पॉडकास्ट बोर वाटू नये म्हणून काय कराल ?

आजकाल लोक ज्ञान आणि करमणुकीसाठी नवीन प्लॅटफॉर्म शोधत आहेत . सोशल मीडिया , वेब पोर्टल , ब्लॉग , पॉडकास्ट इ . अश्या नवीन प्लॅटफॉर्म ची काही उदाहरणे आहेत जिथे लोक जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत . लोकांना त्वरित मनोरंजन व समाधानाची आवश्यकता असते . त्यांना विनाविलंब मनोरंजन हवे असते . लोकांची अधिक लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता कमी होते आहे . लोकांना एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करणे बर्‍याचदा गरजेच्या असतात . व्हिडिओ पाहणे सहसा लोकांच्या कामांमध्ये व्यत्यय आणते कारण त्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे लागते . परंतु आपआपले काम करत असताना ऑडिओ स्वरुपातील पुस्तके , आणि कथा देखील ऐकल्या जाऊ शकतात . बोर

आजच्या धावपळीच्या आयुष्यात , प्रत्येकाला एखाद्या विषयावर वाचण्यासाठी तासनतास इंटरनेटवर बसणे किंवा जाड पुस्तके चाळत बसणे शक्य नाही . म्हणूनच लोक पॉडकास्टकडे आकर्षित होत आहेत .

आपण पॉडकास्ट निर्माता असल्यास आपले श्रोते आपला कंटेंट ऐकून किती समाधानी आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे . आपण आपल्या श्रोत्यांच्या गरज आणि आवडिनुसार सामग्री देता ​​आहात की नाही ? आपले श्रोते आपल्या कंटेंटचा आनंद घेता आहेत की नाही ? आपले पॉडकास्ट बोर तर वाटत नाही ना ? ह्या सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेच्या आहेत . तसे असल्यास , लवकरच आपले श्रोते आपला पॉडकास्ट ऐकण बहुतेक बंद करतील . तर हे टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे . जसे की : –

1 . श्रोत्यांना सहभागी करून घ्या 

श्रोत्यांना सहभागी करून घ्या 

आपण आपल्या प्रत्येक श्रोत्यास पॉडकास्टमध्ये जोडू शकत नाही . परंतु प्रत्येक पॉडकास्टवर त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा . आपल्या पॉडकास्टमध्ये जास्तीत जास्त त्यांच्या टिप्पण्या ( comments ) घेण्याचा प्रयत्न करा . त्यांच्या सूचनांचे अनुसरण करा आणि शक्य असेल तेथे त्यांच्याशी भावनिकरित्या कनेक्ट व्हा .

2 . बोर करणारे संभाषण टाळा 

आपल्या शब्दांमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न करा . बोर परिचय आणि प्रस्तावना करण्या ऐवजी काही सर्जनशील वाक्ये आपल्या प्रस्तावनेत वापरा . आपले शब्द आपल्या श्रोत्यांशी संबंधित असयाला हवेत . असे व्हायला नको की आपली बोलण्याची पद्धत किंवा आपला कंटेंट श्रोत्यांचे मनोरंजन करण्याऐवजी बोर वाटायला लागेल . आपली भाषा अशी ठेवा की जेणेकरून आपल्या श्रोत्यांना समजून घेण्यात कोणतीही अडचण उद्भवणार नाही . आपल्या चॅनेलवर श्रोते टिकावून ठेवण्यात भाषा देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते .

3 . गोष्टी परत परत रीपीट करू नका 

आपण मागील पॉडकास्टवर ज्या बाबींवर चर्चा केलेली आहे त्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा समाविष्ट करू नका . जर असे करणे गरजेचेच असेल तर तो विषय सादर करण्याची पद्धत बदला . जर आपण बर्‍याचदा एकच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितली तर श्रोत्यांना आपल्या चॅनेलचा बोरा येण्याची शक्यता जास्त आहे . आणि आपला पॉडकास्ट देखील यामुळे बोर होतो .

4 .सुरुवात स्वारस्यपूर्ण ठेवा 

जेव्हा आपल्या पॉडकास्ट चा प्रारंभ स्वारस्यपूर्ण होईल तेव्हाच श्रोते आपला पॉडकास्ट ऐकणार आहेत . सुरुवातीला , आपण जे बोलता त्याद्वारे श्रोते अधिक आकर्षित होतात . तर आपल्या पॉडकास्टची सुरूवात आपल्या विषयानुरूप करा . आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात काही महत्वाची तथ्ये , एखादा मजेदार किस्सा किंवा काही हलकी फुलकी चर्चा करून मजेदार बनवू शकता . यामुळे तुमचे श्रोते शेवटपर्यंत टिकुन राहतील .

5. नियोजन करा , आणि सर्जनशील व्हा 

आपल्या पॉडकास्टला बोर होण्या पासून वाचवण्यासाठी आपल्या कंटेंटचे अगोदरच नियोजन करा . ठराविक योजनेनुसार आपले पॉडकास्ट पुढे न्या . संपूर्ण रेकॉर्डिंग दरम्यान सर्जनशील होण्याचा प्रयत्न करा . योजनेव्यतिरिक्तही आपण आपल्या पॉडकास्टमध्ये काही मनोरंजक सामग्री समाविष्ट करू शकत असाल तर नक्की करा .

6 . उत्कटता महत्वाची आहे 

ह्या सर्व टिप्स व्यतिरिक्त आपल्याला आपल्या पॉडकास्ट विषयी असलेली आवड ही आपल्यासाठी एक मोठी शक्ती आहे , जी आपल्याला आपला पॉडकास्ट बोर होण्या पासून वाचवू शकते . जर आपल्या मध्ये वैशिष्ट्यपूर्ण कंटेंट तयार करण्याची आवड असेल तर ती आपल्या पॉडकास्टमध्ये दिसून येतेच . हे आपले पॉडकास्ट बोर होऊ देणार नाही . आपला आत्मविश्वास आणि आपण देत असलेल्या कंटेंट बद्दलची आपली आवड आपल्या पॉडकास्टमध्ये साफ दिसेल .

कुकू एफएम इंस्टॉल करा आणि तिथे असलेले पॉडकास्ट एकदा ऐका . तेथील टॉक शोमधून आपल्याला संपूर्ण पॉडकास्ट दरम्यान आपला कंटेंट कसा रोचक ठेवावा ही माहिती मिळेल .


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *