पॉडकास्टसाठी व्हायरल कंटेंट कसा तयार करावा ?

प्रत्येक जण इंटरनेटच्या युगात व्हायरल होऊ इच्छित आहे. दररोज काही विशेष असे व्हिडिओ, ऑडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. आपण सुद्धा असे एखादे कलाकार असल्यास आपणास देखील असा व्हायरल कंटेंट तयार करण्याची इच्छा असतच असेल. पण कसे? हा प्रश्न आपल्याला बर्‍याचदा पडत असेल. जर आपण पॉडकास्ट निर्माता असाल तेव्हा हा प्रश्न अधिकच मोठा होतो. कारण फोटो, व्हिडिओ किंवा इतर कोणतीही कंटेंट सहजपणे व्हायरल होऊ शकतो, परंतु पॉडकास्ट व्हायरल होत असल्याचे आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. आपण पॉडकास्ट कंटेंट निर्माता असल्यास, या लेखात आम्ही पॉडकास्टसाठी व्हायरल कंटेंट कसा तयार करावा आणि आपले पॉडकास्ट व्हायरल कसे करावे हे आपणास सांगू.

व्हायरल कंटेंट सहसा सामान्य कंटेंटपेक्षा अद्वितीय असतो. आपल्या पॉडकास्टसाठी व्हायरल कंटेंट तयार करण्यासाठी, आपण सामान्य पॉडकास्टपेक्षा काहीतरी वेगळा असा विचार केला पाहिजे. आता आम्ही आपल्याला पॉडकास्टवर व्हायरल कंटेंट बनवण्यासाठीच्या काही टिपा सांगू.

1. विषय महत्त्वाचा आहे

आपल्या पॉडकास्टच्या प्रसिद्धीमध्ये आपल्या पॉडकास्टच्या थीम सर्वात मोठा हात आहे. आपल्या कंटेंट मध्ये सामर्थ्य नसल्यास आपले पॉडकास्ट फ्लॉप होण्यास जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला आपले पॉडकास्ट व्हायरल करायचे असल्यास, एखादा ट्रेंडिंग असलेला असा आपला विषय निवडा. हे आपला पॉडकास्ट बराच वेळ चालेल याची शक्यता वाढवते. वादग्रस्त विषयावर पॉडकास्ट बनवण्याचा प्रयत्न करा. आपला कंटेंट विवादाच्या बाहेर ठेवा, परंतु विवादित म्हणून नावाजलेला विषय निवडा. असे केल्याने, लोक आपला कंटेंट अधिकाधिक ऐकतील आणि आपण आपल्या व्हायरल कंटेंट बनवण्याच्या उद्देशात यशस्वी होण्याची आपली शक्यता अजून वाढेल.

2. आकर्षक नाव आणि लघुप्रतिमा

आपल्या पॉडकास्टचे नाव सोपे ठेवल्यास, नंतर त्याला मिळणारा प्रतिसाद देखील सामान्यच असेल. आपल्या प्रत्येक पॉडकास्टचे नाव अद्वितीय आणि इतर निर्मात्यांपेक्षा वेगळे ठेवा. यामुळे अनेक श्रोते तूमच्या पॉडकास्टकडे आकर्षित होतील आणि अधिकाधिक लोक तो ऐकण्यासाठी येतील. याव्यतिरिक्त, पॉडकास्टची लघुप्रतिमा अशा प्रकारे निवडली पाहिजे की ती केवळ आपल्या कंटेंटबद्दलच आकर्षण निर्माण करणार नाही तर दिसण्यासाठीही अतिशय आकर्षक असेल. परिणामी, जितके लोक तुमच्या पॉडकास्ट ची ल्घुप्रतिमा म्हणजेच thumbnail पाहतील तितकी त्यांची उत्सुकता अधिक वाढेल. पॉडकास्टच्या लघुप्रतिमेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. पॉडकास्टमध्ये लघुप्रतिमा तुमच्या पॉडकास्ट चा चेहरा म्हणून कार्य करते. जर पॉडकास्टचा चेहरा आकर्षक असेल तर पॉडकास्टमधील कंटेंट अधिक आकर्षक आहे असे लोकं समजतील यात काही शंका नाही.

3. मुलाखतीसाठी अतिथी काळजीपूर्वक निवडा

आपण मुलाखत फॉरमॅट मध्ये पॉडकास्ट तयार करत असल्यास किंवा आपण एखाद्या अतिथीला आपल्या पॉडकास्ट साठी आमंत्रित करू इच्छित असाल , तर त्यासाठीचे अतिथी अगदी काळजीपूर्वक निवडा. एखाद्या अश्या अतिथीचा समावेश करा जो एखाद्या वादात गुंतलेला आहे किंवा खूपच जास्त प्रसिद्ध आहे. आपण निवडलेले पाहुणे आपण निवडलेल्या विषयाशी संबंधित आहे का नाही हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. लोकांना प्रसिद्ध किंवा वादग्रस्त लोकांना अधिक ऐकण्याची इच्छा अधिक असते. दुसरे म्हणजे, या लोकांची विधाने इतरांपेक्षा महत्त्वपूर्ण असू शकतात जे तुमचा कंटेंट वाईरल करू शकतात. असे केल्याने, आपल्या पॉडकास्टसाठी व्हायरल कंटेंट तयार केला जाईल. हे पण शक्य आहे की असे केल्याने आपण सुद्धा बर्‍यापैकी लोकप्रिय होऊ शकतात

4 . प्रसिद्धी

पॉडकास्ट लोकप्रिय किंवा कंटेंट व्हायरल करण्यासाठी ही सर्वात महत्वाची पायरी आहे. आपला कंटेंट जर अद्वितीय आहे आणि त्याला जर योग्य प्रसिद्धी मिळाली तर तुम्ही आपल्या पॉडकास्टला व्हायरल करू शकतात. आजच्या काळात सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. सोशल मीडियावर आपल्या पॉडकास्टची जाहिरात करून आपण लोकांना त्याबद्दल कळवू शकता. यामुळे, आपला पॉडकास्ट ऐकणार्‍याची संख्या देखील वाढेल आणि एखाद्यास आपले कार्य आवडत असेल तर ते आपल्याला एका रात्रीत व्हायरल देखील करू शकतात.

या सर्वान व्यतिरिक्त, आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल अश्या व्यासपीठावर असणे देखील महत्वाचे आहे. कुकू एफएम असेच एक व्यासपीठ आहे. येथे दररोज एक लाखाहून अधिक लोक पॉडकास्ट ऐकत असतात. आपण या प्लॅटफॉर्मवर आपले स्वतःचे पॉडकास्ट चॅनेल बनवून, आपला कंटेंट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगू शकता.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *