पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी सांगण्यसाठीच्या विविध पद्धती.

गोष्टी ! अगदी लहानपणापासून आपल्या आवडीचा विषय.अगदी लहानपणापासून आजीकडून ऐकलेल्या गोष्टी आणि तसेच मोठे झाल्यावर अनेक प्रकारच्या सर्वच गोष्टी आपल्याला आवडत असतात. लहान ते मोठे सर्वच लोक सर्वच लोक काही ना काही गोष्टी ऐकतं असतात. पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी रेकॉर्ड करतानासुद्धा हा एक महत्त्वाचा मानला जाणार हा एक कलाप्रकार आहे. आपण आज स्टोरी टेलिंग च्या अश्याच काही पद्धतिंविषयी बोलणार आहोत ज्या तुम्हाला एखादी गोष्ट सांगताना आणि रेकॉर्ड करताना अत्यंत उपयोगी ठरततील. चित्रपट हासुद्धा एक गोष्टीचाच प्रकार आहे आणि भारतीयांना चित्रपटाविषयी असलेले वेड आपल्याला माहितीच आहे. याठिकाणी मी लेखांमध्ये अनेक चित्रपटांचा सुद्ध: संदर्भ घेऊन तुम्हाला दाखवणार आहे की कश्या प्रकारे तुम्ही तुमच्या पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी तयार करू शकतात . आणि तुमच्या पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी ऐकण्यासाठी अजून श्रवणीय बनवू शकता. चला तर मग सुरवात करूया!

या मधला पहिला प्रकार आहे,

1.एखाद्या व्यक्ती किंवा पात्राची गोष्ट सादर करणे (monomyth)

मुळात त्या पात्राशी तुम्हाला समरस होऊन ती पूर्ण गोष्ट सादर करावी लागते .याला आपण एखाद्या हीरो चा पूर्ण प्रवासच म्हणू शकतो. अनेक सिनेमे आपण पाहतो की तो हीरो एकदम निघतो आणि मग त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, मग तो परत काही काळाने त्याच्या गावी येतो आणि सर्व लोकांना न्याय वैगरे मिळवून देतो. आपल्याला अश्या अनेक कथा मिळतील जसे की हॅरी पॉटर , लाइफ ऑफ पाय इत्यादि. प्रत्येकालाच कुठलातरी सुपरहीरो व्हायचे असते. म्हणून जर तुम्ही तुमच्या पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी हा प्रकार वापरलात तर लोकं तुमच्या गोष्टींना अधिक पसंत करतील.

2. उत्सुकता शिघेला ताणणे (mountain)उत्सुकता शिघेला ताणणे (mountain)

या प्रकारात कधीच एका पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी च्या एका भागात एक कथा पूर्ण करायची नसते. एक मोठी कथा घेऊन अशी सादर करायची की त्याच्या एका भागात ती अश्या शेवटाला पोहोचेल की लोकं उत्सुकते पोटी पुन्हा तुमच्या पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी च्या भागाची वाट पाहतील. लोकांची उत्सुकता इतकी ताणलेली असते की ते त्याच्या पुढील कथा ऐकण्यासाठी आसुसलेले असतात.यालाच इंग्लिश मध्ये क्लिफ हँगिंग(cliff hanging) असही म्हणतात.याचं एकदम ग्रेट उदाहरण म्हणजे बाहुबली आणि मारवल्स चा avengers endgame. लोकांनी अक्षरश: एकमेकांना मेसेज मध्ये ‘ कटप्पा ने बाहुबली को कयू मारा’ म्हणत वेड करून सोडलं होतं! तसचं काहीसं avengers चं पण. तुम्ही याचप्रकारे तुमच्या कथेत काही अश्या जागा शोधून त्यांच्यावर गोष्टी संपवू शकतात. ह्याने लोक तुमच्या पॉडकास्ट पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी उत्सुकतेने नक्की ऐकतील.यामध्ये पण एक अडचण अशी आहे की जर तुमच्या पॉडकास्टचा रॅनडम एपिसोड जर ऐकिवात आला आणि जर त्याला त्या एपिसोड मध्ये दम वाटला नाही तर तो व्यक्ति कदाचित तुमची पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्ट परत ऐकणार नाही.

3.मध्यातून किंवा शेवटापासूनच सुरुवात – (in medias res)

ह्या प्रकारामध्ये गोष्टी टिपिकल पद्धतीने न करता पहिलेच कथेचा क्लायमॅक्स सांगून टाकायचा आणि त्यानंतर हळूहळू गोष्ट रंगवत त्या कथेच्या क्लायमॅक्स पर्यन्त पोहोचण्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत होत्या त्यांची उकल करत जायची. याने ऐकणार्‍याला उत्सुकता लागून राहते की जे तुम्ही पहिल्या भागात सांगितलं अशी परिस्थिति का आली आणि असा शेवट का झाला? ह्यामुळे लोकांना ऐकण्यास मजा येते आणि ते तुमच्या पॉडकास्ट फॉरमॅट मध्ये गोष्टी ऐकण्यास प्राधान्य देतात. एखादा असा प्रसंग तुम्ही बर्‍याचदा बघतात की एखादा खून झाला आहे आणि त्या खुनाची मिस्ट्री आता हळूहळू कथेतून उलगडली जाते आहे किवा नुकतच एखाद युद्ध संपलं आहे आणि आता त्या युद्धासाठी काय गोष्टी करणीभूत होत्या ते हळूहळू कथाकार मग सुरुवातीपासून उलगडत जातो.

4. खोटी सुरुवात-(false start)

या प्रकारामध्ये कथाकार सुरुवातिला एक प्रसंग उभा करतो, अगदी श्रोत्यांच्या मनात हेच बिंबवल गेलेलं असतं की हीच सुरुवात खरी आहे. पण पूढे जाऊन गोष्टी अश्या काही पालटतात की श्रोत्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. ह्यामुळे कथेच्या शेवटाला श्रोत्यांना खूप मजा येते कधी खूप हळहळ वाटते. याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे हॅरी पॉटर ची सिरीज. अगदी जो ‘स्नेप'(हॅरी पॉटर मध्ये एक पात्र) आपल्याला विलन वाटत असतो तोच खरा हीरो होता हे शेवटी कळतं, आणि नकळतच आपल्याला कुठेतरी मनातून हळहळ वाटायला लागते. अश्या कथा कालांतराने खूपच प्रसिद्ध होतात. पण ह्या कथेमध्ये फक्त शेवटचं नाही तर पूर्ण कथाच तुम्हाला जरा रंजक करावी लागेल की जेणेकरून लोकं तुमच्याबरोबर कथेत शेवटापर्यंत राहतील.

5.पेटल स्ट्रक्चर (petal structure)

ह्याला पेटल स्ट्रक्चर ह्यासाठी म्हणतात की यामध्ये आधी वेगवेगळ्या कथा जश्या फुलाच्या पाकळ्या त्याच्या आजूबाजूला असतात त्याप्रमाणे सांगायच्या असतात आणि शेवटी त्या सर्व कथा एकाच मुख्य कथेत मिसळायच्या असतात. ह्या प्रकारे कथा सांगतांना थोडं मनोरंजक आणि जरा पुढच्या भागांची कल्पना देण किवा गोष्ट ह्या प्रकारे सादर करण की ती नीरस वाटू नये हे महत्वाच असतं. ह्याने कथा क्लायमॅक्स च्या वेळी जरा वेगळाच आनंद देते आणि वेगवेगळ्या गोष्टी कश्या एकच ठिकाणी गुंफल्या गेल्या हे पाहायला मजा येते.

वरील प्रकार हे तुम्ही एका भागात किंवा अनेक भागात तुमची सर्जनशिलता वापरुन वापरू शकतात. अनेक कथा तुम्ही KUKU FM वर ऐकू शकतात आणि त्यावरून तुमच्या कथेची सुरुवात करू शकतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *