पॉडकास्ट कोर्स कसा तयार करावा ?

बर्‍याचदा मी लोकांना सांगतो की तुम्ही पॉडकास्ट मार्फत एक पूर्ण पॉडकास्ट कोर्स तयार करू शकतात, तर बर्‍याचदा ते आश्चर्य व्यक्त करतात की अख्खाच्या अख्खा पॉडकास्ट कोर्स आणि तो पण पूर्ण ऑडिओ स्वरुपात तयार करायचा? आणि लोक असा पॉडकास्ट कोर्स पसंत करतील का? तर लोक असा पॉडकास्ट कोर्स नक्की पसंत करतात. पण थोडे टारगटेड ऑडियन्स करून कंटेंट देणं पण गरजेचं आहे . अनेक जॉब करणारे लोकं अश्या प्रकारेचे पॉडकास्ट कोर्स करणं पसंत करतात. आज मी तुम्हाला याचविषयी मार्गदर्शन करणार आहे की एक उत्तम पॉडकास्ट कोर्स करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुमचा पॉडकास्ट कोर्स अधिक विक्री करण्यायोग्य कसा होईल.

1. तुमचे श्रोते आधी नक्की करून घ्या

आपण आधी पाहिलच आहे की आपला पॉडकास्ट यशस्वी करण्यासाठी तुमच्याजवळ एक टारगटेड ऑडियन्स असणं खूप गरजेचं आहे. पॉडकास्ट कोर्स बनवतांना सुद्धा हीच गोष्ट जरा लक्षात घेण गरजेचं आहे की तुम्ही जो पॉडकास्ट कोर्स बनवता आहात तो नक्की कोणासाठी बनवत आहात. तो पॉडकास्ट कोर्स जर लोकांच्या गरजेनुसार असेल तरच तो बनवण्यात अर्थ आहे. लोकांना नक्की काय हवं आहे याचा आधी अंदाज घ्या आणि मगच तुमचा पॉडकास्ट कोर्स तयार करायला सुरुवात करा. तुम्हाला अनेक विषय निवडता येतील जसे की शेअर मार्केट,इंग्लिश किंवा कुठलीही भाषा, फिटनेस इत्यादि.

2. साधेपणा

आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाणार आहोत म्हणजेच आपला कोर्स नक्की कसं ठेवावा याविषयी आपण बोलणार आहोत. कुठल्याही शिकवण्याच्या पद्धतीचे पहिले मूल्य म्हणजे ती गोष्ट तुम्हाला सोपी करून तुमच्या विद्यार्थ्यांना देता यायला हवी.त्याचप्रकारे तुमचा कोर्स देखील अत्यंत सोपा असायला हवा. जेवढ्या सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने तुम्ही तुमचा कोर्स द्याल तितका तो अधिकाधिक लोकं घेतील. यासाठी अगदी बोअरिंग न होता त्यांच्या मित्रा प्रमाणे त्यांच्याशी बोला त्यांना वेगवेगळी उदाहरणं द्या. काही प्रेरणादायी एपिसोड्स घ्या. याने तुमचे श्रोते तुम्हाला अधिक पसंत करतील आणि त्यांच मत तुमच्याविषयी अधिक सकारात्मक होईल.

3. वेळ

कोर्स च्या कंटेंट मधला वेळ हा अत्यंत गरजेचा भाग आहे. एकदम लांबलचक जर कंटेंट दिलात तर तुमचा कोर्स बहुतेक पसंत केला जाणार नाही. म्हणून तुमचा कोर्स चा एक एपिसोड जर फक्त जास्तीत जास्त पंधरा मिनिटांचा ठेवला तर तो अधिकाअधिक लोकांना आवडू शकतो. ह्यामुळे त्यांना कोर्स शी तुम्ही जोडूनही ठेऊ शकतात व सोबतच तुम्ही तुमच्या कोर्स ला रटाळ होण्यापासून वाचवूही शकतात. जर तुम्ही कोर्स चे एपिसोड छोटे बनवता आहात तर हे पण लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या एपिसोड चा नेमका कुठला आणि किती कंटेंट त्यात टाकावा की त्याच वेळेत तुमचे श्रोते तुमचा कंटेंट अधिक व्यवस्थित समजू शकतील.

4. कोर्स च्या भागांची रचना

कोर्स च्या भागांची रचना करतांना पुढील काही मुद्दे लक्षात घायला हवे,

a. पहिल्या भागात तुम्ही तुमचा परिचय करून द्या. सोबतच तुम्ही हा कोर्स का तयार केला आहे त्याबदल सांगा. तुम्हाला त्या विषयात काही अनुभव असल्यास ते आवर्जून सांगा.

b. पहिल्या किवा दुसर्‍या भागात कोर्स मधील कंटेंट आणि तुम्ही तुमचा कोर्स कश्याप्रकारे राबवणार आहात याच प्लॅनिंग सांगा.

c. प्रत्येक भागात पुढचा कोर्सपण ऐकण्याची विनंती करा आणि तसेच त्यांच्या टिप्पण्या आणि प्रतिक्रिया देण्यासाठी सांगा.व त्यांना दुसर्‍या दिवसासाठी परत येण्यास व तुमचा कोर्स ऐकण्यास सांगा.

d. प्रत्येक भागात कोर्स सुरू करायचा आहे त्यादिवशी पहिल्या भागात घेतलेल्या मुद्द्यांची उजळणी अगदी सक्षेप मध्ये करा आणि त्या भागातल्या कंटेंट ची कल्पना द्या.

e. प्रत्येक भागात शेवट करतांना श्रोत्यांना लाइक ,कमेन्ट ,शेअर करायला सांगा आणि सोबतच काही टास्क किंवा असाइनमेंट्स असतील तर त्या द्या.

5. ईमेल ब्लॉग आणि वेबसाइट चा वापर

एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला बर्‍याचदा तुमच्या कोर्स साठी तुमच्या श्रोत्यांना काही नोट्स आणि असाइनमेंट्स द्यावे लागू शकतात. तसेच तुमच्या पॉडकास्ट च्या प्लॅनिंग मध्ये बदल झाल्यास तुम्ही तुमच्या श्रोत्यांना ईमेल ब्लॉग आणि वेबसाइट चा वापर करून सांगू शकतात. तसेच याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे सजेशन तुमच्या कोर्स बद्दल घेऊ शकतात आणि तुमचा पॉडकास्ट अधिकाधिक उत्तम बनवू शकतात. तसेच जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तुमच्या कोर्स साठी ब्लॉग किंवा वेबसाइट तयार करू शकतात आणि त्या ठिकाणी तुमच्या कोर्स च्या नोट्स देऊ शकतात. सोबतच तुम्ही ब्लॉग्स आणि वेबसाइट च्या माध्यमातून तुमच्या कोर्स ची जाहिरात सुद्धा करू शकतात.

6.पॉडकास्ट च्या माध्यमातून कोर्स बनवण्यासाठी काही प्रसिद्ध आणि लोकांना आवडू शकणारे विषयOnline course/ कोर्स

1. शेअर मार्केट – या मध्ये तुम्ही शेअर मार्केट शी संबंधित वेगवेगळ्या कन्सेप्ट समजावू शकतात. तसेच ट्रेडिंग च्या वेगवेगळ्या ट्रेडिंग स्ट्रॅटजी समजावू शकतात)

2. कम्युनिकेशन (communication)- (यामध्ये तुम्ही लेखी आणि तोंडी वेगवेगळ्या ठिकाणी जसे शाळा, कोलेजेस, मध्ये कसे कम्युनिकेशन कसे करायचे हे तुम्ही सांगू शकतात.)

3. मेडीटेशन आणि योगा

4. आहार आणि आरोग्य

5. कुठलीही भाषा विशेषत: इंग्लिश

6. जनरल अवेयरनेस, विशेषत: स्पर्धा परीक्षांसाठी

7. कायदा

8. इनवेस्टमेंट

9. संगीत

10. भविष्य आणि ज्योतिषी

फक्त ह्याच विषयांपूरता कोर्स मर्यादित नाहीत हे सर्व फक्त मार्गदर्शनासाठी आहे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार अनेक विषय निवडू शकतात. नक्की पॉडकास्ट वर कोर्स कसा तयार करायचं यासाठी KUKU FM वरचे वेगवेगळे कोर्स तुम्ही ऐकू शकतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *