चांगला पॉडकास्ट कसा बनवावा ?

पॉडकास्ट बनवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते. तसे आम्ही प्रत्येकच गोष्ट जी तुम्हाला चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठी गरजेची आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देतोच आहे. पण सोबतच याचविषयी जे जे काही आम्ही आमच्या लेखनमध्ये विस्तृत रित्या मांडतो आहोत ते एका ठिकाणी संक्षिप्तरित्या मांडणे मला गरजेचे वाटते. याचसाठी आजचा हा लेख जो तुम्हाला संक्षिप्तरित्या चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठी काय काय गरजेचे आहे याची ओळख करून देईल. सोबतच हा लेख चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठी ज्या अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याविषयी तुम्हाला अवगत करेल. तसच ज्या गोष्टी तुम्ही आधी वाचल्या आहे त्याची उजळणी करून देईल.

पॉडकास्ट चं विश्व एवढ मोठ आहे मग तो चांगला बनवण्याठी काय काय लागतं हे आम्ही एका लेखात कसं काय सांगणार? म्हणून चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठी काय काय लागतं याची ओळख करून द्यायाला मी हा लेख दोन भागात लिहतो आहे. त्यासाठीचा पहिला भाग आज पाहूया

1. तुमच्या श्रोत्यांना समजून घ्या

तुमचे श्रोतेच तुमच्या पॉडकास्ट मध्ये सर्व काही आहेत. तुमचा पॉडकास्ट किंवा एखाद्या कलाकाराची कला ही केवळ त्याच्या श्रोत्यांमुळे जीवंत असते. तुम्ही तुमचा कंटेंट देतांनाच असा दिला पाहिजे की जो तुमच्या श्रोत्यांना आवडणारा असेल. कुठल्याही कलेत कमर्शियल आणि आर्ट असे दोन प्रकार पडतात. म्हणजेच जो कंटेंट विकला जातो असा कंटेंट आणि एक असा कंटेंट जो कलेची साधना म्हणून तयार केला जातो. तुम्हाला जर चांगला पॉडकास्ट बनवायचा असेल तर तो तुमच्या प्रेक्षकांना आवडणार्‍या विषयाशी संबंधित हवा. तुम्ही कंटेंट उत्तम तर द्यायला हवाच पण सोबतच तो कंटेंट तुमच्या श्रोत्यांच्या किती पचनी पडतो आहे हे पण लक्षात घ्या. तुमच्या प्रेक्षकांना नक्की काय आवडतं यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा फीडबॅक घेऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या पॉडकास्टशी संबंधित सोशल मीडिया पेज तयार करू शकतात. त्यांना गूगल फॉर्म देऊ शकतात. तसेच त्यांचे फीडबॅक तुम्ही जर ब्लॉग किंवा वेबसाइट होस्ट करत असाल तरी तुम्हाला मिळू शकतो.

2. टारगटेड ऑडियन्स

Targeted audience/लक्षित समूह/टारगटेड ऑडियन्स

पॉडकास्ट बनवण्यासाठीचा हा अविभाज्य भाग आहे. तुम्ही ज्या विषयाशी संबंधित पॉडकास्ट बनवत आहात तो नक्की कुठले श्रोते ऐकणार आहेत हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तुम्हाला, तुमच्या विषयाला किती लोकं ऐकू शकतात याच वरुन ठरेल की तो पॉडकास्ट कितपत यशस्वी होणार. जर समजा तुम्ही खूप तत्वज्ञान आणि क्लिष्ट भाषा असलेला काहीतरी विषय निवडलात तर तो कोण ऐकणार आहे ? पण जर तुम्ही खूपच ट्रेंडी विषय निवडलात तर त्याच वेळी तुम्हाला अनेक लोकांचा मोठा प्रेक्षक वर्ग लाभू शकतो. एखादा कोर्स बनवतांना तर ही गोष्ट लक्षात घेणं खूपच महत्वाची आहे की तुम्ही तो कोर्स किती लोकांना विकू शकाल? तसेच जर तुम्ही इंटरव्ह्यु घेत असाल तरी पण हे बघण महत्वाच ठरतं की तुम्ही नक्की कोणाला बोलवणार आहात. तुम्ही ज्यांचा इंटरव्ह्यु घेतात त्यांना ऐकण्यासाठी किती लोकं उत्सुक आहेत हे पण गरजेचं आहे.

3. संसाधने

तुमच्या पॉडकास्ट चा आवाज, चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठीचा अविभाज्य भाग आहे. तुमचा आवाज सुधारित करण्यासाठी अनेक संसाधनांचा वापर करणे खूपच गरजेचे ठरते. संसाधने म्हणजेच वेगवेगळी उपकरणे ज्यांचा वापर तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवण्यासाठी करणार आहात. तुम्ही चांगला पॉडकास्ट बनवण्या साठी अनेक उपकरणांचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ माइक, हेडफोन, यूएसबी माइक , वेगवेगळे एडिटिंग सॉफ्टवेअर इत्यादि. पण सोप्यात सोप आणि वापरण्यास उत्तम माध्यम म्हणजे KUKU FM च in app रेकॉर्डिंग. याने तुम्ही तुमच्या पॉडकास्ट ची रेकॉर्डिंग उत्तम रित्या करू शकतात. याने तुमचा आवाज स्पष्ट रेकॉर्ड होतो. जो आवाज गरजेचा नसतो तो रेकॉर्ड होताच नाही. सोबतच तुम्हाला in app एडिटर मिळतो जो तुम्हाला तुमचा आवाज अधिक चांगला करण्या साठी मदत करतो. सोबतच तुम्ही वेगवेगळे ध्वनि आणि आवाज तुमच्या पॉडकास्ट च्या मूड प्रमाणे टाकू शकतात. सोबतच जर अधिक काही संसाधने घ्यायाची तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही अनेक प्रकारची उपकरणे विकत आणू शकतात. संसाधने आणि उपकरणे तुमचा पॉडकास्ट अधिका अधिक चांगला करण्यासाठी मदत करतात.

4. थंबनेल आणि डिसक्रिपशन

तुमचे श्रोते ज्यावेळी तुमचा पॉडकास्ट ज्या वेळी पाहतात त्यावेळी त्यांना सर्वप्रथम दिसणार्‍या या दोन गोष्टी. तुमच्या पॉडकास्ट चा कंटेंट तर लोकं नंतर पाहत असतात. परंतु त्यांना सर्वात आधी काही तुमच्या पॉडकास्टकडे आकर्षित करतं ते म्हणजे तुमच्या पॉडकास्ट च नाव. तुमच्या पॉडकास्ट च्या नावासोबत असते ती तुमच्या पॉडकास्ट ची थंबनेल म्हणजेच लघुप्रतिमा. लघुप्रतिमा कायमच एकदम आकर्षक बनवली पाहिजे. यासाठी कॅनव्हा हे सॉफ्टवेअर आणि ऐप तुम्ही वापरू शकतात. तुमच्या पॉडकास्ट ची लघुप्रतिमा तुमच्या पॉडकास्ट च्या विषयाला साजेशी असली पाहिजे. लघुप्रतिमेची रंगसंगतीही तुमच्या पॉडकास्ट च्या विषयाला साजेशी असली पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही प्रेम या विषयात पॉडकास्ट बनवत असाल तर तुम्ही लाल रंग वापरायला हवा याप्रमाणे. सोबतच तुमच्या पॉडकास्ट च डिसक्रिपशनही अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुमच्या पॉडकास्ट ची संक्षिप्त स्वरुपात माहिती डिसक्रिपशन तुमच्या श्रोत्यांना पुरवते. त्याचप्रमाणे तुमच्या पॉडकास्ट मध्ये seo अनुरूप की वर्ड वापरणे महत्वाचे ठरते. हे तुमचा पॉडकास्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास सोपे बनवते. यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *