणे आवश्यक आहे आणि सोबतच लोकांसाठी उपयुक्त असा कंटेंट ठेवणे आवश्यक आहे, तसेच त्यास चांगल्या प्रकारे बाजारात आणणे आवश्यक आहे आणि आपले टारगटेड ऑडियन्स आपल्यामध्ये नक्की तेच शोधत असतात. तुमचा नॅचरल कंटेंट ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला प्रेक्षकांशी जोडत असते आणि आपण त्यांना आपला असा कंटेंट देतात तेव्हा नक्कीच त्यांना तो आवडणारच आहे.

ह्या व्यतिरिक्त फक्त तीन गोष्टींची खात्री करुन घ्या की ह्या तुमच्या पॉडकास्ट च्या कंटेंट मध्ये आहे का नाही ज्या तुमच्या आणि इतरांच्या पॉडकास्ट मध्ये स्पष्ट फरक दर्शवू शकतात, त्या म्हणजे-

तुमचा पॉडकास्ट तुमच्या टारगटेड ऑडियन्सना खिळवून ठेऊ शकतो का?

तुमच्या पॉडकास्ट मधून काही शिकवण मिळते का ?

किंवा तुमचा पॉडकास्ट पुरेशी करमणूक करतो का ?

जर आपल्याला खात्री आहे की आपला पॉडकास्ट या तिघांपैकी एक काहीतरी आपल्या प्रेक्षकांना देतो आहे , तर आपण योग्य मार्गावर आहात. आपल्याला फक्त आपला कंटेंट अधिक चांगला करणे आवश्यक आहे आणि आपल्या यशास मग कोणीही रोखू शकत नाही.

याव्यतिरिक्त, आपल्या पॉडकास्ट ला प्रसिद्धी देण्यासाठी इतर बरेच मार्ग आहेत. जसे की ,अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवर असणे ज्यांच्याकडे आधीपासूनच विपुल प्रमाणात फोलोवर्स आहे. उदाहरणार्थ, कुकू एफएम जिथे प्रेक्षकांची संख्या प्रचंड आहे (इथे 25 लाख लोक ऐपवर पॉडकास्ट ऐकत असतात) हे सुनिश्चित करत की अधिकाधिक आपले टारगटेड ऑडियन्स वाढावेत जेणेकरून तुम्हाला पॉडकास्ट मध्ये प्रगति करण्यासाठी लागणारा वेळ एक मैलाने कमी होईल.

 

कुकू एफएमच्या मदतीने आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. आपला प्रवास सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा.click here

आम्ही आपणास शुभेच्छा देतो आणि आपण ज्या ध्येयासाठी कार्य करता ते सर्व आपण साध्य करावे अशी आशा करतो!


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *