पॉडकास्टची स्वरुपातील मुलाखतीची तयारी कशी करावी?

आपण जर इथे हा लेख वाचत असाल तर असे समजण्यास हरकत नाही की आपण पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखत सुरू करण्याविषयी विचार करत आहात आणि तुमचा पॉडकास्ट नक्की कश्या पद्धतीचा असला पाहिजे याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहात.

या लेखात आपण पॉडकास्ट स्वरुपातील मुलाखतीची तयारी कशी करावी याबद्दल बोलू. तर, प्रथम कोणत्या विषयावर आपण पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखत घेऊ इच्छित आहात हे समजून घेणे आवश्यक आहे कारण जर आपण उठसुठ आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची पॉडकास्ट स्वरूपात मुलाखत घेत बसलात तर आपल्या पॉडकास्टमध्ये सातत्य किंवा नियमितता येणार नाही. म्हणूनच, आपला एकाच मूलभूत विषय निवडा जेणेकरुन आपण आपल्या प्रेक्षकांना त्याच विषयच्या वेगवेगळ्या पैलूनशी परिचित करून देऊ शकता.

पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखतीच्या तयारीच्या भागाविषयी मी बोलतांना सांगेन,

ओवर कोंफिडेंट न राहता पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखतीच्या आधी थोडा सराव करा

मला तुमच्या आत्मविश्वासाचे कौतुक आहे आणि मी हे पण समजतो की आपल्याला आपल्या विषयातील सर्व काही माहिती आहे. परंतु आपल्याकडे एक ठराविक रचना असणे आवश्यक आहे. पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखतीची व्यवस्थित तयारी करणे आपल्या पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखतीत एक प्रवाहिपण उत्पन्न करेल. गाडी चलवतांना आपण स्टीयरिंग व्हील वर जशी आपली पकड ठेऊन चालवत असतो, आणि गाडी कशी चालवावी किंवा कोणत्या प्रकारे आपली गाडी नियंत्रित करावी हे जसं आपल्याला ठरवाव लागतं तसच काहीसं podcast स्वरूपातील मुलाखत घेतांना असतं. शिवाय, अगदी नेहमीचे प्रश्न टाळण्यास आणि तुमची पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखत इतरांपेक्षा वेगळी होण्यास तुम्ही केलेला सराव तुम्हाला मदत करेल.

नवीन पाहुणे नवीन दृष्टीकोन

जर आपल्याकडे पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखतीसाठी आपला एक विषय ठरवलेला असेल तर आपण ठरवलेला विषय अन्य कोणीही घेतलेला नाही ना याची खात्री करा. तसेच आपल्या पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखतीचे शीर्षक सुद्धा इतरांपेक्षा वेगळे आहे याची खात्री करून घ्या. जरी कोणी दुसर्‍यांनी तो विषय आधीच घेतलेला असला तरी, त्याच विषयाबद्दल आपल्या श्रोत्यांना वेगवेगळे अनुभव किंवा त्याच विषयाबद्दल एक वेगळा दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे. हा घटक जर तुम्ही सांभाळलात तर हे सुनिश्चित होईल की आपले पॉडकास्ट मनोरंजक असेल आणि इतरांपेक्षा वेगळा असेल.

नेहमीसारखा मूलभूत परिचय करून देणे टाळा

आपण ज्या व्यक्तीची मुलाखती घेणार आहात त्याच्याविषयी थोडेसे संशोधन केल्यास , प्रथम आपल्याला नेहेमीच्या पठडीतले सोडून, नेहेमीच्या प्रवाहतील संभाषणापासून दूर असलेलेले असे, त्यांना विचारायला अनोखे प्रश्न सापडतील. दुसरे म्हणजे, आपण त्यांची ओळख प्रेक्षकांशी उत्तमरीत्या करून देऊ शकतात. यासोबतच आपण नेहमीचे परिचय टाळू शकता आणि आपल्या शैलीत आपली मुलाखत मनोरंजक आणि वेगळी बनवू शकता. शेवटी आपल्या पाहुण्यांचा वेगळ्या शैलीत परिचय करुन देणे त्यांना आणि तुमच्या श्रोत्यांना सहजपणे मुलाखत समजण्यास मदत करेल आणि नेहमीच्या पठडीतील मुलाखातीपेक्षा वेगळ काहीतरी ऐकवण्याचे एक चांगले काम करेल. जिथे यामुळे तुमच्या पाहुण्यांना देखील काहीश्या आरामशिर पद्धतीने मुलाखत देता येईल आणि ऐकणार्‍याला सुद्धा अत्यंत नैसर्गिक असा संवाद चालू आहे असे वाटेल.

एक मजेदार सुरुवात प्रथम त्यांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचारा उदाहरणार्थ , त्यांनी केलेली नवीनतम गोष्ट जी आपण सहज अनेक माध्यमांतून शोधू शकता. यासाठी त्यांच्या सोशल मीडियावरून त्याबद्दल अधिक काही माहिती मिळवू शकता. यामुळे एक वेगळी सुरुवात होईल आणि मुलाखत घेण्यास एक मजेदार बाजू देखील मिळेल. लक्षात ठेवा मुलाखतीत नेहमी तांत्रिकरित्या उत्तर दिलेत तर मुलाखतीचा विषयी हा रटाळ वाटू शकतो.

प्रश्नाच्या मागे आणि पुढे अधिक प्रश्न विचारणे

खात्री करा की आपण जे प्रश्न विचारता आहत त्याची उत्तर अगदी एका शब्दात आणि अगदी सरळसोट नकोत. प्रत्येक प्रश्न असा विचारा की त्यातून एक दीर्घकाळ जरा संवाद निर्माण होईल आणि प्रश्न विचारतांना प्रश्नात प्रश्न विचारत जरा संवाद रंगवा॰ यामुळे ऐकणार्‍याला मुलाखत अजून आनंदी वाटेल.

कथा विचारा

कथा विचारा / पॉडकास्टची स्वरुपातील मुलाखतीची तयारी कशी करावी?

मुलाखतीचा हा एक सोपा पण मजेदार भाग असू शकतो, जिथे मुलाखत घेणारी व्यक्ति, म्हणजे तुम्ही मुलाखत देणार्‍या व्यक्तिला एखादी खास गोष्ट सांगण्याची विनंती करू शकतात. मुलाखत देणारी व्यक्ति एखादी खास गोष्ट सांगू शकते जी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल अंतर्दृष्टी देते आणि हसण्याची किंवा एखादा धडा घेण्याची संधी देखील देते.

हजरजबाबीपण

जेव्हा आपण वास्तविक एखादी मुलाखत जेव्हा बघतो तेव्हा आपण पाहिले असेल की इंटरव्ह्यु घेणारी व्यकती कुठेही अस्ताव्यस्त थांबू शक्त नाही. तसेच काहीसे पॉडकास्ट मध्ये सुद्धा आहे. तुम्ही तर कुठे अडकू शकतच नाहीत पण सोबतच तुम्हाला गरजेचं आहे की मुलाखत देणारी व्यक्तिसुद्धा उत्तरांसाठी कुठे थांबता कामा नये तसेच गोंधळून जाऊ नये. म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारणार आहत त्याची एक प्रत कायम तुमच्या पाहुण्यांना आधीच दिलेली चांगली. असे केल्याने मुख्य प्रवाहातील उत्तर देणे सुद्धा टाळले जाईल आणि त्याला / तिला त्या प्रश्नाचे अनोखे उत्तर देण्यात मदत होईल.

शेवटी, एक मुलाखत आपल्याद्वारेच रंगवली जाऊ शकते आणि शेवटी आपली मुलाखत ऐकण्यास श्रोते उत्सुक आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आपल्या मुलाखती मधून थोडं ज्ञान आणि थोड मनोरंजन लोकांपर्यंत पोहोचण गरजेचं आहे.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *