क्यूआर कोड वापरुन आपल्या पॉडकास्टची जाहिरात कशी करावी ?

आपण डिजिटल युगात राहतो जिथे बहुतेक सर्वच कंटेंट पाठविणे किंवा वापरणे अगदी डिजिटल पद्धतीने होते. मग ते काहीही असू दे जसे की, आपल्या फोनवरील बातम्या वाचणं असेल किंवा स्नॅपचॅटवर क्यूआर कोडद्वारे सोशल मीडियावर मित्र मिळवणे असेल. आपला अंदाज योग्य आहे. आपण योग्य विचार करत आहात. क्यूआर कोडसह आपल्याला आपल्या पॉडकास्ट ची जाहिरात करणे पूर्णपणे शक्य आहे. शिवाय, प्रत्येक स्पर्धकास पॉडकास्ट सारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात त्यांच्या कंटेंटची जाहिरात करण्यासाठी त्यांना मिळणार्‍या प्रत्येक संधीची माहिती होणे सुद्धा आवश्यक आहे. ह्यामुळे आपण ह्या लेखात , कोडचा वापर करुन आपण आपल्या जाहिराती कश्या वाढवू शकतो या विषयी तपशीलवार चर्चा करणार आहे. जर आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर आपण सहजच कोड वापरण शिकू शकतात. याच्या मदतीने तुमच्या पॉडकास्ट ची जाहिरात करू शकतात. जेव्हा  कोड दुसर्‍याकडून स्मार्टफोनवर स्कॅन केला जातो, तेव्हा जर तो आपल्या पॉडकास्टशी संबंधित असेल तर आपले पॉडकास्ट लोकांना लगेचच पॉप अप होते. लोकांना कोड मुळे पॉडकास्ट चा शोध घेणे आणि तो ऐकण्याचा आनंद घेणे सोपे होते!

क्यूआर कोड म्हणजे नक्की काय?

आपण यापूर्वी क्यू आर ( क्विक रिस्पॉन्स ) कोड अनेक ठिकाणी पाहिले असतील. विक्रेते याचा वापर नेहमीच अन्न पदार्थांच्या लेबलवर , काही चिन्हानवर आणि आपल्या व्यवसायाच्या कार्डवर करतात. क्यूआर कोड काळ्या आणि पांढर्‍या छोट्या छोट्या चौकटींनी बनतो. तो एखादया चेसबोर्ड सारखा दिसतो. हे एक यूनिक सिम्बल असते. हे सिम्बल आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा वाचू शकतो अर्थातच त्याला स्कॅन करू शकतो आणि वेब अॅड्रेसमध्ये भाषांतरित करू शकतो. बर्‍याच स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हे फंक्शन त्यांच्या कॅमेराच्या सॉफ्टवेअरमध्ये आता आधीपासूनच असते. तसेच इतर अनेक क्यूआर कोड रीडर अ‍ॅप्स विनामूल्य उपलब्ध आहेत.

आपण एखादे पोस्टर किंवा व्यवसायशी निगडीत आपले बिजनेस कार्ड आपल्या वेवसायच्या जाहिरातीसाठी तयार करतात तेव्हा आपण एखाद्या प्रतिमेत किंवा मजकूरामध्ये क्यूआर कोड समाविष्ट करू शकता. या प्रकारे लोकांना आपल्याशी कार्ड किंवा स्टिकर च्या माध्यमातून संभाषण करणे सहज आणि सोपे होते. त्यांना फक्त आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून कॅमेर्‍याच्या सहयाने क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. त्यांनी तुमचा  कोड स्कॅन करताच आपल्या पॉडकास्ट ची वेबसाइट ची लिंक त्यांना पॉप अप होईल.

संभाषणांमध्ये समाविष्ट करा

QR CODES

हा एक उत्कृष्ट मार्ग आहे ज्याच्या सहाय्याने आपण नक्की काय काय कार्य करता याची माहिती लोकांना कमी श्रमात प्रभावी रित्या करुन देऊ शकतात. फक्त, आपला क्यूआर कोड आपल्या व्यवसायाच्या कार्डवर आपण मुद्रित करायाला हवा. जेव्हा आपल्या संपर्कात कोणी व्यक्ति येतो ज्याला आपल्या कार्याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे, तेव्हा मौखिक रित्या सांगण्या पेक्षा आपले कार्ड त्याला द्या. आपल्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांना कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी सांगा. अर्थातच आपल्या वेबसाइटची किंव पॉडकास्टची लिंक त्यांच्या मोबाइल मध्ये पॉप अप होईल व ते आपल्या कार्या विषयी अधिका अधिक जाणू शकतील.

शिवाय, हा आपला परिचय लोकांना देण्याचा एक अनोखा मार्ग आहे. आपण मेसेजिंग मध्ये ही जास्त वेळ न घालवता आपला  कोड पाठवून आपल्या विषयी जाणून घेण्यात लोकांना मदत करू शकतात. अश्यापद्धतीने लोकांना तुमची ओळख करून देणं मजेशीर वाटू शकतं. हे एक कुतूहल आपल्या परिचायच्या सोबत जोडते. जेव्हा लोकांना वेळ मिळतो तेव्हा ते त्यानुसार  कोड मधून सहज आपल्या पॉडकास्ट पर्यन्त पोहोचू शकतात.

सार्वजनिक पोहोच

आपला कंटेंट प्रत्येक मार्गाने बाजारात आणण्यासाठी नेहमीच प्रत्येक दृष्टीने प्रयत्न करणे नेहमीच चांगले असते. ह्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे आपण वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी आपला क्यूआर कोड डिसप्ले करू शकतात. विविध कॅफेजमध्ये, बुक स्टोअर्स मध्ये, संगीत सामग्री च्या स्टोअरमध्ये आपला कोड डिसप्ले करू शकतात. जिथे आपणास असे वाटते की ही अशी जागा आहे की जी सर्जनशील मनांना आकर्षित करेल त्या ठिकाणी आपण आपला  कोड डिसप्ले करू शकतात. तुम्हाला ज्या ज्या जागा अश्या वाटतात की तेथील लोकं तुमच्या कंटेंटमध्ये रस घेऊन तुमच्या पॉडकास्ट ला विजिट देतील तिथे तिथे आपला क्यूआर कोड डिसप्ले करा.

या व्यतिरिक्त, आपण हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यात कुठला मजकूर यायला हवा हे कस्टमाइज करू शकतात. अश्या मजकुरामध्ये आपल्या पॉडकास्ट च्या कंटेंटशी संबंधित असलेल्या गोष्टींचा सारांश आपण मजकूरात जोडल्याचे सुनिश्चित करा. आपण आपल्या कोणत्याही श्रोत्यांस एखादे रहस्य वाटावे असा ,किंवा आपल्या पॉडकास्ट विषयीचा सारांश असलेला मजकूर देऊ शकतात.

आपण स्कॅनोवा क्यूआर कोड जनरेटर हे ऑडिओ फाइल साठी कोड जनरेट करण्यासाठी वापरु शकतात. येथे  कोड कसा तयार करावा याबद्दल आपल्याला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन केलेले आहे.

1. स्कॅनोव्हा वर जा आणि 14-दिवसांच्या विनामूल्य ट्रायल साठी साइन अप करा

2. क्यूआर कोड श्रेणीमधून, ऑडिओ कोड निवडा

3. पुढे, आपण क्यूआर कोडमध्ये एन्कोड करू इच्छित असलेली ऑडिओ फाइल अपलोड करण्यासाठी ‘अपलोड फाइल’ वर क्लिक करा

4. एकदा आपण फाइल अपलोड केल्‍यानंतर ‘क्यूआर कोड तयार करा’ या ऑप्शन वर क्लिक करा.

5. एक विंडो पॉप-अप करेल आणि आपणास क्यूआर कोडला नाव देण्यास आणि तो सेव्ह करण्यास सांगेल.

6. तयार केलेल्या क्यूआर कोडसाठी एक नाव प्रविष्ट करा आणि ‘सेव करा’ या ऑप्शन वर क्लिक करा.

7. पुढे, आपल्या स्क्रीनवर आपल्याला तीन क्यूआर कोड डिझाइन चे पर्याय दिसतील – स्टँडर्ड ब्लॅक अँड व्हाइट, कस्टम विथ लोगो आणि कस्टम विथ बॅकग्राऊंड. आपण तीनपैकी कोणत्याही एका पर्यायासह पुढे जाऊ शकता

8. एकदा आपला  कोड तयार झाल्यानंतर अपडेट वर क्लिक करा आणि कोड डाउनलोड करा.

9. पुन्हा, एक विंडो आपल्याला क्यूआर कोड ची प्रतिमा, आकार आणि स्वरूप ठरवण्यास सांगतांना दिसेल

10. एकदा आपण विचारलेला तपशील भरल्या नंतर, एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करा.

आपण हे कोणत्याही लिंक किंवा वेबसाइटसह करू शकता जे आपल्या पॉडकास्टशी संलग्न असतील. तसेच, याची खात्री करा की आपण iOS आणि Android या दोघिंसाठी क्यूआर कोड बनविला आहे, कारण भारतात स्मार्टफोन साठी या दोघीही सिस्टम्स वापरल्या जातात.

आम्ही खात्री बाळगतो की आपण हा मार्ग आपल्या पॉडकास्ट चे मार्केटिंग करण्यास अवश्य वापराल !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *