सार्वजनिकरीत्या बोलण्याची भीती कशी घालवावी?

सार्वजनिकरीत्या बोलणे म्हणजे एखाद्या गटामध्ये किंवा समूहासमोर बोलणे. प्रत्यक्षात कुठल्याही कले पेक्षा उत्तम बोलणे ही कला अवगत करणे खरोखरच कठीण आहे. बोलणे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या लहानपणा पासूनच शिकत असतो, पण तरीही ज्यावेळी अनेक लोकांसमोर सार्वजनिकरित्या बोलण्याची वेळ येते तेव्हा आपली फजिती उडते. सामान्यपणे बोलतांना तर प्रत्येकजण बोलू शकतो, परंतु समूहात बोलण्याची कला अगदी प्रत्येकामध्येच असते असं नाही. आपण एखाद्याला बोलताना पाहिलं आणि असा विचार केला आहे का, की तो इतका चांगल्या रित्या आणि प्रभावीपणे कसा बोलू शकतो ? एखाद्याचे भाषण किंवा वादविवाद ऐकून आपण कधीतरी प्रभावित झाला असाल. अशा लोकांनी त्यांच्या बोलण्याच्या भीतीवर विजय मिळवलेला असतो आणि थोड्या सरावाने ते अनेक लोकांसमोर बोलण्यात पटाईत झालेले असतात.

अनेक लोकांसमोर सार्वजनिकरीत्या बोलणे हा अनेक लोकांसाठीचा एक प्रकारचा फोबिया झालेला असतो, जो त्या व्यक्तीला बोलतांना शंभर टक्के लक्ष बोलण्यावर देण्यापासून परावृत्त करतो. बर्‍याच लोकांना काहीतरी बोलायचे असते आणि त्या दृष्टीने काही चांगले मुद्दे देखील तयार करतात. परंतु जाहीरपणे बोलण्याची भीती त्यांच्या मनात घर करून बसलेली असते ती त्यांची सर्व तयारी खराब करते. त्यांना काहीही बोलता येत नाही आणि मग ते पुन्हा प्रयत्न करणे टाळतात. अनेकदा लोकांकडे पहात असताना, लोक काय म्हणतील याचा विचार मनात भरतो, आणि ती व्यक्ती बोलण्यास संकोच करते.

आपल्याला एक पॉडकास्ट तयार करायचा असल्यास आणि आपल्याला सर्वजनिकरीत्या बोलण्याची भीती असल्यास हे आपल्या पॉडकास्टचे सादरीकरण खराब करू शकते. जेव्हा आपण पॉडकास्ट रेकॉर्ड करतो तेव्हा आपण भलेही एकटे असतो, परंतु ते पॉडकास्ट हजारो लोकांद्वारे ऐकले जाते. बरेच पॉडकास्ट असे असतात जे दिवसातून एकदा लाइव्ह येतात. आपल्या पॉडकास्टचे स्वरूप असे असल्यास आपल्याला सर्वजनिकरीत्या बोलण्याची भीती नाहीशी करणे खूपच महत्वाचे आहे.

ही बोलण्याची भीती घालवण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे त्याची कारणे जाणून घेणे आणि त्यावर कार्य करणे. हे आपल्या पॉडकास्टची कार्यक्षमता सुधारेल आणि हे आपल्याला जीवनाच्या इतर पैलूंमध्ये देखील मदत करेल.

सर्वजनिकरीत्या बोलण्याची भीती वाटण्याचे काही प्रमुख कारणे अशीः

1. चिंता आणि घाबरणे

जास्त विचार करण्यामुळे सर्वजनिकरीत्या घाबरणे ही एक सामान्य भीती आहे. जेव्हा आपण जास्त विचार करता किंवा काळजी करता तेव्हा आपण स्वत: ला अश्या परिस्थितीत ठेवता जिथे आपण चिंतेच्या आहारी जातात आणि ही चिंता लवकरच बोलण्याची भीती बनते आणि आपल्या मनात घर करून बसते. त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे , सराव. आपण जितकया निर्भयपणे आत्मविश्वासाने रेकॉर्डिंगचा सराव कराल तितक्या लवकर ही बोलण्याची भीती तुमच्या मनातून नाहीशी होईल.

2. स्वत:वर खुप दबाव आणणे-

कधीकधी एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी आपण स्वत: वर अधिक ओझे करून घेतो. आपण स्वत: ला असा विश्वास दिला की आपण हे काम करू शकू, की आपल्यावरील ओझं थोडं कमी होण्यास मदत होईल. ‘आपल्याला हे काम लवकरात लवकर पूर्ण करावेच लागेल, मग काहीही झाले तरीही’ अश्या विचाराने आपल्यावर खूप तणाव येतो आणि त्याचा परिणाम आपल्या कामाच्या क्षमतेवर होतो॰ अश्या परिस्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही. एक दीर्घ श्वास घ्या,स्वत: ला सांगा की मी हे करू शकतो आणि बोलण्यास सुरुवात करा.जर तुम्ही गडबडलेल्या स्थितीत असाल तर आपले पॉडकास्ट निश्चितपणे चांगले रेकॉर्ड होणार नाही आणि ऐकण्यास ते वाईटही वाटेल. हे टाळण्यासाठी तुम्हाला हवे असल्यास स्क्रिप्ट लिहा आणि रेकॉर्डिंग करा. किंवा रेकॉर्डिंग करण्यापूर्वी थोडावेळ शांत बसून राहा आणि रेकॉर्डिंगसाठी आपल्याकडे पूर्ण वेळ असल्याची खात्री करुन घ्या. आपण सहजतेने नक्कीच एक चांगले रेकॉर्डिंग करू शकाल.

3. तुमच्या सवयी बदला.

बर्‍याच लोकांना वेगाने बोलण्याची सवय असते तर काही लोकांना अगदीच संथ गतीने बोलण्याची सवय असते. अनेक लोक मध्ये अ ..अ…असं करत अडखळत असतात. बरेच लोक अधिक मोठी स्क्रिप्ट पाहून विचार करतात ही पटापट बोलून संपवून टाकली पाहिजे. परंतु या पद्धतीने रेकॉर्डिंग केल्यास ऐकणार्‍याला ऐकत असताना गोष्टी योग्य प्रकारे समजणार नाही. ही सवय सुधारणे थोडे अवघड आहे, परंतु जर आपण थोडा वेळ हळू आणि स्पष्टपणे बोलण्याचा सराव केला तर तुमची सवय सुधारू शकते आणि तुमच्या पॉडकास्ट चं रेकॉर्डिंगही उत्तम होऊ शकते.

या गोष्टी लक्षात घेऊन आपण सर्वजनिकरीत्या बोलण्याची भीती घालऊ शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सराव करत रहा. लवकरच आपण या बोलण्याची भीती नाहीशी केलेली असेल.

कुकू एफएम वर रेकॉर्डिंग करताना आपणास आढळेल की रेकॉर्डिंगमध्ये काही अडचण येत असेल तर त्या अडचणी दुरुस्त करण्याचे पर्यायही तुमच्याजवळ उपलब्ध असतील. परंतु जर आपली बोलण्याची पद्धत निर्दोष असेल तर आपले पॉडकास्ट ऐकणे अधिक आकर्षक होईल. आणि या टिपा आपल्याला केवळ पॉडकास्टमध्येच नव्हे तर जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये देखील मदत करतील.

कम्युनिकेशन ही आजच्या काळातली एक खूपच महत्वाची गोष्ट झाली आहे. तुम्ही ऐकलच असेल की बोलणार्‍याचे दगडही विकले जातात, पण न बोलणार्‍याचे चणे सुद्धा विकले जात नाहीत. केवळ मला बोलण्याची भीती वाटते म्हणून मी ती करणार नाही या सबबीने तुमची भीती आणखीनच वाढत जाणार आहे. म्हणून किमान पॉडकास्ट वर तरी आजपासूनच बोलण्याचा सराव सुरू करा आणि यासाठी KUKU FM च्या मोबाइल ऐप चा वापर करणं खूपच सोपं आहे. मग काय विचार करताय आजच kuku fm वर पॉडकास्ट सुरू करा आणि तुमची बोलण्याची भीती घालवा !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *