आपण पॉडकास्ट ( podcast) बनवत असल्यास, अर्थातच आपण या क्षेत्रात एकटे नाही आहात. आपल्यासारखे बरेच कलाकार पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर त्यांचा कंटेंट सादर करीत आहेत. अशा परिस्थितीत आपला कंटेंट त्या गर्दीत हरवू नये, म्हणूनच आपला पॉडकास्ट उर्वरित पॉडकास्टपेक्षा युनिक पॉडकास्ट (podcast) असणे आवश्यक आहे. हे आपला पॉडकास्ट युनिक करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. जर आपला पॉडकास्ट इतर पॉडकास्ट सारखाच असेल किंवा त्यांच्या तुलनेत खूपच सामान्य असेल तर आपल्या चॅनेलवरील श्रोत्यांची संख्या कमी होईल आणि लोकांना आपले अनुसरण करणे देखील आवडनार नाही. पॉडकास्टमध्ये कमी श्रोते असणे आणि तो खूपच कमी लोकांनी ऐकणे योग्य नाही. आपल्या पॉडकास्ट चॅनेलवर अधिक अधिक श्रोत्यांना आकर्षित कसे करावे , आज मी आपल्याला त्याबद्दल सांगेन.

जर पॉडकास्ट युनिक करणे संपूर्णपणे फक्त तुमच्या आवाजाचा खेळ आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही, तुमचा कंटेंटही तितकाच महत्त्वाचा आहे. आपणही इतर सर्व कलाकारांप्रमाणेच कंटेंट देत ​​असल्यास लोक आपलं जास्त ऐकणार नाहीत.

आपला पॉडकास्ट उर्वरित पॉडकास्टपेक्षा युनिक कसा करावा (unique podcast kaise banay), आपला कंटेंट ची कशी वेगळी ओळख निर्माण करावी हे आता आपण बघू.

Learn podcasting: युनिक पॉडकास्ट
credit- Rachel Corbett

चला तर मग जाणून घेऊया (how to make unique podcast):

1. सुरुवात आकर्षक हवी

आपण जर आपल्या पॉडकास्टची सुरुवातीची काही मिनिटे उत्तम दिल्यास, नंतर श्रोते आपल्या पॉडकास्टवर शेवटपर्यंत राहण्याची शक्यता जास्त आहे. प्रत्येक पॉडकास्टच्या सुरुवातीच्या रेकॉर्डिंगमध्ये काहीतरी गोड किंवा हळू आवाजात गोष्टी सांगायाला सुरुवात करा. बर्‍याच पॉडकास्ट असे निदर्शनास येते की कलाकार थेट मुद्यानुसार बोलू लागतो आणि म्हणूनच नवीन आलेले लोक त्याच्याशी अधिक लवकर जुळले जाऊ शकत नाहीत. पॉडकास्टच्या सुरूवातीला आपणास जर समझा स्वतःचा एक मजेदार मार्गाने परिचय करून दिलात तर नवीन आलेले श्रोते आपल्या चॅनेलशी किंवा आपल्याशी किवा त्या दिवसाच्या भागाशी लवकर परिचित होतील.

2. पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करा

आपला पॉडकास्ट जर एका सिरीज मध्ये असेल तर ,आपल्या पॉडकास्ट च्या भागाच्या सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना पुन्हा एकदा मागील भागत आपण काय काय पहिलं याची उजळणी करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच मागील पॉडकास्टच्या भागाबद्दल अगदी संशेपमध्ये काहीतरी सांगा. जर ते आलेले श्रोते नवीन असतील तर त्यांना याचा फायदा होईल व त्यांना आपला कंटेंट आवडल्यास ते आपल्या मागील पॉडकास्ट देखील जाऊन ऐकू शकतात. रिक्याप दिल्याने , नवीन श्रोत्यांना आपला मुद्दा समजून घेण्यास अधिक सोयीस्कर वाटेल. सहसा इतर पॉडकास्टमध्ये हा ट्रेंड दिसत नाही म्हणून जर ही युक्ती तुम्ही वापरलीत तर तुमचा पॉडकास्ट हे निश्चितपणे युनिक बनवू शकते.

3. तुमच्या पॉडकास्टचा (podcast) विषय युनिक असायला हवा

आपल्या पॉडकास्टचा विषय आपला पॉडकास्ट युनिक करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतो. जरी आपला विषय सामान्य असेल, तरी त्या सामान्य विषयाच्या अगदी बारीक बारीक बाबी आणि त्याबद्दलचे वेगवेगळे पैलू याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा. सामान्यत: खूपसारे पॉडकास्ट बनवणारे कलाकार मुख्य मुद्द्यांविषयी बोलतात, परंतु आपण प्रयत्न करायला हवा की काही मुद्दे असे पकडले पाहिजेत की ज्याबद्दल आजपर्यंत कोणीही बोलले नाही किंवा त्या विषयामध्ये पॉडकास्ट क्षेत्रात जास्त काही कंटेंट नाही.

4. विषयावर सखोल चर्चा करा

भलेही तुम्ही कुठलाही विषय निवडला असेल ,त्या निवडलेल्या विषयाची पर्वा न करता, आपल्या श्रोत्यांना शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयावर बरेच संशोधन करा. कंटेंट रेकॉर्ड करण्यापूर्वी एकदा लहान नोट्स बनवा जेणेकरुन आपण कुठलीच महत्त्वपूर्ण महिती सोडणार नाही. आपल्या विषयाशी संबंधित काही मजेदार तथ्य आपणास माहिती असल्यास ते देखील सांगा , जेणेकरून पॉडकास्ट ऐकताना आपल्या श्रोत्यांना ते कंटाळवाणे वाटणार नाही.

5. उत्कृष्ट ऑडिओ कंटेंट

ऑडियो कॉन्टेंट: युनिक पॉडकास्ट

रेकॉर्डिंग करण्यापूर्वी आपण कितीही मेहनात घेतलीत आणि कितीही प्रयत्न केलेत पण आपल्या ऑडिओची गुणवत्ता उर्वरित पॉडकास्ट बनवणार्‍या कलाकारांसाखिच असल्यास आपला पॉडकास्ट सामान्य वाटेल. म्हणून रेकॉर्डिंग करताना आपला आवाज आणि स्वरांची विशेष काळजी घ्या. तसेच, रेकॉर्डिंग करताना, कोणतेही बाह्य प्रभाव किंवा आवाज आपला ऑडिओ खराब करीत नाहीत ना हे तपासून पहा. ऑडिओच्या सुरूवातीस आणि शेवटी आपल्या आवाजाचा एक चांगला आणि युनिक ट्यून बनवा. आणि जर आपल्याला जर वाटत असेल तर आपल्या पॉडकास्ट दरम्यान पार्श्वभूमीमध्येही एक मधुर आणि हलका आवाज वापरा.

या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपला पॉडकास्ट नेहमीपेक्षा युनिक आणि अद्वितीय बनवू शकता. या गोष्टी व्यतिरिक्त, कुकू एफएम वरील ध्वनी प्रभाव आपला पॉडकास्ट अधिक चांगला बनवण्यात मदत करू शकतात( learn unique ways of making podcast). शिवाय आपण आपली स्वत: ची सरजशीलता वापरुन आपला पॉडकास्ट इतरांपेक्षा युनिक करू शकतात.


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *