स्क्रिप्ट लेखन कसे करावे  ?

खरं तर हा विषय पूर्णत: व्यक्तिगत असा आहे. प्रत्येकाची पॉडकास्ट रेकॉर्ड करण्याची आपली एक शैली असू शकते. काही लोक अगदी शब्द न शब्द लिहून आणि वाचून रेकॉर्ड करतात तर काही लोक, अगदी दिलखुलास पणे गप्पा मारत पॉडकास्ट रेकॉर्ड करतात. पॉडकास्ट च्या प्रकाराप्रमाणे सुद्धा लेखन शैली बदलू शकते. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार सुद्धा सर्वजण लेखनाचा पर्याय निवडू शकतात.कदाचित एका व्यक्तिचं लेखन चांगल असू शकत तर दुसर्‍याचा आवाज चांगला असू शकतो, हयाप्रमाणे आपल्या गरजेनुसार कोणीही लेखनाचा पर्याय कसा असावा हे निवडू शकतो. ह्याच काही स्क्रिप्ट गोष्टींवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत.

पॉडकास्ट साठी लेखन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती…….

1. शब्दश: लेखन करणे.

हा अगदी सहज आणि नेहेमी वापरला जाणारा प्रकार झाला. काय करायचं ? तुम्हाला जी स्क्रिप्ट लिहून काढायची आहे ती अगदी, आपण जसा एखादा धडा लिहून काढतो तशी लिहून काढायची, आणि माइक समोर वाचत वाचत बोलायची. जे आपल्याला बोलायचं आहे ते अगदी तसचं लिहून काढायचं पण पॉडकास्ट च्या स्वरूपानूसार लिखाणात आपल्यापरीने आपण बदल करू शकतो जसं जर आपल्याला मुलाखत घ्यायची आहे तर त्याचं लिखाण थोडं वेगळं होणार तर तुम्हाला जेव्हा टॉक शो करायचा असेल तर ते थोडं बदललं जाईल.

याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमचा कुठलाच मुद्दा बाकी राहणार नाही. तसचं नंतर, अरेरे हे तर बोलायचं राहूनच गेलं असं होणार नाही. तसचं जर तुम्हाला अगदी ऐन वेळी काय बोलावं ह्याची कायम अडचण होत असेल तर ही पद्धत वापरलेली चांगली. ह्याने तुमचा पॉडकास्ट बनवतांना तुम्हाला व्यत्यय येणार नाही.

2. पॉडकास्ट चं फक्त नियोजन लिहिणे-

ह्या प्रकारांमध्ये अगदीच पूर्ण स्क्रिप्ट धडयासारखी लिहायची नसते. तर तुमच्या पॉडकास्ट च्या स्क्रिप्ट साठीचे मुद्दे मात्र अगदी विस्तृत पणे लिहायचे असतात. तुम्हाला ही स्क्रिप्ट पुर्णपणे वाचायची नसते तर त्याचं नियोजन करायचं असतं, पण ते करतांना सुद्धा कुठलाही मुद्दा राहून जाणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी लागते.

उदाहरणार्थ जर तुम्ही कोणाची मुलाखत घेत असाल तर तुम्ही त्याचे प्रश्न तर लिहालच पण सोबतच मुलाखत देणार्‍याच्या उत्तरांवरून अजून कुठल्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन मुलाखत अधिक रंगवता येऊ शकते. अश्या गोष्टींची नोंद या प्रकारात करून ठेवावी लागते. जर तुम्ही एखाद्या विषयावर भाषण देत असाल तर, वाचून देण्यापेक्षा ह्या पद्धतीने संवाद साधलात तर तुमच्या कार्यक्रमाशी लोक अधिक समरस होतात. ह्या पढतीत श्रोते कंटाळत नाहीत. पण असा होऊ शकतं की तुम्ही काही मुख्य मुद्दे विसरू शकतात आणि काहीच मुद्द्यानवर जास्त प्रकाश टाकला जाऊ शकतो. जर तुम्ही समोर स्क्रिप्ट न ठेवता बोलू शकता, असं तुम्हाला वाटत असेल, तरच हा प्रकार निवडा कारण, जर बोलणं स्पष्ट आणि निरंतर नसेल तर प्रेक्षक कंटाळू शकतात. पहिल्या प्रकाची थोडी सवय झाल्यावर हा प्रकार निवडण्यास हरकत नाही.

3. ठळक मुद्दे नोंदविणे-(bullet points)

हया प्रकारात दुसर्‍या प्रकरइतकं सुद्धा काही लिहायचं नसतं तर फक्त काही ठळक मुद्द्यांची नोंद करायची असते. अगदी बोलण्यात पारंगत झाल्यावर तुम्हाला जास्त काही बघायची किंवा वाचयची गरज पडणार नाही. मग तुम्हाला फक्त काही मुद्दे मिळाले तरी तुम्ही काही काळ तुमच्या पॉडकास्ट वर अस्खलित पणे बोलू शकतात. आपल्याला ज्या क्रमाने आपल बोलणं पुढे न्यायच आहे त्याच क्रमाने मुद्दे काढा आणि तसाच तुमचा पॉडकास्ट पुढे न्या. समजा तुम्हाला एखादी मुलाखत घ्यायची आहे तर पूर्ण प्रश्न न लिहिता फक्त शब्द लिहीत तुम्ही त्यावरून प्रश्न विचारू शकरत. एखादी गोष्ट सांगत असाल तर त्याचे काही मुद्दे किवा शब्द लिहून ठेऊ शकतात. आश्याने तुमचा वेळ वाचतो आणि ऐकणार्‍याला सुद्धा ते आवडते. पण या प्रकारांमध्ये बरेच मुद्दे विसरले जाऊ शकतात. जेव्हा तुम्हाला मुक्त संवाद साधायला जमेल तेव्हाच ही पद्धत वापरलेली बरी. अगदी सुरूवातीला ही पद्धत वापरायला गेलात तर तुमचा पुरता गोंधळ उडणार हे नक्की. म्हणून जरा बोलाची सवय झाली की मगच हा प्रकार निवडा.

तुमच्या पोडकास्टसाठी योग्य पद्धत कशी निवडाल ?

पॉडकास्ट साठी लेखनाची पद्धत निवडतांना दोन निकष तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. जसे की-

1.तुमची बोलण्याची क्षमता

2. पॉडकास्ट चं स्वरूप

आता हेच आपण जरा विस्तृत पणे पाहूया.

1.तुमची बोलण्याची क्षमता-

तुम्ही बोलण्यात किती पटाईत आहात हे तुमच्या पॉडकास्टसाठीच्या लेखनावर फरक पाडत असतं. तुम्ही स्क्रिप्ट न पाहता किती स्पष्ट बोलू शकतात आणि सोबतच किती वेळ बोलू शकतात ह्यावरून पहिले ठरवलं पाहिजे की तुम्ही कोणती पद्धत अवलंबवावी. बोलण्यामध्ये अस्खलित असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमचा पॉडकास्ट उत्तम होतो. पहिल्या प्रकारपासून सुरुवात करून हळूहळू सवय करत तुम्ही तिसरा प्रकार अवलंबू शकता. फक्त प्रयत्नात सातत्य ठेवणं महत्वाचं आहे.

2.पॉडकास्ट चं स्वरूप-

पॉडकास्ट च्या वेगवेगळ्या स्वरूपप्रमाणे पॉडकास्ट ची स्क्रिप्ट लिहिण्याची पद्धतही बदलते. विशिष्ट स्वरूपासाठी विशिष्ट प्रकार गरजेचा ठरतो. जसे की पुस्तकाचं रेकॉर्डिंग करत असाल तर तुम्हाला स्क्रिप्ट तशी उपलब्द्ध असते, फक्त ती व्यवस्थित वाचून रेकॉर्ड करायची असते. कथा सादर करतांना तुम्ही पूर्ण लिहून वाचत रेकॉर्ड केली तरी चालते तर कथा माहीत असतांना उत्स्फूर्ततेने सादर केली तरी चालते. जर तुमचा पॉडकास्ट न्यूज सादर करायचा असेल तर बुलेट पॉईंट्स वापरले तर उत्तम ठरतात. अश्याचप्रकारे तुमच्या सोयीनुसार तुम्ही पॉडकास्ट च्या लेखनाची पद्धत निवडू शकतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *