पॉडकास्टची ग्रेट सुरुवात आणि शेवट कसा करावा ?

पॉडकास्ट तयार करतांना आपण नेहमीच पॉडकास्ट च्या मुख्य भागावर आपलं लक्ष केन्द्रित करत असतो. पण बर्‍याचदा असं होतं की पॉडकास्ट च्या सुरुवातीच्या भागावर आणि शेवटावर आपण लक्ष देणच विसरून जातो. पॉडकास्ट च्या मुख्य भागप्रमाणेच पॉडकास्टची ग्रेट सुरुवात आणि शेवट करणं खूपच गरजेचं ठरतं. तुमचा पॉडकास्ट पूर्ण ऐकला जाणार का नाही हे तुमच्या पॉडकास्टची ग्रेट सुरुवात आहे का नाही यावरून ठरत असतं. सोबतच तुमच्या पॉडकास्ट च्या शेवटी काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं असतं की ज्यामुळे तुमचे श्रोते तुमचा पॉडकास्ट ऐकण्यासाठी परत येतील.

पॉडकास्टची ग्रेट सुरुवात म्हणजे नक्की काय आणि ती का गरजेची आहे ?

सर्वात पहिले तुमच्या श्रोत्यांना पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी दिसत असतं ते तुमच्या पॉडकास्ट चं नाव आणि थंबनेल म्हणजेच लघूप्रतिमा. तुमच्या पॉडकास्ट च्या नावानूसार तुमचा पॉडकास्ट आहे की नाही हे लक्षात येत तुमच्या पॉडकास्टची ग्रेट सुरुवात ऐकून. तुमच्या पॉडकास्ट च्या मुख्य भागाची प्रस्तावना ह्या सुरुवातीत होत असते. मागील भागत काय काय झालं होतं हे पण सांगणं गरजेचं ठरत. ज्यामुळे लोकांना आपण पुढील पॉडकास्ट ऐकण्यासाठी प्रवृत्त करतो. सोबतच त्यांना या मध्ये मागील भागात काय सांगितलं होतं याची आठवण करून दिली जाते. यामुळे तुमच्या श्रोत्यांना पॉडकास्ट समजण सोपं जातं. हे तुम्ही ऐकलच असेल की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्हाला तुमच्या श्रोत्यांना खिळवून ठेवण्यासाठी फक्त पहिली पाच मिनिटं मिळत असतात. ह्याच पाच मिंनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या श्रोत्यांना प्रभावित करायचे असते.

प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एखादा टीव्ही शो निवडतांना किंवा एखादं पुस्तक वाचण्यासाठी निवड्तांना तसच तुमचा पॉडकास्ट ऐकावा की नाही हे निवडतांना तुमच्या श्रोत्यांच्या मनात काही प्रश्न असतात. जसे की हे मजेदार असेल का ? हे मला बोअर तर करणार नाही ना ? ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं तुमच्या इंट्रो मध्ये मिळणं गरजेची असतात. हेच कसं साधाव हेच मी तुम्हाला आज ह्या लेखात सांगणार आहे.

पॉडकास्टची ग्रेट सुरुवात करतांना त्यामध्ये काय काय हवं ?

मी इथे अश्या काही गोष्टी नमूद करतो आहे की ज्या तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये ठेवायला हव्यात. पण सोबतच तुम्ही तुमच्या पॉडकास्टची ग्रेट सुरुवात कशी करावी ह्याला काही मर्यादा नाहीत. आपआपल्या कल्पनेनुसार तुम्ही तुम्हाला आवडणारा कुठलाही कंटेंट यात टाकू शकतात.

1.तुमचे नाव

Introduction/परिचय

खूपच बेसिक पण गरजेची गोष्ट. तुम्ही तुमचं तुमच्या पॉडकास्टसाठी काही प्रलोभनीय आणि काहीतरी युनिक निकनेम ( टोपण नाव ) निवडू शकतात. नक्की कोण बोलतं आहे हे यावरून कळतं. तसेच पॉडकास्टची ग्रेट सुरुवात करायला मदत होते.

2.तुमचा इंट्रो

इंट्रो म्हणजेच परिचय म्हणजे अगदी सर्वचं काही सांगायचं नाही. तुम्ही बस ‘तुमचा सच्चा मित्र’, ‘ होस्ट आणि दोस्त’ असं काहीतरी सांगू शकतात. यामुळे ऐकणार्‍याला मजा येते. तुमची एक वेगळी इमेज तयार व्हायला मदत होते.

3. तुमच्या पॉडकास्ट चं नाव

जरी तुमचं पॉडकास्ट चं नाव वाचूनच लोकं तुमचा पॉडकास्ट ऐकायला आलेले आहेत तरी त्यांना एका मजेदार पद्धतीने तुमच्या पॉडकास्ट चं नाव सांगणं गरजेचं आहे. यामुळे पॉडकास्ट साठी एक फील तयार होतो.

4. पॉडकास्ट मध्ये पुढे काय

तुमच्या पॉडकास्ट चा पुढचा कंटेंट नक्की काय आहे हे , हे तुमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. यामध्ये तुमचा पॉडकास्ट कोणासाठी असणार आहे हे पण क्लियर करा. तुमच्या पॉडकास्टच्या फॉरमॅट नुसार हे सांगणं बदलू शकत. जसे की जर मुलाखत असेल तर ती कोणाची आणि कुठल्या विषयावर आहे हे नमूद करणे.

5. मागील भागात काय झालं याची थोडक्यात ओळख 

हे जर गरज असेल आणि तुमच्या पॉडकास्ट च्या फॉरमॅट ला सूटेबल असेल तर थोडक्यात तुम्ही सांगू शकतात.

पॉडकास्ट चा शेवट आणि त्यासंबंधित काही गरजेच्या गोष्टी ?

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पॉडकास्टची ग्रेट सुरुवात करतात त्याचप्रमाणे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या पॉडकास्ट चा उत्तम शेवट सुद्धा करावा. जर पॉडकास्टची ग्रेट सुरुवात केलीत आणि तुमचा पॉडकास्ट चा मेन कंटेंट सुद्धा चांगला असेल पण जर शेवटी काही तथाकाथीत मॅनर्स अँड एटीकेट्स नसतील तर तुमचा प्रभाव तुमच्या श्रोत्यांवर हवा तसा पडत नाही.

पॉडकास्ट च्या शेवटामध्ये जास्त काही विशेष करायचं नसतं. तुमच्या श्रोत्यांना तुम्हाला ऐकल्याबद्दल धन्यवाद वैगरे करणं आणि परत तुमचा पॉडकास्ट ऐकण्यासाठी आर्जव करणं इतकच काय तुम्हाला सांगायचं असतं. तुमच्या पॉडकास्ट च्या शेवटामध्ये काय काय असावं ह्याच्या काही नोंदी मी तुम्हाला इथे देतो आहे. अर्थातच ह्या काही त्यापुरताच मर्यादित नाहीत.

पॉडकास्ट च्या शेवटी काय काय सांगावं ?

1. सर्वप्रथम त्यांना तुम्हाला ऐकल्याबद्दल धन्यवाद द्या. त्यांचे आभार माना.

2. तुम्ही आजच्या भागात काय सांगितलत याचा थोडक्यात तपशील द्या॰

3. तसेच तुम्ही तुमच्या पुढच्या भागात काय सांगणार आहात याची माहिती द्या.

4. तुमचा पॉडकास्ट कसा वाटला याबद्दल कमेन्ट करायला सांगा तसेच तुम्हाला मेल किंवा व्हाट्स अप करायला सांगा.

5. पॉडकास्ट आवडल्यास तो लाइक अँड शेअर करायला सांगा.

6. जर तुमच्या पॉडकास्ट संबंधी तुम्ही एखादा ब्लॉग किंवा वेबसाइट चालवत असाल तर त्याला भेट द्यायला सांगा.

ह्या काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्टची ग्रेट सुरुवात आणि शेवट करतांना लक्षात घ्यायला हव्यात. ह्यासाठी काही उत्तम पॉडकास्ट चा अनुभव तुम्ही घ्यायला हवा. KUKU FM वर तुम्हाला असे अनेक बेस्ट पॉडकास्ट ऐकता येतील, ज्यानुसार तुम्ही तुमच्या पॉडकास्टची ग्रेट सुरुवात आणि शेवट कशी करावी हे ठरवू शकतात !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *